America Travel Policy : नोकरी, शिक्षण, पर्यटन, या आणि अशा अनेक कारणांनी अमेरिकेत परदेशी नागरिकांची वर्षभर ये-जा सुरू असते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये देशानं परदेशी नागरिकांच्या देशात येण्यासंबंधीच्या धोरणात अमेरिकेनं काही नियम आणखी कठोर केल्यामुळं अनेकांचीच पंचाईत झाली. एकिकडे विद्यमान ट्रम्प सरकारनं व्हिसा धोरणात बदल करत नियम आणखी कठोर केले असतानात आता या आर्थिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशानं आता आणखी काही देशांसाठी प्रवेशबंदीचा नियम लागू केला आहे.
राष्ट्र संरक्षणासह सार्वजनिक स्तरावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देत सदरील नियमांची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू होईल असं ‘व्हाईट हाऊस’कडून स्पष्ट करण्यात आलं. प्रत्यक्षात अफगाणिस्तानातून 2021 मध्ये स्थलांतरित झालेल्या एका अफगाण नागरिकाने काही दिवसांपूर्वी महिन्यात दोन नॅशनल गार्ड जवानांवर गोळीबार केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने ही कारवाई आणखी कठोर केल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेकडून प्रवेशबंदी लागू असणारे देश कोणते?
AFP च्या माहितीनुसार 19 देशांना अमेरिकेत प्रवेशास पूर्णत: बंदी लागू करण्यात आली असून, या देशांच्या नागरिकांना अमेरिकेत जाता येणार नाही.
अमेरिकेत प्रवेशबंदी असणाऱ्या देशांची यादी खालीलप्रमाणे…
- सीरिया
- बुर्किना फासो
- माळी
- नायजर
- दक्षिण सुदान
- लाओस
- सिएरा लिओन
- म्यानमार
- उत्सव
- रिपब्लिक ऑफ कांगो
- विषुववृत्त गाणे
- हैती
- इरिट्रिया
- इराण
- लिबिया
- सोमालिया
- सुदान
- येमेन
- अफगाणिस्तान
अपवादाची मुभा कोणाला मिळणार?
अमेरिकेतील कायमस्वरूपी रहिवासी (ग्रीन कार्ड धारक), विद्यमान व्हिसाधारक यासोबतच काही विशेष व्हिसा श्रेणी (खेळाडू, राजनैतिक व्यक्ती) आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी प्रवेश आवश्यक असलेल्यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली असून ते या नियमास अपवाद आहे.
पूर्णत: बंदीव्यतिरिक्त ट्रम्प प्रशासनाकडडून काही देशांवर आंशिक स्वरुपातील निर्बंध लागू करण्यात आले असून, त्यात विशेषत: कॅरेबियन आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे. ज्यांची नावं खालीलप्रमाणे…
- नायजेरिया
- आयवरी कोस्ट
- सेनेगल
यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे सेनेगल हा तोच देश आहे, ज्यानं पुढच्या वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको इथं पार पडणाऱ्य़ा फुटबॉल वर्ल्ड कपसाठी पात्रताफेरी ओलांडली आहे. त्यामुळं या देशाबबात भविष्यात कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयानंतर अनेक स्तरांवर निर्णयाचा निषेधही केला जात आहे. अनेक देशांतील नागरिकांना सामूहिकरित्या शिक्षा देण्याजोगा अमेरिकेचा हा निर्णय असून, यामुळं अनेक नागरिकांचा अमेरिकेतील प्रवास थांबेल, ज्यांचा हिंसेशी, गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही त्यांनाही या निर्णयाचा फटका बसेल. मात्र या निर्णयावर कोतीही तडजोड न करण्यावर अमेरिका ठाम असल्यानं सर्व चर्चांना इथंच पूर्णविराम मिळतो.





















