Love Affair News: बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण त्याच्या मेहुणीसोबतच पळून गेला. तरुणाने पत्नीच्या बहिणीलाच पळवून नेल्याचे समोर आले मेहुणीसोबत पळून गेल्याचे लक्षात येताच तिच्या भावाने तरुणाच्या बहिणीलाच पळवून नेले आहे. पोलिसांनी मंगळवारी या घटनेची पुष्टी करत माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरानिया गावातील रहिवाशी केशव कुमार त्याच्या 19 वर्षीय मेहुणीला घेऊन पळून गेला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मेहुणा रवींद्र केशव कुमारच्या बहिणीसोबत पळून गेला.
प्रभारी निरीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव कुमार आणि त्याच्या मेहुणीला व बहिणीला 15 आणि 15 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयाच्या सहमतीने प्रकरण संपवण्यात आले आहे. तसंच, कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवरानिया ठाणे क्षेत्रातील गावाचा रहिवाशी केशव याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन मुलंदेखील आहेत. पोलिसांनी सांगितले की, संसार सुरू असतानाच तरुणाचा त्याच्या मेहुणीवर जीव जडला. तर केशवची बहिणीचे त्याचा मेहुणा रविंद्रवर प्रेम होते. दोघांचे अफेअरदेखील सुरू झाले होते.
या घटनेनंतर दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचा वातावरण होते. दोन्ही जोडप्यांना एकत्र राहुद्यात असा सल्ला कुटुंबीतील जेष्ठांनी दिला. त्यामुळं पोलिस ठाण्यातच हे प्रकरण सोडवण्यात आले. मात्र या प्रकरणाची संपूर्ण शहरात एकच चर्चा होती.
FAQ
1. बरेली जिल्ह्यातील ही घटना नेमकी काय आहे?
बरेली जिल्ह्यातील देवरानिया गावात एक तरुण, केशव कुमार, त्याच्या 19 वर्षीय मेहुणी सोबत पळून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केशवचा मेहुणा, रवींद्र, केशवच्या बहिणीसोबत पळून गेला.
2. ही घटना कधी घडली?
ही घटना सप्टेंबर 2025 मध्ये घडली. केशव आणि त्याची मेहुणी 14 सप्टेंबर रोजी पळून गेले, तर रवींद्र आणि केशवची बहीण 15 सप्टेंबर रोजी पळून गेले.
3. पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली?
पोलिसांनी 15 सप्टेंबर रोजी केशव, त्याची मेहुणी आणि केशवच्या बहिणीला ताब्यात घेतले. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने हे प्रकरण मिटवण्यात आले, आणि कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याची विनंती कुटुंबांनी केली.
































