Homeदेश-विदेशआणि लडाख निषेध आणि निषेध सहावा वेळापत्रक सोनम वांगचुक लडाख जनरल झेड...

आणि लडाख निषेध आणि निषेध सहावा वेळापत्रक सोनम वांगचुक लडाख जनरल झेड निषेध


कायदेशीर निषेध: पर्यटकांच्या (Tourist estination) आवडीच्या ठिकाणांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या लेह लडाखमध्ये सध्या मात्र परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे इथं सुरू असणारं युवा पिढीची आंदोलन. गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये युवा पिढी रस्त्यांवर उतरली असून इथं सरकारविरोधातील निदर्शनं पाहण्यास मिळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून, ताज्या माहितीनुसार या आंदोलनाच्या धर्तीवर लेह लडाख भागात सुरक्षेचा चोख बंदोबस्त करत कारगिल क्षेत्रामध्ये कलम 163 लागू करण्यात आला आहे, तर लेहमध्ये कर्फ्यू लागू झाला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

कलम 163 अंतर्गत कोणते नियम लागू?

वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 लेहमध्ये लागू करण्यात आला असून, इथं पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही लेखी परवानगीशिवा प्रकारचा मोर्चा, निदर्शनं काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

आंदोलनाला हिंसक वळण, चौघांचा मृत्यू…

लेह लडाखमधील आंदोलनात आतापर्यंच चौघांचा मृत्यू झाला असून, 70 हून अधिकजण गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे. गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार सोनम वांगचुक यांनी ‘अरब स्प्रिंग शैलीतील निदर्शनं’ आणि नेपाळमधील ‘जेन झी’ निदर्शनांचा उल्लेख केला आणि त्यादरम्यानच चर्चेच्या वळणावर असणाऱ्या या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं.

राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्ठानुसार राज्याचा दर्जा आणि सुरक्षिततेची मागणी यासंदर्भातील या विरोधी आंदोलनांमध्ये नागरिकांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्याचं पाहता उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांच्या आदेशानंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला.

गृह मंत्रालयानं सदर आंदोलनावर प्रतिक्रिया देत सोनम वांगचुक यांनी राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्ठाला अनुसरून विस्तार आणि लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 10 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. या मुद्द्यावर सरकारकडून लडाख एपेक्स बॉडी (लेह) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सशी सक्रिय संवाद साधत असून, उच्चाधिकार प्राप्त समिति (एचपीसी) आणि उपसमितीअंतर्गत काही औपचारिक बैठकांचंही आयोजन केलं जात आहे, इतकंच नव्हे तर स्थानिक नेत्यांशीसुद्धा या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे.

मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार या पद्धतीमुळं संवादाच्या माध्यमातून लडाखमधील अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण 45 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के करणं, परिषदांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणं, भोटी- पुर्गीला अधिकृत भाषेचा दर्जा देणं अशा मागण्याही पुढे आल्या आहेत. याशिवा. विविध 1800 पदांवर भरती प्रपर्पियाही सुरू झाली आहे. ज्या मागण्यांसाठी वांगचुक यांनी उपोषणस केलं त्यावर आधीपासूनच चर्चा सुरू होत्या, मात्र कैक नेत्यांनी उपोषण सोडण्याची वारंवार विनंती करूनही त्यांनी आंदोलन आणि उपोषण सुरूच केलं शिवाय नेपाशमधील Gen X च्या आंदोलनांसह अरब स्प्रिंग शैलीतील विरोध- निदर्शनांचा हवाला देत त्यांनी जनतेची दिशाभूल करत आंदोलनाला वेगळं वळण दिल्याचा आरोप केला.

सोनम वांगचुक यांनीच आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून नागरिकांना आंदोलनासाठी प्रवृत्त केलं. यादरम्यान त्यांनी उपोषण सोडलं आणि या तणावग्रस्त परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचा कोणताही प्रयत्न न करता ते रुग्णवाहिकेनं थेट आपल्या गावाला निघून गेले अशा शब्दांत त्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

आंदोलनामागे अदृश्य शक्ती आणि कटकारस्थानं-  उपराज्यपाल

लेह लडाखमधील तणावाची परिस्थिती पाहता, उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी लेहमधील या आंदोलनाला हिंसक आणि तणावाचं वळण देण्याच्या प्रयत्नांमागे बांदलादेश आणि नेपाळमधील निदर्शनं आणि हिंसेशी तुलना करण्याचा कट असल्याचं स्पष्ट केलं. आंदोलनावर चर्चेच्या मार्गानं तोडगा काढला पाहिजे असं म्हणत इथं सातत्यानं तणावाला वारा घालत हा वणवा आणखी भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप नाव न घेता काही व्यक्तींवर केला.

FAQ

लेह लडाख आंदोलनाची पार्श्वभूमी काय?
आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट 2025 मध्ये कर्गिलमधील स्थानिक संस्थांकडून सहाव्या अनुसूचीसाठी केलेल्या तीन दिवसांच्या निदर्शनांपासून झाली. 10 सप्टेंबरला पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लेहमध्ये 35 दिवसांचे उपोषण सुरू केले, ज्यात लडाखला पूर्ण राज्यत्व आणि संरक्षणात्मक दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. हे ‘जेन झेड’ (Gen Z) आंदोलन म्हणून ओळखले जाते, ज्यात युवा पिढी सहभागी झाली.

आंदोलनात किती मृत्यू आणि जखमी झाले?
गेल्या 24 तासांत लेहमध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 70 ते 100 हून अधिक जण (त्यात 40 पोलिसांचा समावेश) गंभीर जखमी झाले आहेत. हिंसेत दगडफेक, आगीच्या घटना आणि पोलिस गोळीबार झाला.

लेहमध्ये कलम 163 लागू करण्यात आले ते काय?
2023 च्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (Bharatiya Nagarik Suraksha Sanhita) कलम 163 लागू करण्यात आले आहे, जे जुने कलम 144 चे समतुल्य आहे. यानुसार, 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. कोणत्याही लेखी परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शन किंवा सभा घेण्यासही प्रतिबंध आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!