विमान गुप्त जागा: विमानातून प्रवास करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सोमवारी एका 13 वर्षीय मुलाने विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून केलेल्या प्रवासाची घटना चर्चेत आहे. सोमवारी इराणला जाण्यासाठी उत्सुक असलेल्या अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून दिल्ली विमानतळावर पोहोचला. हैराण करणारी गोष्टी ही की 36,000 फूट उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी असताना आणि जोरदार वारा असतानाही तो जिवंत राहिला. पण ही घटना काही नवीन नाही, यापूर्वी सुद्धा अनेक लोकांनी हे केले आहे.
विमान लपण्याच्या काही सीक्रेट जागा :
विमानातील लँडिंग गियर ही अशी जागा आहे जिथे लोक अनेकदा घुसतात. लँडिंग गियर टेकऑफ आणि लँडिंगसाठी डिझाइन केलेले आहे. जेव्हा विमान जमिनीवर असते तेव्हा त्याची चाके बाहेर असतात, ज्यामुळे पुरेशी जागा मिळते. पण उड्डाण सुरू होताच, ही चाके लँडिंग गियरमध्ये दुमडतात, ज्यामुळे येथे खूप कमी जागा उरते. इतक्या लहान जागेत लपणे खूप कठीण असले तरी इथून लपून प्रवास करणं शक्य आहे.
इथे लपण म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं :
विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपण म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. याच कारण म्हणजे उंचावर जाताच विमानामध्ये तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल खूप कमी असते. तसेच लँडिंग गियरमध्ये इंजनचा आवाज सुद्धा खूप जोरात येतो. ज्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. एवढंच नाही तर विमानाच्या लँडिंग दरम्यान तिथे लपलेल्या व्यक्तीचा चुरा होण्याचा धोका असतो. त्यामुळेच इथे लपण अतिशय धोकादायक असतं. अशा अनेक घटना यापूर्वी नोंदवल्या गेल्या आहेत. सुरक्षेतील त्रुटी किंवा आपत्कालीन परिस्थितीत या घटना अनेकदा घडतात.
नक्की वाचा >> 1100 जमिनीवर मशिदीचा दावा; भारतातील सर्वात वादग्रस्त खटल्यात कोर्टाने दिला जबरदस्त निर्णय
FAQ:
मुलगा कसा जिवंत राहिला?
विमानाची उंची 36,000 फूट असताना ऑक्सिजनची पातळी कमी आणि तापमान -50°C पेक्षा खाली असते, तरीही तो 1.5 तासांच्या प्रवासात जिवंत राहिला. कारण प्रवास छोटा असल्याने हायपोथर्मिया (थंडीचा त्रास) आणि ऑक्सिजन अभाव पूर्ण झाला नाही. त्याला हलक्या जखमांसह सापडला आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तोच विमानाने परत पाठवण्यात आला.
लँडिंग गियरमध्ये लपण्याची जागा कशी असते?
लँडिंग गियर ही विमानाची चाके ठेवण्याची जागा आहे. जमिनीवर असताना पुरेशी जागा असते, पण उड्डाणानंतर चाके आत दुमडली जातात, ज्यामुळे जागा खूपच कमी होते. ही जागा धोकादायक असते कारण इंजनचा आवाज जोरदार, वारा प्रचंड आणि यांत्रिक भाग चर्रावत असतात.
भारतात यापूर्वी अशी घटना घडली आहे का?
होय, भारतात ही दुसरी नोंदलेली घटना आहे. 1996 मध्ये दोन भावंडे (प्रदीप सैनी 22 आणि विजय सैनी 19) दिल्लीहून लंडनसाठी ब्रिटिश एअरवेजच्या विमानाच्या व्हील वेलमध्ये लपले. अफगाण मुलाची ही दुसरी घटना आहे.
































