Homeदेश-विदेशViral News : 'तुमचा मुलगा वाचणार नाही,' डॉक्टरांनी टेकले हात, पण आईने...

Viral News : ‘तुमचा मुलगा वाचणार नाही,’ डॉक्टरांनी टेकले हात, पण आईने फक्त Google च्या आधारे वाचवले प्राण


व्हायरल न्यूज : स्त्री ही आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी कुठल्याही संकटाला तोंड देते. जेव्हा तिच्यासमोर नवरा किंवा मुलं संकटात असतं, तेव्हा ती कुठलीही सीमा पार करुन त्यांना त्या संकटातून बाहेर काढते. जेव्हा आपल्या लेकराला काही होतं तेव्हा आई कासावीस होते. अशातच एका आई आणि लेकीची ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आईच्या त्या एका कृतीमुळे तिने आपल्या लेकाचे प्राण वाचवले आहेत. झालं असं की, अमेरिकेतील लुब्बॉसमधील सहा वर्षांच्या विटन डॅनियलची तब्येत खराब झाली. त्याने आईला सांगितलं की, त्याचं डोकं दुखतंय आणि चक्कर येत आहे. एवढंच नाही तर चालणं, बोलणं अगदी श्वास घ्यायला पण त्याला त्रास होतोय. आई घाबरली आणि तिने लगेचच त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, त्याला फ्लू झाला आहे असं सांगितलं.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

पण आईने गुगलवर सर्च केलं अन्..?

लेकाची परिस्थिती पाहून आईला चैन पडत नव्हता. म्हणून विटनची आई केसी डॅनियलने गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. त्याला असलेले लक्षणं तिने गुगलवर टाकले आणि त्या सर्चमध्ये जे काही समोर आले ते अतिशय धक्कादायक होतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली.

न्यूयॉर्क पोस्टमधील एका रिपोर्टनुसार, विटनची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात त्याला नेलं खरं पण डॉक्टरांनी त्याला फ्लू असल्याचं सांगितलं. पण 24 तासांत त्याची प्रकृती खालावली. हळूहळू, विटनला श्वास घेण्यास, बोलण्यास आणि चालण्यास त्रास व्हायला लागला. एवढंच नाही तर तो काही वेळातच बेशुद्धही पडला. आता आईची काळजी आणि भीती वाढली. डॉक्टरांनी ताबडतोब त्याला इंट्युबेट केलं आणि टेस्ट करायला सुरुवात केली, ज्यामध्ये फ्लूपेक्षाही गंभीर आजार असल्याच समोर आलं. तिला जी लक्षणं होती ती कॅव्हर्नस मालफॉर्मेशन किंवा कॅव्हर्नोमा या आजाराची होती.

500 पैकी फक्त एकालाच हा आजार होतो. अलायन्स टू क्युअरच्या मते, अनेक रुग्णांना कधीच या आजाराचे लक्षणं दिसून येत नाहीत. कॅव्हर्नोमाच्या लक्षणांमध्ये रक्तस्त्राव होणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि दृष्टी समस्या होतात. तर 20 टक्के रुग्णांमध्ये हा आजार जेनेटिक असतो असं डॉक्टर सांगतात. डॉक्टरांनी विटनची आई केसी डॅनियल यांना उपचारांच्या दुष्परिणामांबद्दल इशारा दिला होता. जरी विटन जिवंत राहिला तरी तो कधीही चालू शकणार नव्हता. आयुष्यभर व्हेंटिलेटर आणि फीडिंग ट्यूबवर त्याला राहवे लागणार आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्याच्या आजारपणापूर्वी फक्त दोन आठवड्यांपूर्वी, विटनला त्याच्या बेसबॉल संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.

विटनच्या आईने आपल्या लेकाचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरु केली. गुगलवर या आजाराबद्दल सर्च करायला सुरुवात केली. या आजाराबद्दल माहिती शोधत असताना, तिला ह्यूस्टनमधील यूटी हेल्थ हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. जॅक मोरकोस यांचा एक लेख आढळला. डॉ. जॅक्स कॅव्हर्नोमाच्या उपचारात तज्ज्ञ आहेत. केसी यांनी डॉ. मोरकोस यांना ईमेल पाठवला आणि त्यांनी लगेचच त्याचं उत्तर त्यांना पाठवलं. विटनला ह्यूस्टनला घेऊन या असं सांगण्यात आलं.

विटनला एअर अॅम्ब्युलन्सने ह्यूस्टनला घेऊन जाण्यात आलं. जिथे डॉ. मोरकोस आणि बालरोग न्यूरोसर्जन डॉ. मनीष शाह यांनी चार तासांची सर्जरी करुन त्याचे प्राण वाचवले. काही तासांतच, विटन शुद्धीवर आला आणि स्वतः बोलू आणि श्वास घ्यायला सुरुवात केली. सहा आठवड्यांच्या उपचारानंतर तो बरा झाला. विशेष म्हणजे त्याच्या सातव्या वाढदिवसापूर्वी घरी परतला असून आता तो आता शाळेत जातो आणि बेसबॉलही खेळतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!