Homeदेश-विदेशगुजरात हवामानाचा अंदाज गुजराती बाबा वांगा अंबल पाट गुजरात हवामान भारत हवामान...

गुजरात हवामानाचा अंदाज गुजराती बाबा वांगा अंबल पाट गुजरात हवामान भारत हवामान महाराष्ट्र हवामान


वांगा अंबलल पटेल यांनी गुजरात हवामान अंदाजः फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील अनेक राज्यांना पावसाने झोडपले आहे. अशातच गुजराती ‘बाबा वेंगा’ अर्थात अंबालाल पटेल यांनी केलेली  महाभयानक भविष्यवाणी खरी ठरली आहे. अंबालाल पटेल यांनी जसं सांगितलं अगदी तसचं घडलं आणि घडतयं. यामुळे गुजरातमध्ये नवरात्रीच्या उत्सवाचे नियोजन फसले आहे. अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे हे कार्यक्रम रद्द झाल्याने आयोजकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये पाऊस पडेल असा इशारा आयएमडीने दिला होता. हे दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. भारतातील अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे. आयएमडीने गुजरातच्या अर्ध्या भागासाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दक्षिण गुजरात, मध्य गुजरात तसेच सौराष्ट्रमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. दक्षिण गुजरातच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये भरूच, नर्मदा, सुरत, तापी, डांग, नवसारी, दमण, वलसाड, दादरा नगर हवेली जिल्हे समाविष्ट आहेत. आयएमडीने जुनागड आणि गिर सोमनाथसह भावनगर, अमरेली, वडोदरा, छोटा उदयपूर, दाहोद आणि पंचमहलसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, आनंद, खेडा, महिसागर, अरावली, अहमदाबाद, राजकोट आणि बोटाड जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अंबालाल पटेल यांनी साधारण महिन्याभरापूर्वी गुजरातसाठी पावसाचा अलर्ट दिला होता. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात होईल. दसऱ्या पर्यंत हा पावसाचा अलर्ट असले असे अंबालाल पटेल यांनी म्हंटले होते. या पावसाचा गरबा कार्यक्रमांना फटका बसेल अशा इशारा देखील त्यांनी दिला होता. अंबालाल पटेल यांनी पावसाबाबत जसा इशारा दिला होता अगदी तसचं घडलं आहे. गुजरात राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

कोण आहेत अंबालाल पटेल?

अंबालाल पटेल हे गुजरातचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जातात.  पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा असो अंबालाल पटेल नेहमीच गुजरातमधील लोकांच्या चर्चेत राहतात. याचे कारण म्हणजे हवामानाबाबातचे त्यांचे अचूक मूल्यांकन. अंबालाल वर्षातील 12 महिने हवामानाचा अंदाज वर्तवतात. गुजरातमधील लोक आणि शेतकरी त्यांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात.

अंबालाल पटेल यांचे पूर्ण नाव अंबालाल दामोदरदास पटेल आहे. अंबालाल पटेल यांचा जन्म 1 सप्टेंबर 1974 रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील रुदल येथे शेतकरी दामोदरदास पटेल यांच्या पोटी झाला. त्यांनी आणंद येथील बीएस कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरमधून कृषी विषयात विज्ञान पदवी प्राप्त केली. 1972 मध्ये ते गुजरात सरकारच्या बीज प्रमाणन एजन्सी, अहमदाबाद येथे बियाणे कृषी पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले. नंतर त्यांना कृषी कार्यालयात बढती देण्यात आली, जिथे त्यांनी सहाय्यक कृषी संचालक पदही भूषवले. बियाणे पर्यवेक्षक म्हणून पदार्पण करण्याव्यतिरिक्त, त्यांनी सेक्टर 15 मधील कृषी प्रयोगशाळा गुणवत्ता नियंत्रण कार्यालय आणि माती चाचणी जैविक नियंत्रण कार्यालयातही काम केले. ते सप्टेंबर 2005 मध्ये निवृत्त झाले.

FAQ

1 गुजरातमध्ये सध्या पावसाची स्थिती काय आहे आणि त्याचा परिणाम काय झाला आहे?
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नवरात्रीच्या उत्सवाचे नियोजन फसले असून, अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे आयोजकांचे मोठे नुकसान झाले आहे.

2 आयएमडीने गुजरातसाठी कोणते अलर्ट जारी केले आहेत?
आयएमडीने गुजरातच्या अर्ध्या भागासाठी अलर्ट जारी केला आहे. दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरातच्या जिल्ह्यांसाठी (भरूच, नर्मदा, सुरत, तापी, डांग, नवसारी, दमण, वलसाड, दादरा नगर हवेली) रेड अलर्ट, जुनागड, गिर सोमनाथ, भावनगर, अमरेली, वडोदरा, छोटा उदयपूर, दाहोद आणि पंचमहलसाठी ऑरेंज अलर्ट, तर आनंद, खेडा, महिसागर, अरावली, अहमदाबाद, राजकोट आणि बोटाडसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे.

3 अंबालाल पटेल यांची भविष्यवाणी काय होती आणि ती खरी ठरली का?
अंबालाल पटेल यांनी महिन्याभरापूर्वी गुजरातसाठी पावसाचा अलर्ट दिला होता. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता आणि गरबा कार्यक्रमांना फटका बसेल, असा इशारा त्यांनी दिला होता. ही भविष्यवाणी अगदी खरी ठरली असून, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!