Homeदेश-विदेशचार्जरमुळे भारताच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबद्दल रोमांचक प्रकटी

चार्जरमुळे भारताच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबद्दल रोमांचक प्रकटी


पहलगम दहशतवादी हल्ला: जम्मू आणि काश्मीकच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेण्यात आला. यादरम्यान एक सामान्य दिसणारे फोनचे चार्जर अत्यंत महत्त्वाचा पुरवा ठरले आहे. या चार्जरमुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांना 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका ‘ओव्हरग्राउंड वर्कर’ (OGW) चा माग काढण्यास मदत झाल्याची बाब समोर आली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

मोहम्मद युसूफ कटारी (वय २६) याला सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. याने पहलगाममधील तीन दहशतवादी – सुलेमान उर्फ आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना श्रीनगरजवळील झबरवान हिल्स येथे किमान चार वेळा भेटल्याचे समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण लॉजिस्टीक समोर्ट, ज्यामध्ये एक स्मार्टफोन चार्जर दिले होते आणि अखेरीस त्या चार्जरमुळेच त्याला अटक करण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

प्रकरणाचा उलगडा कसा झाला?
ऑपरेशन महादेव मध्ये सापडलेल्या पुराव्यांचे सखोल फॉरेन्सिक अॅनालिसीस केल्यानंतर या प्रकरणात मोठ खुलासा झाला. जुलै महिन्यात श्रीनगरच्या झब्रावन रेंजच्या जवळ ऑपरेशन महादेव ही दहशतवादविरोधी शोध मोहिम राबवण्यात आळी होती. या मोहिमेत पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या ऑपरेशनदरम्यान मिळालेल्या साहित्याची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी महत्वाची माहिती मिळाली होती. मिळालेल्या साहित्यामध्ये अर्धवट नष्ट झालेले अँड्रॉइड फोनचे चार्जर मिळाले होते. ते कोणीचे होते याचा माग काढण्यात आल्यानंतर पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

श्रीनगर पोलिसांनी या चार्जरचा मूळ मालक कोण होता ते शोधून काढले, ज्याने पुष्टी केली की त्याने फोन एका डिलरला विकला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि काही काळात पोलिस कटारी पर्यंत पोहचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की , कटारी हा केवळ एक पॅसिव्ह असोशिएट (passive associate) नव्हता, तर त्याचे काम त्याहूनही बरेच जास्त होते. त्याने या दहशतवाद्यांना डोंगराळ प्रदेशातून रस्ता दाखवण्याचे केले. तसेच, लपून बसलेले असताना त्यांना संपर्कात राहता यावे आणि आपले काम सुरू ठेवता यावे यासाठी लॉजिस्टिक पुरवठा केला, ज्यामध्ये या चार्जरचा देखील समावेश होता. कटारी हा डोंगराळ भागातील भटक्या समुदायातील मुलांना शिकवण्याचे काम करायाचा आणि दहशतवादी संघटनांसाठी तो महत्त्वाचा दुवा होता.

तपासात पुढे काय होणार?

सूत्रांच्या मते, हे प्रकरण लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NAI) सोपवले जाऊ शकते. एनआयए पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील व्यापक कटाची चौकशी करत आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय आणि इतर मदत केल्याच्या आरोपाखाली एनआयएने आधीच इतर दोघांना अटक केली आहे.
29 जुलै 2025 रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्या आलेल्या कारवाईत दहशतवादी सुलेमान उर्फ ​​आसिफ , जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना ठार मारण्यात आले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंजाब काँग्रेसमध्ये फूट: चन्नी यांनी हायकमांडचा निर्णय नाकारला

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंजाब काँग्रेसमध्ये फूट: चन्नी यांनी हायकमांडचा निर्णय नाकारला | काँग्रेस गटात मारामारीलुधियाना20 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंजाबमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या 8 महिने आधी,...

महाभारत: कर्णाची शिकवण:यश फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने मिळाले, तर ते दीर्घकाळ सन्मान मिळवून देऊ...

0
महाभारतात अश्वसेन नावाच्या एका नागाची कथा आहे. खांडव वनात एकदा भयंकर अग्नितांडव झाले होते. या अग्नितांडवात जंगलातील बहुतेक जीवजंतू नष्ट झाले होते. त्याच...

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची...

0
वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या...
spot_img

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...
error: Content is protected !!