Homeदेश-विदेशसिंगापूरमधील स्कूबा डायव्हिंग अपघातात बॉलिवूड गायक झुबिन गर्ग यांचे निधन झाले

सिंगापूरमधील स्कूबा डायव्हिंग अपघातात बॉलिवूड गायक झुबिन गर्ग यांचे निधन झाले


स्कूबा डायव्हिंगमध्ये भारतीय गायक मरण पावले: प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे आकस्मिक निधन झालं आहे. ‘या अली’ गाण्याने देशातील घरोघरात पोहोचलेल्या झुबिनच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी झुबिन गर्गने जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात झुबिनचं निधन झालं. झुबिनच्या अशा आकस्मिक निधनामुळे अनेकांना प्रसिद्ध गायक के. के.च्या मृत्यूची आठवण झाली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

कॅबिनेट मंत्र्याने केला खुलासा

अभिनेता इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गँगस्टर’ या बॉलीवूड चित्रपटातील ‘या अली’ या सुपरहिट गाण्याने गर्गने देशभरात लोकप्रियता मिळाली होती. आसामचे कॅबिनेट मंत्री अशोक सिंघल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये झुबिनच्या मृत्यूचा दुजोरा दिला आहे.

सिंगापूरमध्ये अपघात कसा झाला?

वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, अपघात झाला तेव्हा झुबिन गर्ग स्कूबा डायव्हिंग करत होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पोलिसांनी त्यााला ताबडतोब समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. गर्गला समुद्रातून बाहेर काढून वाचवण्यात आले आणि सीपीआर देण्यात आला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. जुबिन गर्ग सिंगापूर नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमधील एका शोमध्ये सहभागी होणार होता. परंतु त्यापूर्वीच एक दुर्दैवी घटना घडली. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अडीच वाजता गर्गचा मृत्यू झाला. झुबिन अवघ्या 52 वर्षांचा होता.

काय म्हणालेत कॅबिनेट मंत्री?

“आमच्या लाडक्या झुबिन गर्गच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे. आसामने केवळ एक आवाजच नाही तर आपल्या हृदयाचे ठोकेही गमावले आहेत. झुबिनदा केवळ एक गायक नव्हता तो आसाम आणि राष्ट्राचे अभिमान होता. त्याच्या गाण्यांनी आपली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी अगदी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचा वारसा इतरांना प्रेरणा देत राहो. ओम शांती,” असं अशोक सिंघल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शुन्यातून सुरुवात

झुबिन गर्गचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी मेघालयातील तुरा येथे एका आसामी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्याचे नाव प्रसिद्ध संगीतकार झुबिन मेहता यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याने गायनाला सुरुवात केली. त्याची आईच त्याच्या पहिल्या गुरू होत्या. त्याने आईकडूनच संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पंडित रॉबिन बॅनर्जी यांच्याकडून 11 वर्षे तबल्याचं शिक्षण घेतलं. गुरू रमणी राय यांच्याकडून आसामी लोकसंगीताचं प्रशिक्षण घेतलं. शालेय जीवनातच तो गाणी रचत आणि इतरांना गायला लावायचा. त्यांची धाकटी बहीण प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका जोंगकी बोरठाकूर हिचं 2002 मध्ये कार अपघातात निधन झाले होते. तिच्या स्मरणार्थ झुबिनने ‘शिशु’ हा अल्बम काढला होता.

40 भाषांमध्ये काम

झुबिन गर्गने आसामी चित्रपटसृष्टीतून करिअरला सुरुवात केली आणि हळूहळू हिंदी, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगु, पंजाबी, नेपाळी, मराठी, मल्याळम यासह 40 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली. तो गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून कार्यरत होता.  त्याच्या अचानक निधनाने केवळ त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे तर संपूर्ण आसामी समुदायाला आणि भारतीय संगीत जगताला खूप दुःख झाले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!