Homeदेश-विदेशधक्कादायक व्हायरल न्यूज 13 वर्षाचा अफगाण मुलगा हयात आहे landing minute मिनिटांच्या...

धक्कादायक व्हायरल न्यूज 13 वर्षाचा अफगाण मुलगा हयात आहे landing minute मिनिटांच्या विमानात लँडिंग गियर दिल्ली इंडियामध्ये उतरला


13 वर्षांचा अफगाण मुलगा विमान लँडिंग गियरमध्ये उड्डाणात प्रवास केला: विमान प्रवासाची अनेकांच्याच मनात भिती असते. ही भिती अनेक प्रकारची असते. काहींना उंचीची भिती वाटते, काहींना कोंदट वातावरणाचा त्रास होतो. मात्र एक थरारक विमान प्रवास करत 13 वर्षीय मुलानं भितीचे हे सर्व प्रकार नगण्य ठरवत सर्वांनाच धक्का दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार या मुलानं चक्क विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसून प्रवास केला.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

मूळचा अफगाणिस्तानातील हा मुलगा काबूलहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करत भारतात पोहोचल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर हा मुलगा सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिथं वावरताना आढळला. विचारपूस केली असता हा मुलगा छुप्या पद्धतीनं इराणला जाऊ इच्छित होता, मात्र चुकून तो भारतात येणाऱ्या विमानात बसला आणि दिल्लीत पोहोचला. ज्यानंतर आता काबुल विमानतळावरील सुरक्षिततेसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार काबुलहून दिल्लीला येणाऱ्या विमान क्रमांक आरक्यू4401 ला या प्रवासासाठी साधारण 94 मिनिटं लागली. या विमान प्रवासादरम्यान हा मुलगा विमानाच्या मागील चाकाच्या वरील भाहामध्ये बसून राहिला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे विमान काबुलहून 8.46 वाजता रवाना होऊन 10.20 मिनिटांनी भारतात टर्मिनल 3 इथं पोहोचलं.

घटनाक्रम वाचून व्हाल हैराण…

अफगाणी मुलानं चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार त्यानं काबुल विमान प्रवासादरम्यान प्रवाशांमागोमाग तिथं विमानात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांदरम्यान त्यानं व्हीलमध्ये अर्थात चाकात प्रवेश केला. विमानाने उड्डाण केल्यानंतर प्रचंड थंड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेसारख्या जीवघेण्या परिस्थितीतही तो कसा तग धरू शकला हाच प्रश्न सध्या तज्ज्ञांना पडत आहे. माध्यमांनुसार या मुलाचं वय 13 ते 15 वर्षांदरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुलाकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र किंवा प्रवास दस्तऐवज आढळला नसून, अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे अनेकजण देश सोडण्याचा प्रयत्न करत असतानाच ही अशी घटना घडणंही या अस्थिरतेचाच एक भाग असल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान या मुलाला सध्या ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अफगाण दूतावासाशी संपर्क साधला असून, पुढील कारवाई सुरू केल्याची माहिती जारी केली आहे.

जाणकार काय म्हणतात?

जाणकारांच्या मते 10000 फूट उंचीहून अधिक अंतरावर गेल्यानंतर ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी होत काही क्षणांत बेशुद्ध व्हायला होतं. यातच उणे 40 ते 60 अंशांमध्ये हिमदंशामुळं हायपोथर्मियानं मृत्यू ओढावतो. त्यामुळं अशा विमानाच्या चाकातून प्रवास करणाऱ्या पाच जणांतून एकाच्याच वाचण्याची शक्यता असते. त्यामुळं आता या प्रकरणानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

FAQ

अफगाणिस्तानातून आलेल्या त्या मुलाचा उद्देश काय होता?
इराणमध्ये जाण्याचा होता, पण चूकने दिल्लीच्या विमानावर चढलं. कुतूहल आणि अस्थिरतेमुळे असा प्रयत्न केला असावा.

कसा होता त्या मुलाचा प्रवास?
प्रवास छोटा (94 मिनिटे) आणि कमी उंचीमुळे या मुलावर ऑक्सिजन आणि थंडीचा पूर्ण परिणाम झाला नाही. अन्यथा, 77% प्रकरणांमध्ये मृत्यू होतो.

विमानतळ सुरक्षेत काय सुधारणा अपेक्षित?
सदर घटना पाहता बोर्डिंग आणि चाक खोलीची तपासणी आणखी कठोर व्हावी यासाठी CISF आणि विमान कंपन्यांवर अधिक जबाबदारी.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!