Homeदेश-विदेशदिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे रोड अपघातात 8 तास खडखडाट कारमध्ये अडकलेल्या दाम्पत्याचा...

दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे रोड अपघातात 8 तास खडखडाट कारमध्ये अडकलेल्या दाम्पत्याचा रक्तबंबाळ होऊन मृत्यू झाला


रस्ता अपघातात दाम्पत्याचा रक्तबंबाळ मृत्यू : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर एक भयानक अपघातात एका दांपत्याने प्राण गमवला आहे. नूहजवळ एका अज्ञात जड वाहनाने मागून धडक दिल्याने दिल्लीतील एका जोडपे त्यांच्या वॅगनआर कारमध्ये सुमारे आठ तास अडकून पडले होते. रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची वाट पाहतच या जोडप्याचा मृत्यू झाला, असं पोलिसांनीच सांगितलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मयत दांपत्याची ओळख पटली

लक्ष्मी राम (42) आणि त्यांची पत्नी कुसुमलता (38) अशी मृतांची नावे आहेत. ते राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील हिंडौन येथून घरी परत जात असताना मंगळवारी (2 डिसेंबर रोजी) रात्री 11.30 ते मध्यरात्रीच्या दरम्यान नौशेरा गावाजवळ हा अपघात झाला. दिल्लीमध्ये नोंदणीकृत असलेली त्यांची राखाडी रंगाची मारुती वॅगनआर एक्सप्रेसवेवरील मेटलच्या क्रॅश बॅरियरवर धडकल्याने चिरडली गेली.

कधी सापडले मृतदेह?

बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गस्ती पथकाला एका वाटसरूने अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत पती-पत्नीचा आत अडकून पडल्याने आणि अती रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. मृतदेहांच्या स्थितीवरून पतीने आपल्या पत्नीला धरुन ठेवलं होतं असं स्पष्ट होतं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळी मुलाला फोन केला तेव्हा…

हे जोडपे दिल्लीच्या बुद्ध विहारमधील मांगीराम पार्कमध्ये त्यांच्या चार लहान मुलांसह (दोन मुले आणि दोन मुली) राहत होते. लक्ष्मी रामचे वडील देवी सिंह (65) यांनी एफआयआरमध्ये नेमका घटनाक्रम सांगितला आहे. “2 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास, माझा मुलगा लक्ष्मी राम आणि सून कुसुमलता वॅगनआरने दिल्लीला निघाले. ते दिल्ली-मुंबई महामार्गावरून जात होते. जेव्हा माझा मुलगा आणि सून चॅनल पॉइंट 30.900 वर पोहोचले तेव्हा मागून एका अज्ञात वाहनाने त्यांना खूप वेगाने धडक दिली आणि एक भयानक अपघात झाला. माझा मुलगा आणि सून दोघेही जागीच मरण पावले मी सकाळी 8.56 वाजता माझ्या मुलाला फोन केला त्यावेळी जयसिंगपूर चौकीतील कोणीतरी फोन उचलला आणि मला सांगितले की तुमचा मुलगा आणि सून अपघातात मरण पावले आहेत,” असं देवी सिंह यांनी म्हटलं आहे.

वाहनाचा शोध सुरु

नुह पोलिस ठाण्यात जड वाहनाच्या अज्ञात चालकाविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवणे आणि निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्या माध्यमातून अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेतला जात आहे. “फुटेजवर दोन जड वाहने दिसली आहेत, आम्ही त्या वाहनांच्या मालकाचा शोध घेत आहोत आणि आरोपींना लवकरच पकडले पाहिजे,” असे स्टेशन हाऊस ऑफिसर, इन्स्पेक्टर प्रवीण कुमार म्हणाले.

बुधवारी नलहार येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि संध्याकाळी उशिरा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले. गुरुवारी सकाळी पतीच्या कुटुंबाने नुह येथून मृतदेह परत आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणीच मदत न केल्याची पित्याला खंत

‘इंडियन एक्सप्रेस’शी फोनवर बोलताना, अपघाताच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्यांनी मदत न केल्याचं सांगताना देवी सिंग याचा आवाज भरुन आला होता. “ही घटना मध्यरात्रीच्या आधी घडली, असे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मला सांगितले. गाडी रात्रभर तिथेच पडून राहिली आणि अनेक वाहने तिथून गेली असतील…,” असं देवी सिंग म्हणाले.

नातवांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं?

शेतकरी असलेले सिंग यांना आता त्यांच्या नातवंडांचे शिक्षण कसे द्यावे याची चिंता आहे. “मी एक छोटासा शेतकरी आहे, माझ्याकडे काही म्हशी आहेत. माझा मुलगा आणि सून इथून काही भाज्या घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांची मुले त्यावेळी दिल्लीत होती पण नंतर गावी आली,” असं देवी सिंग यांनी सांगितलं.

पत्नीच्या वडिलांना विश्वासच बसेना

देवी सिंग यांनी त्यांच्या मुलाच्या सासऱ्यांना ही बातमी सांगितली तेव्हा आपला जावई आणि मुलगी आपल्याला सोडून गेल्याचं समजल्याने त्यांनाही धक्का बसला.  “या दोघांचं 2003 मध्ये लग्न झालं होतं. ते सुरक्षित परत येतील याची खात्री करण्यासाठी मी त्यांना रात्रभर फोन केला होता. सकाळी पोलिसांनी त्यांचा फोन उचलल्यानंतर मी लगेचच नुहला निघालो,” असं मयत महिलेचे वडील म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!