Homeदेश-विदेशThe price of 'these' electronic items will be reduced, from September 22...

The price of ‘these’ electronic items will be reduced, from September 22 know New GST Rates | New GST Rates: ‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत होणार कमी, 22 सप्टेंबरपासून किती टक्के बचत होणार जाणून घ्या


‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत कमी होईल: भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलने नुकताच घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत मोठी घसरण होणार आहे. हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. काय आहे निर्णय? कसा होणार फायदा याबद्दल जाऊन घेऊयात…

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

काय आहे नवा निर्णय?

आतापर्यंत भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 28% पर्यंत GST आकारला जात होता. यामध्ये टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यांसारख्या मोठ्या घरगुती उपकरणांचा समावेश होता. आता या सर्व वस्तूंना 28% ऐवजी 18% GST स्लॅबमध्ये आणण्यात आले आहे. परिणामी, ग्राहकांना या वस्तू खरेदी करताना 10 टक्क्यांपर्यंत थेट दिलासा मिळणार आहे.

किती होईल बचत?

उदाहरणार्थ, एखाद्या टीव्हीची बाजारभाव किंमत 30,000 असल्यास, जुन्या 28% GST दराने ग्राहकांना जवळपास 8,400 कर भरावा लागत होता. पण आता नवीन 18% दरामुळे कर फक्त 5,400 आकारला जाईल. म्हणजेच ग्राहकांना सरळ 3,000 बचत होणार आहे. एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तूंवरही अशीच बचत होईल.

कुठल्या वस्तूंवर परिणाम?

मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. पूर्वी 28% दराने विकल्या जाणाऱ्या वस्तू आता 18% दराने उपलब्ध होतील. मात्र लॅपटॉप, मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांवर आधीच 18% दर लागू असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही फरक पडणार नाही.

उद्योग आणि ग्राहकांमध्ये उत्सुकता

या बदलामुळे सणासुदीच्या खरेदीच्या हंगामात ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. नव्या दरांची अंमलबजावणी होऊन बाजारातील विक्री वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादक आणि रिटेलर्सनाही विक्रीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जुन्या स्टॉकवर गोंधळ

जुन्या स्टॉकवर (old inventory) नवीन दर लागू होणार की नाही, यावर मात्र उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू आहे. काही विक्रेत्यांनी आधीच्या दराने वस्तू खरेदी केल्या आहेत, त्यामुळे त्या वस्तूंवर नवीन दरांचा फायदा ग्राहकांना मिळेल का याबाबत शंका आहे. सरकार लवकरच याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

एकंदरीत, 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या GST बदलामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार असून ग्राहकांना 10% पर्यंत थेट फायदा होणार आहे. आगामी नवरात्री आणि दिवाळीच्या खरेदीसाठी ही बातमी ग्राहकांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’चे आयोजन

0
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध...

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!