Homeदेश-विदेशभयानक क्षण रोमानियन ड्रायव्हर मर्सिडीजने उड्डाण घेतले आणि दोन गाड्यांवर वेगाने उडी...

भयानक क्षण रोमानियन ड्रायव्हर मर्सिडीजने उड्डाण घेतले आणि दोन गाड्यांवर वेगाने उडी मारली

रोड अपघात रोमानिया मर्सिडीज व्हायरल व्हिडिओ: तुम्ही आतापर्यंत रस्त्यावरील अपघाताचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असतील. मात्र रोमानियामध्ये घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये एक अती प्रचंड वेगाने धावत असलेली कार नियंत्रण सुटल्याने सिग्नलच्या चौकातून काही फुटांपर्यंत हवेत उडाली. ही उडालेली दोन गाड्यांवरुन थेट समोर जाऊन पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कसा झाला अपघात?

अपघात झालेली कार मर्सिडीज कंपनीची असून चालक 55 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चौकातील फुटपाथच्या कठड्याला धडून काही फुटांपर्यंत उडवली आणि सिग्नलला थांबलेल्या अनेक गाड्यांवरून जात पलीकडे पडली. विशेष म्हणजे एवढा भीषण अपघात होऊनही कोणतीही जीवघेणी दुखापत न होता तो चमत्कारिकरित्या वाचला.

पेट्रोल पंपाजवळ कोसळली कार

3 डिसेंबर रोजी झालेल्या या अपघाताचा थरार सिग्नलच्या चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वायव्येकडील ओराडिया शहरातील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर हा सारा प्रकार घडला. वेगाने येणाऱ्या मर्सिडीज ब्रेक निकामी झाल्यापासून अत्यंत वेगात चौकात घुसली. वळणाचा रस्ता असतानाही गाडी सरळ जाऊन फुटपाथच्या कठड्याला धडकून हवेत उडाली. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मर्सिडीज चालक चुकीच्या मार्गाने अत्यंत वेगात चौकात घुसला. एक बस निघून जाण्याची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन गाड्यांवरुन उडाली. नंतर पेट्रोल पंपापासून काही मीटर अंतरावर ही कार जमिनीवर कोसळली.

चालकाला मधुमेहाचा त्रास

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय चालकाला मधुमेहाचा त्रास असून अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने कारवरील नियंत्रण गमावले. त्यामुळेच कार अत्यंत वेगाने चौकात शिरली आणि अपघात झाला.

डॉक्टर म्हणाले चालक बेशुद्ध पडलेला

अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, मर्सिडीज अगदी काही क्षण दिसते इतका तिचा वेग असल्याचं दिसून येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, जवळच्या अपार्टमेंट ब्लॉकमधील रहिवाशांनी धडकेचा जोरदार आवाज ऐकल्याचे सांगितले. अपघातग्रस्त कारच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या ड्रायव्हरला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. चालकाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तातील साखर कमी झाल्याने चालक बेशुद्ध पडला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र तो चमत्कारिकरित्या वाचला.

पोलिसांनी 90 दिवसांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द केला आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!