बेंगळुरु महिला छळ प्रकरण : बेंगळुरूमधील एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध खळबळजनक खुलासे केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. कर्नाटकमधील पुट्टेहल्ली पोलीस ठाण्यात तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या महिलेने पोलिसांना सांगितलं की, पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महिलेचं डिसेंबर 2024 मध्ये सय्यद इनामुल हकशी लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाच्या सुमारे दोन महिन्यांनंतर महिलेच्या कुटुंबाने लग्नाच्या भेटवस्तू म्हणून त्यांच्या सासरच्या लोकांना 340 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक यामाहा बाईक दिली. त्यानंतर लगेचच, महिलेला कळलं की तिचा पती आधीच विवाहित असल्याचा खुलासा पत्नीला झाला.
त्या महिलेने पोलिसांनी सांगितलं की, तिच्या नवऱ्याची दुसरी पत्नी आहे आणि त्याचे 19 महिलांसोबत शारीरिक संबंध आहेत. एवढंच नाहीतर पतीने त्यांच्या बेडरूममध्ये गुप्तपणे कॅमेरा बसवला, त्यांचं खाजगी क्षण रेकॉर्ड केलं आणि ते व्हिडीओ परदेशातील दुबईतील त्याच्या मित्राला पाठवायचा. धक्कादायक म्हणजे पतीने तिच्याशी भारताबाहेरील लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही तिने केला आहे. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने तिचे खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.
पतीने सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्ये आणि अगदी तिच्या पालकांच्या घरीही वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. एका प्रकरणात, तिने सांगितले की त्याने फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी तिच्यावर दबाव आणला आणि तिने नकार दिल्यावर तिच्यासोबत मारहाण केली.
या महिलेने पोलिसांना सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान, नणंदेकडून अपमान करण्यात आले. एवढंच नाही तर दीराने अनुचित वर्तन केल्याचा आरोप तिने तक्रारीमध्ये केला आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला याबद्दल सांगितलं तेव्हा ते मला भेटायला आले. पण माझ्या पतीने मला त्यांना भेटू दिले नाही आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागला’, असं पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत पतीसोबत सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान तिचा नवरा सय्यद फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
FAQ
1: ही घटना कशाबाबत आहे?
उत्तर: बेंगळुरूमधील एका महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शोषणाच्या खळबळजनक आरोप केले आहेत. तिने पुट्टेहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यामुळे खळबळ माजली आहे.
2: महिलेचे लग्न कधी आणि कोणाशी झाले?
उत्तर: महिलेचे लग्न डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद इनामुल हक यांच्याशी झाले. लग्नाच्या सुमारे दोन महिन्यांनंतर तिच्या कुटुंबाने सासऱ्यांना ३४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक यामाहा बाईक भेट म्हणून दिली.
3: लग्नानंतर महिलेला काय कळाले?
उत्तर: लग्नानंतर महिलेला कळले की, तिचा पती आधीच विवाहित आहे. त्याच्याकडे दुसरी पत्नी आहे आणि त्याने १९ महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत.
4: पतीने गुप्त कॅमेरा कशासाठी बसवला?
उत्तर: पतीने बेडरूममध्ये गुप्त कॅमेरा बसवला आणि त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ तो दुबईतील मित्राला पाठवत असे. महिलेच्या विरोधावर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे.































