गुंतवणूक योजना: रिझर्व्ह बँकेने यावर्षी रेपो दरात 1.00 टक्के कपात केली असली, तरी पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट (टीडी) योजनेत व्याजदर जैसे थे आहेत. बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केलेयत. असे असताना पोस्ट ऑफिस अजूनही ग्राहकांना उच्च व्याजदर देत आहे. ही योजना बँकांच्या एफडीसारखीच आहे, जी निश्चित कालावधीसाठी हमी परतावा देते. तुम्ही तुमच्या बायकोच्या नावे पोस्टात 1 लाख रुपये गुंतवलात तर किती रुपये रिटर्न मिळतील? याचे गणित समजून घेऊया.
विविध कालावधीचे पर्याय
पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवी उघडता येतात. यामध्ये 1 वर्षासाठी 6.9%, 2 वर्षांसाठी 7.0%, 3 वर्षांसाठी 7.1% आणि 5 वर्षांसाठी 7.5% व्याजदर मिळतो. किमान ठेव ₹1,000 असून, कमाल मर्यादा नाही, त्यामुळे ग्राहकांना हवी तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता.
₹1,00,000 च्या गुंतवणुकीवर परतावा
जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने 2 वर्षांच्या टीडी योजनेत ₹1,00,000 गुंतवले, तर 24 महिन्यांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला ₹1,14,888 मिळतील. यात मूळ रक्कम ₹1,00,000 आणि ₹14,888 व्याज मिळालेले असेल. महत्वाचे म्हणजे हा परतावा पूर्णपणे सुरक्षित आणि हमी असलेला आहे.
सर्वांसाठी समान व्याजदर
पोस्ट ऑफिसची टीडी योजना सर्व ग्राहकांसाठी समान व्याजदर देते. मग ते पुरुष, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असोत, सर्वांना सारखा व्याजदर मिळतो. यामुळे कोणत्याही ग्राहकाला भेदभावाशिवाय समान फायदा मिळतो. ही योजना जोखीममुक्त आणि व्याजदरात चढ-उतार नसणारी असल्याने ग्राहकांची याला पसंती मिळतेय.
फ्लेक्झिबल गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत किमान ₹1,000 पासून गुंतवणूक सुरू करता येते, आणि कमाल मर्यादेची कोणतीही बंधने नाहीत. यामुळे लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांना ही योजना फायदेशीर ठरते. विशेषतः ज्यांना सुरक्षित आणि निश्चित परतावा हवाय त्यांनी या गुंतवणुकीकडे गांभीर्याने पाहायला हवं.
FAQ
पोस्ट ऑफिसच्या २ वर्षांच्या टीडी योजनेत ₹1,00,000 गुंतवल्यास किती परतावा मिळेल?
उत्तर: जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने २ वर्षांच्या टीडी योजनेत ₹1,00,000 गुंतवले, तर २४ महिन्यांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला ₹1,14,888 मिळतील. यामध्ये ₹1,00,000 मूळ रक्कम आणि ₹14,888 व्याज समाविष्ट आहे. हा परतावा पूर्णपणे सुरक्षित आणि हमी असलेला आहे.
पोस्ट ऑफिस टीडी योजनेत कोणते व्याजदर मिळतात?
उत्तर: पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत १ वर्षासाठी 6.9%, २ वर्षांसाठी 7.0%, ३ वर्षांसाठी 7.1% आणि ५ वर्षांसाठी 7.5% व्याजदर मिळतो. ही योजना सर्व ग्राहकांसाठी समान व्याजदर देते, मग ते पुरुष, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असोत.
पोस्ट ऑफिस टीडी योजनेत किमान आणि कमाल गुंतवणूक किती आहे?
उत्तर: पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत किमान गुंतवणूक ₹1,000 आहे, तर कमाल मर्यादेची कोणतीही बंधने नाहीत. यामुळे ग्राहक त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार हवी तितकी रक्कम गुंतवू शकतात, आणि जोखीममुक्त निश्चित परतावा मिळवू शकतात.






























