Homeदेश-विदेशबीएमडब्ल्यू कार क्रॅशचा व्हिडिओ व्हायरल झाला बीएमडब्ल्यू पीडितांवर पलटी झाला होता.

बीएमडब्ल्यू कार क्रॅशचा व्हिडिओ व्हायरल झाला बीएमडब्ल्यू पीडितांवर पलटी झाला होता.


दिल्ली बीएमडब्ल्यू क्रॅश: दिल्लीमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या बीएमडब्ल्यूने दुचाकीला दिलेल्या धडकेत अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी नवज्योत सिंग यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत. बीएमडब्ल्यू इतक्या वेगात होती की धडकेनंतर तीदेखील रस्त्यावर पलटी झाली होती. या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एकीकडे कार पलटलेली असून, दुसरीकडे पीडित रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसत आहेत. दांपत्य घरी परतत असताना रस्त्यात कारने त्यांना धडक दिली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

या दुर्घटनेत बीएमडब्ल्यू एक्स 5 चालवणारी महिला गगनप्रीत कौर आणि प्रवासी सीटवर असलेला तिचा पती परिक्षित हेदेखील जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुग्रामचे रहिवासी गगनप्रीत आणि परिक्षित मक्कर यांनी दुर्घटनेनंतर पीडितांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी टॅक्सीने अपघातस्थळापासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात दाखल केलं.

अपघातानंतर व्हिडिओमध्ये नवज्योत सिंग  आणि संदीप कौर धौला कुआं-दिल्ली कॅन्ट स्ट्रेचवरील मेट्रो पिलर क्रमांक 67 जवळ रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. लक्झरी कार देखील रस्त्याच्या कडेला पडलेली दिसत आहे आणि रोड डिव्हायडरजवळ एक मोटारसायकल दिसत आहे.

हॉस्टिपल आरोपीच्या वडिलांच्या मालकीचं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांना दाखल कऱण्यात आलेलं जीटीबी नगरमधील न्युलाइफ हॉस्पिटल हे आरोपी गगनप्रीतच्या कुटुंबाच्या सह-मालकीचे आहे. सूत्रांनी सांगितले की, तिचे वडील तीन भागीदारांपैकी एक आहेत. त्यामुळेच तिने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिथे नेलं.

पीडित विनंती करत असतानाही 19किमी दूर नेलं

“मी तिला आम्हाला जवळच्या रुग्णालयात नेण्याची वारंवार विनंती करत होते. माझे पती बेशुद्ध होते आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. पण मी वारंवार विनंती करूनही, तिने आम्हाला दूरच्या एका लहान रुग्णालयात नेलं,” असं शिक्षिका असणाऱ्या संदीप कौर यांनी पोलिसांना सांगितलं आहे, ज्याच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला.

नवज्योत अर्थ मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत होते

52 वर्षीय नवज्योत सिंग हे अर्थ मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत होते. संदीप यांनी सांगितलं आहे की, त्यांनी हेल्मेट घातले होते आणि नवजोत यांनी पगडी घातली होती. नवजोत यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. संदीप यांना अनेक फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्यांच्या डोक्याला १४ टाके पडले आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे की व्हीआयपी क्रमांक असलेली बीएमडब्ल्यू वेगाने जात होती. “कार इतक्या वेगाने चालवली जात होती की आमच्या बाईकला धडकल्यानंतर ती उलटली,” असं त्यांनी सांगितलं. संदीप यांच्यावर आता दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वडिलांना इतक्या दूर रुग्णालयात का नेलं? मुलाची विचारणा

नवज्योत सिंग यांचा मुलगा नवनूर सिंग याने त्यांच्या पालकांना अपघातस्थळापासून इतक्या दूर असलेल्या रुग्णालयात का नेण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्याने सांगितलं की, जर वडिलांना जवळच्या रुग्णालयात नेलं असतं तर कदाचित वाचले असते. “वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. कदाचित त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असते तर ते वाचले असते,” असा दावा त्याने केला आहे.

एका मित्राने त्यांना फोन करून अपघाताबद्दल सांगितलं असल्याचं तो म्हणाले. “मला वाटलं की हा एक किरकोळ अपघात असावा कारण माझे वडील फार काळजीपूर्वक गाडी चालवायचे. मला फारशी काळजी नव्हती. पण जेव्हा आम्ही रुग्णालयात गेलो तेव्हा धौला कुआंजवळ अपघात झाला असताना माझ्या पालकांना जीटीबी नगर येथील रुग्णालयात का दाखल करण्यात आले हे मला समजले नाही,” असे ते म्हणाले.

त्यांनी असाही आरोप केला की, त्यांच्या पालकांना तिथे कोणी आणले याबद्दल रुग्णालयाने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. “मी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना माझ्या पालकांना इथे कोणी आणले याबद्दल विचारत राहिलो आणि नर्सेसपासून ते डॉक्टरांपर्यंत, सर्वांनी सांगितले की ते इथे आहेत, बाहेर बसले आहेत. पण मला कोणीही सापडलं नाही. नंतर, मला कळले की माझ्या वडिलांच्या शेजारी असलेल्या हॉस्पिटलच्या बेडवर असलेल्या रुग्णाचाही अपघातात सहभाग होता,” तो म्हणाला.

“सुमारे पाच तासांनंतर, मी एका डॉक्टरला वैद्यकीय-कायदेशीर प्रमाणपत्र तयार करताना आणि त्यात गगनप्रीतचे नाव टाकताना पाहिले. मी विचारले, “तुम्ही बनावट कागदपत्र का तयार करत आहात?” चौकशी केल्यावर मला कळले की त्या महिलेवर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत,” असं तो म्हणाला.

FAQ

1) दिल्ली BMW कार अपघात प्रकरण काय आहे?
१४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १ वाजता, दिल्लीतील धौला कुआन येथे रिंग रोडवर (दिल्ली कँट मेट्रो स्टेशनजवळ) एका BMW X5 कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही कार गुरुग्राममधील एका महिलेकडून चालवली जात होती, आणि तिच्या पतीसोबत होती. मोटरसायकलवर असलेल्या जोडप्याला धडक बसली, ज्यामुळे मोटरसायकल रोड डिव्हायडर आणि बसला धडकली. BMW कार उलटली आणि तिच्या समोरच्या भागास मोठे नुकसान झाले, एअरबॅग फुटल्या. या अपघातामुळे एक जण मृत्युमुखी पडला आणि तीन जण जखमी झाले.

2) अपघातात कोण मृत्युमुखी पडला आणि जखमी कोण आहेत?

मृत्यू झालेला म्हणजे नवजोत सिंग (५२), अर्थ मंत्रालयातील (मिनिस्ट्री ऑफ फायनान्स) डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे डेप्युटी सेक्रेटरी. ते हरि नगर येथील रहिवासी होते आणि बंगला साहिब गुरुद्वाराहून घरी परतत होते. त्यांची पत्नी संदीप कौर (५०) गंभीर जखमी असून, त्यांना डोक्यावर आणि इतर ठिकाणी दुखापत झाली आहे. ती सध्या द्वारकातील वेंकटेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. BMW कारमधील महिलेचे नाव गगनप्रीत कौर असून, तिचा पती परिक्षित (व्यवसायी) हेही जखमी असून, ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

3) अपघात कसा घडला आणि कारण काय?
नवजोत सिंग आणि त्यांची पत्नी मोटरसायकलवर दिल्ली कँटकडे जात असताना, मागून वेगाने आलेल्या BMW कारने त्यांना धडक दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, कारचालक महिलेची गाडी वेगाने चालवत होती, ज्यामुळे अपघात झाला. डोळस साक्षीदारांनी सांगितले की, महिलाच कार चालवत होती आणि तिचा पती सोबत होता. अपघातानंतर कार उलटली आणि मोटरसायकल डिव्हायडरला धडकली. पोलिस स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगची तपास करत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!