Homeदेश-विदेशमुलीसाठी सॅनिटरी पॅड मागणाऱ्या गलथान कारभारामुळे इंडिगो पॅसेंजर संतप्त

मुलीसाठी सॅनिटरी पॅड मागणाऱ्या गलथान कारभारामुळे इंडिगो पॅसेंजर संतप्त

इंडिगो पॅसेंजरचा व्हायरल व्हिडिओ: इंडिगोच्या विमानांचं उड्डाण रद्द झाल्याने देशभरात लाखो प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत. गुरुवारी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. यामुळे अनेक गर्दीच्या विमानतळांवर प्रवाशांचा गोंधळ उडाला. सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. अनेकांनी उड्डाण रद्द झाल्याने आणि दीर्घ विलंबाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे, अचानक वेळापत्रकात बदल आणि स्पष्ट संवादाचा अभाव याबद्दल इंडिगोला जाब विचारला जात आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

यादरम्यान विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मुलीला रक्तस्त्राव होत असल्याने वारंवार सॅनिटरी पॅडची मागणी करताना दिसत आहे. “सिस्टर माझ्या मुलीला सॅनिटरी पॅड हवं आहे. तिचं रक्त वाहत आहे. वडील रडत आहेत. विमानांचं वेळेत उड्डाण होत नाही आहे. पॉवरच्या नावाखाली फक्त अंदाज लावले जात आहेत,” असा संताप तो व्यक्त करताना दिसत आहे.

या घटनेमुळे प्रवासी किती हतबल स्थितीत आहेत हे अधोरेखित होत आहे. अनेकांनी हे आता संयमाचं शेवटचं टोक असल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. “हे प्रकरण सर्वांसमोर मांडणारा बाप किती असहाय्य असेल याचा विचार करा आणि दुःखाची गोष्ट म्हणजे कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही,” अशी टिप्पणी एका युजरने केले आहे. तर एका युजरने हे साधं एक पॅड देऊ शकत नाहीत अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या एका युजरने माणुसकीच्या भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “हो, तांत्रिक समस्या घडतात. त्या पुन्हा घडतील, फक्त येथेच नाही तर जगभरात. पण अशा क्षणी, आपण माणूस म्हणून अपयशी ठरत नाही का? आपण विसरू नये – प्रणाली आणि वेळापत्रकाच्या पलीकडे, आपण प्रथम माणूस आहोत,” असं त्याने म्हटलं आहे.

दरम्यान अशाच दुसऱ्या एका घटनेत संतापलेला प्रवासी बेफिकीर इंडिगो अधिकाऱ्यावर ओरडू लागला आणि त्याच्या विमानाची स्थिती विचारत होता, “इधार आ ना, जवाब दे ना,”  शेकडो इंडिगो उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा संयम सुटला आहे. शेवटच्या क्षणी उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले असल्याचं सांगण्यात आलं आहे.

“लोकांची निराशा योग्य आहे परंतु त्यांनी हे देखील समजून घेतले पाहिजे की हे लोक फक्त सहाय्यक कामगार आहेत, त्यांना जास्त माहिती नाही, जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारावे,” असं एकाने म्हटलं आहे. एकाने म्हटले, “तुम्हाला वाटते का की फ्रंट डेस्कवर बसलेले हे लोक त्यांच्या खिशात विमान लपवत आहेत? आम्हाला इतके अधिकार आहेत का?”.

इंडिगोचे निवेदन

इंडिगोने परिस्थितीबाबत निवेदन जारी केले असले तरी, प्रवाशांना अद्याप या वेळापत्रकाच्या गोंधळावर योग्य तोडगा सापडलेला नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशी सुरू केल्यानंतर, इंडिगोने विमान वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सामान्य करण्यासाठी दोन दिवसांची मागणी केली आहे. पुढील 48 तासांत कॅलिब्रेटेड उपाययोजना करण्याची योजना देखील त्यांनी आखली आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!