Homeदेश-विदेशस्पेस न्यूज जेम्स वेब टेलीस्कोप सुपरनोव्हाचा स्फोट करण्यासाठी रेड सुपरगियंट स्टार कॅप्चर...

स्पेस न्यूज जेम्स वेब टेलीस्कोप सुपरनोव्हाचा स्फोट करण्यासाठी रेड सुपरगियंट स्टार कॅप्चर करा


अंतराळ बातम्या: अवकाश… अंतराळ… असिमीत असं एक अनोखं विश्व ज्या विश्वातील पृथ्वी नावाच्या ग्रहावरील आपण एक अतिशय नगण्य असा घटक आहोत. अशा या अवकाशामध्ये कैक रहस्य आजही अनुत्तरित आहेत, ज्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न नासा (NASA) आणि तत्सम अंतराळ संशोधन संस्था करत आहेत. कुतूहलपूर्ण अशा या विश्वामधील एका अनपेक्षित ताऱ्यासंदर्भातील खुलासा नुकताच नासानं केला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

NASA च्या जेम्स वेब टेलिस्कोप या अतिशय उत्तम क्षमतेच्या दुर्बिणीच्या माध्मयातून नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटीतील काही संशोधकांच्या समुहानं एका ताऱ्याला विनाश पावण्याआधीच्या स्फोट होतानाच्या स्थितीत अतिशय जवळून टीपलं. पहिल्यांदाच या समुहानं मध्य-अवरक्त(Mid-Infrared) प्रकाशात एका सुपरनोवाच्या स्त्रोताला ओळखत त्यांनाच Progenitor असं म्हटलं जातं.

सदर संशोधनामध्ये Hubble Space Telescope च्या जुन्या आकडेवारीशी तुलना केल्यास समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रचंड स्फोट एका अतिशय मोठ्या अशा लालबुंद दानवी ताऱ्यापासून झाला. हा तारा, धुळीच्या एका जाड आणि हैराण करणाऱ्या चादरीमध्ये जणु गुरफटला होता.

हे संशोधन कोणत्या दिशेला नेणारं?

संशोधकांना मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाचे हे तारे स्फोट होताना अतिशय कमी का दिसतात, याची उकल होऊ शकते. सध्याची ताऱ्यांची स्थिती पाहता अनेक ताऱ्यांच्या स्फोटास हेच लाल रंगाचे तारे जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. नव्या संशोधनानुसार हे तारे स्फोटास कारणीभूत असले तरीही धुळीच्या थरामुळं ते नजरेस पडत नाहीत. सदरील निरीक्षण ‘द एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

स्फोट झालेला हा तारा अतिशय प्रचंड प्रमाणात चकाकणारा असून, त्याला रंग गडद लाल होता. आश्चर्याची बाब म्हणजे सूर्याहून तो 1 लाख अधिक पटींनी उर्जा देत होते. सर्वप्रथम 29 जून SN2025pht ला या सुपरनोवाची माहती मिळाली. ऑल-स्काय ऑटोमेटेड सर्वेच्या मदतीनं यासंदर्भातील माहिती समोर आली. हा स्फोट सर्पिल आकाशगंगेत झाला असून, ती पृथ्वीपासून 4 कोटी प्रकाशवर्षे दूर असून, या स्फोटानंतर आणि स्फोटापूर्वी अद्वितीय निरीक्षण करण्याची संधी संशोधकांना मिळाली.

जेम्स वेब दुर्बिणीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या महाभयंकर ताऱ्याचा स्फोट झाला तेव्हा त्याच्या आजुबाजूला नेमकं कसं वातावरण होतं हेसुद्धा समोर आलं आहे. सदर अध्ययनामध्ये अश्विन सुरेश या नॉर्थवेस्टच्या वेनबर्ग कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंसेजमधील भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र विषयातील भारतीय विद्यार्थ्याचाही समावेश होता.

FAQ

नासाने कोणत्या ताऱ्याच्या स्फोटाबाबत नवीन खुलासा केला?
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या (JWST) मदतीने नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या टीमने एका ताऱ्याच्या विनाशापूर्वीच्या स्फोटाची स्थिती जवळून निरीक्षित केली.

हा तारा कसा होता आणि स्फोट कशामुळे झाला?
हा स्फोट एका अतिशय मोठ्या लालबुंद दानवी ताऱ्यापासून (रेड सुपरजायंट) झाला, जो जाड धुळीच्या चादरीमध्ये गुरफटलेला होता. हा तारा सूर्यापेक्षा 1 लाख पट अधिक उर्जा देत होता आणि गडद लाल रंगाचा होता.

हे संशोधन कशाची उकल करेल?
संशोधकांना मिळालेल्या माहितीनुसार, लाल रंगाचे तारे स्फोट होताना का कमी दिसतात याची कारणमीमांसा होईल. अनेक सुपरनोवांसाठी हे तारे जबाबदार असले तरी धुळीच्या थरांमुळे ते अदृश्य राहतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!