आजचा सोन्याचा दर: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सोनंबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होत आहे. आज 18 डिसेंबर रोजीदेखील दोन्ही मौल्यवान धातुंमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी डॉलर-मूल्यांकित सराफा व्यापार अधिक परवडणारा झाला आहे. जागतिक बाजारात सोने विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $4,321.06 प्रति औंस आहे.
सोन्याच्या दरवाढीबरोबरच चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. बुधवारी चांदीच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ झाली होती. तर, आज 208100 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा भाव 66.52 डॉलर प्रति औंसची नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.या वर्षी चांदीच्या दरात तब्बल 127 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आज सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून 1,34,840 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,23,600 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 260 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,01,130 रुपयांवर पोहोचलं आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,23,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,34,840 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,01,130 रुपये
– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 12,360 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,484 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 10,113 रुपये
8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 98,880 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,07,872 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 80,904 रुपये
– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,23,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,34,840 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,01,130 रुपये





















