Homeदेश-विदेशट्रॅफिकची कटकट संपणार, टोल नाक्यावर आता 80च्या स्पीडने जाता येणार; नितीन गडकरींनी...

ट्रॅफिकची कटकट संपणार, टोल नाक्यावर आता 80च्या स्पीडने जाता येणार; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

उपग्रह आधारित टोल प्रणाली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत टोल सिस्टिमबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. लवकरच देशभरात सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन सिस्टम 2026च्या अखेरपर्यंत लागू केली जाणार आहे. यामुळं प्रवाशांना टोल नाक्यावर जास्तवेळ थांबावे लागणार नाही तसंच, सरकारलादेखील जास्त महसूल मिळणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात प्रश्नांना उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी यांनी टोल सिस्टिमबाबत सविस्तर माहिती दिली. टोल कलेक्शनचे नवीन तंत्रज्ञान सॅटेलाइट आणि AI आधारित असेल. त्यामुळं नागरिकांना टोल प्लाझावर जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. यामुळं 1,500 कोटींच्या इंधनाची बचत होईल आणि सरकारच्या महसूलात 6 हजार कोटींची वाढ होईल. टोल नाक्यावरदेखील फारकाळ वाट पाहावी लागणार नाही.

नितीन गडकरी यांनी सभागृहात म्हटलं की, मल्टी लेन फ्री फ्लो टोल (MLFF) ही चांगली सुविधा असून येथे आधी आपल्याला टोलनाक्यावर पेमेंट करावे लागायचे. यात 3 ते 10 मिनिटांचा वेळ लागायचा. त्यानंतर FasTag मुळं हा वेळ कमी होऊन 60 सेकंदावर किंवा त्यापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळं सरकारच्या महसूलात कमीत कमी 5 हजार कोटींची वाढ झाली आहे. FasTagच्या ऐवजी MLFF ही सुविधा आल्यानंतर आता कार जास्तीत जास्त 80 किमी प्रति तास या वेगाने टोल नाका पार करू शकणार आहे. कोणत्याही टोल नाक्यावर थांबायची गरज नाहीये.

वाहनचालकांना शून्य मिनिटे वाट पाहायला लावणे हे आमचं उद्दिष्ट्य आहे आणि यात AI आणि FasTagच्या बरोबरच सॅटेलाइटच्या मदतीने नंबर प्लेट ओळखता येणार आहे. तसंच, 2026च्या अखेरीस आम्ही हे काम 100 टक्क्यांपर्यंत पूर्ण करु आणि एकदा का हे काम पूर्ण झाले तर देशाचा महसूल 1,500 कोटी रुपयांची बचत होईल. आमच्या  महसूलात 6 कोटी रुपयांची वाढ होईल आणि टोल चोरीदेखील संपेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, या नव्या टेक्नोलॉजीमुळं लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. 2026 अखेरीस टोल प्लाजावर 80 किमी प्रति तास या वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी वेटिंग टाइम शून्य होईल.

कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर स्पष्टच बोलले नितीन गडकरी

जे कंत्राटदार त्यांचे काम योग्यरित्या करत नाहीत त्यांना दोन वर्षांसाठी बंदी घातली जाईल आणि पुढील कोणत्याही निविदांसाठी अर्ज करता येणार नाही.सरकार फक्त राष्ट्रीय महामार्गांसाठी जबाबदार आहे, राज्य महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांसाठी नाही. तथापि, राज्य आणि शहरातील रस्त्यांवरील समस्या अनेकदा सोशल मीडियावर अशा प्रकारे चित्रित केल्या जातात की जणू त्या राष्ट्रीय महामार्गांवर आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!