Homeदेश-विदेशइंडिगो संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी जादा गाड्या आणि अधिक डबे चालवण्याची...

इंडिगो संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी जादा गाड्या आणि अधिक डबे चालवण्याची योजना आखली आहे

इंडिगो संकट: मागील काही दिवसांपासून इंडिगोची हजारो उड्डाणं रद्द झाली आणि त्याचा थेट परिणाम लाखो विमान प्रवाशांवर झाल्याचं दिसून आलं. काही उड्डाणांच्या वेळा 10 ते 12 तासांनी पुढे गेल्या, तर काही विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. ज्यामुळं विमानतळांवर तोबा गर्दी पाहायला मिळाली. अनेक प्रवाशांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना मुकावं लागलं आणि ही परिस्थिती, हे संकट गडद होत असतानाच भारतीय रेल्वे तारणहार होत या प्रवाशांच्या मदतीला धावून आली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

लाखोंच्या संख्येनं प्रवासी विमानतळावर ताटकळल्याचं पाहता रेल्वेनं तातडीनं निर्मय घेत त्यांना निर्धारित ठिकाणांवर पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था करत विविध रेल्वेमार्गांवर जादा गाड्या सोडण्यास सुरुवात केली. शिवाय काही रेल्वेंना जास्तीचे AC डबेही जोडले.

विशेष रेल्वे कुठून कुठवर प्रवासाची मुभा देणार?

भारतीय रेल्वेच्या निर्णयानुसार सेंट्रल, वेस्टर्न, नॉर्थ वेस्टर्न आणि ईस्टर्न रेल्वेनं शनिवारी मोठ्या संख्येनं जादा गाड्यांची सोय केली. यामध्ये पुणे- बंगळुरू, पुणे- दिल्ली, मुंबई- दिल्ली, मुंबई – गोवा, लखनऊ- मुंबई, नागपूर- मुंबई, गोरखपूर- मुंबई अशा मार्गांवर रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये हावडा- नवी दिल्ली विशेष रेल्वे शनिवार, 6 डिसेंबर 2025 ला सायंकाळी धावणार असून, 8 डिसेंबरला ही रेल्वे परतीचा प्रवास करेल. तर, मुंबई- मडगाव एसी विशेष लोकल 7 डिसेंबर रोडी सोडण्यात येईल.

रेल्वेकडून फक्त जादा ट्रेनच नव्हे तर काही लांब पल्ल्याच्या रेल्वेंना जादा AC डबेसुद्धा जोडण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरू- अगरतळा हमसफर, मंगळुरू – तिरुवअनंतपूरम, बंगळुरू- चेन्नई, मुंबई- मंगळुरू अशा रेल्वेगाड्यांची आसनक्षमता पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. तर, जम्मू आणि दिब्रूगढ राजधानी रेल्वेत 3AC कोच, चंदीगढ- अमृतसर शताब्दी ट्रेनमध्येही वाढीव डबे जोडण्यात आले आहेत.

किती वाढीव डब्यांची व्यवस्था?

उपलब्ध माहितीनुसार रेल्वे विभागानं 37 रेल्वेंमध्ये 116 वाढीव डबे जोडण्यात आले. यामुळं 114 दौऱ्यांमध्ये साधारण 4.9 लाख अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये भारतीय रेल्वे 35000 अधिक प्रवासी हाताळत असून, या आठवड्यात एकूण 26 लाख प्रवाशांना रेल्वेनं आधार दिल्याचं स्पष्ट होत आहे. हे संकट टळेपर्यंत रेल्वेकडून प्रवाशांसाठी या सुविधा दिल्या जातील असं रेल्वे विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मिळत आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!