Homeदेश-विदेशगुजरात राजकोट येथे फेसबुकवर आजोबांच्या मृत्यूच्या पोस्टवर हसणार्‍या इमोजीवर एका व्यक्तीने वार...

गुजरात राजकोट येथे फेसबुकवर आजोबांच्या मृत्यूच्या पोस्टवर हसणार्‍या इमोजीवर एका व्यक्तीने वार केले.


गुजरातमधील राजकोटमध्ये फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादात एका 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. प्रिन्स असं या पीडित तरुणाचं नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याची प्रकृती बिघडली. त्याने तक्रार दाखल केली आणि रुग्णालयातूनच पोलिसांकडे जबाब नोंदवला. पण नंतर त्याचा मृत्यू झाला. गुजरात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

20 वर्षीय प्रिन्स कुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. आपल्या तीन चुलत भावांसोबत गुजरातमधील एका कारखान्यात तो काम करत होता. त्याचे आजोबा रूपनारायण भिंड यांचं चार महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या आठवणीत प्रिन्सने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. प्रिन्सचा बिहारमधील ओळखीचा बिपिन कुमार राजिंदर गोंड याने या पोस्टवर हसणारा इमोजी टाकला. या इमोजीवरुन दोघांमध्ये वाद झाला. फोनवरुन सुरु झालेला हा शाब्दिक वाद नंतर हाणामारीत रुपांतरित झाला.

एफआयआरनुसार, 12 सप्टेंबरच्या रात्री, 12.30 च्या सुमारास प्रिन्स ज्या कारखान्यात काम करत होता त्या कारखान्याबाहेर ऑटो रिक्षात बसला होता तेव्हा त्याने बिपिनला त्याच्याकडे येताना पाहिले. प्रिन्स कारखान्यात जाण्यासाठी वळला, परंतु दुसरा आरोपी ब्रिजेश गोंड याने त्याचा रस्ता अडवला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान, बिपिनने प्रिन्सवर चाकूने वार केले.

प्रिन्सच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे सहकारी मदतीला धावले आणि त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. नंतर त्याला राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, प्रिन्सच्या पाठीवर दीड ते दोन इंच खोल जखम झाली होती. तथापि, रुग्णालयात दाखल होताना तो शुद्धीवर होता आणि त्याने पोलिसांना जबाब दिला.

प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्याची दुखापत गंभीर असल्याचं म्हटले नव्हतं. परंतु चार दिवसांनंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आलं. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 वाजता प्रिन्सचा मृत्यू झाला. सकाळी 6.35 ला पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत हत्येशी संबंधित कलम 103 (1) एफआयआरमध्ये जोडला. मुख्य आरोपी बिपिनला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आणि मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दुसरा आरोपी ब्रिजेश फरार आहे. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. प्राथमिक अहवालात जखमा आणि संसर्ग दोन्ही संभाव्य कारणे असू शकतात असं मनूद कऱण्यात आलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!