Homeदेश-विदेशबँकिंग क्षेत्रात भारतीय बँकेचे विलीनीकरण मोठे अद्ययावत १२ सरकारी बँका

बँकिंग क्षेत्रात भारतीय बँकेचे विलीनीकरण मोठे अद्ययावत १२ सरकारी बँका


12 सरकारी बँका बँक विलीनीकरण: भारताच्या बँकिग क्षेत्रात खळबळ माजवणारी घडामोड घडणार आहे. भारतातील 12 मोठ्या सरकारी बँकांचे विलिनीकरण होणार आहे. जागतिक पातळीवर बँकिग क्षेत्रात स्पर्धा करण्यासाठी सरकाने हा निर्णय घेतला आहे. बँकिंग कर्मचाऱ्यांसह लाखो खातेधारकांवर येथील याचा परिणाम होणार आहे. लवकरच  विलिनीकरणाच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

भारत सरकार जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रात स्पर्ध करण्यासाठी मोठा निर्णय घेणार आहे. भारत सरकार मोठी बँक स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाची आणखी एक फेरी राबविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. बँंकांच्या विलीनीकरणाबाबत लवकरच एक बैठक घेतली जाणार आहे.
देशात 27 पेक्षा जास्त सरकारी बँका होत्या. सरकारी बँकांची संख्या 12 इतकी झाली आहे. आता या 12 सरकारी बँकांचे विलीनीकरण केले जाणार आहे. या विलीनीकरणानंतर देशात फक्त 3 ते 4 बँका असतील. भारतातील या महाबलाढ्य बँका असतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युसीआय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक या बारा बँकांचा यात समावेश आहे.

खातेधारकांचे काय होणार

बँकांच्या विलिनीकरणामुळे खातेधारकांचे काय  होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. खातेधारकांच्या बँक खात्यातील जमा रक्कम, मुदत ठेव, आवर्ती मुदत ठेव आणि इतर ठेवी तसेच कोणत्याही गुंतवणुकीवर  कुठलाही परिणाम होणार नाही. बँकांच्या विलिनीकरणामुळे कागदपत्र अपडेट करावी लागतील.   बँकेचे नाव, IFSC Code बदलेल. खातेदारांचा जुना ग्राहक क्रमांक आणि खाते क्रमांक पण बदलेल.

यापूर्वी न्यू बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाली होती. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र युजीआय मध्ये विलीन झाली. स्टेट बँक ऑफ इंदौर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. स्टेट बँक ऑफ बिकानेर एण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक एसबीआय मध्ये विलीन झाल्या.  विजया बँक आणि देना बँक बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन झाल्या. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाली. सांघ्रा बँक अँड कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियात विलीन झाली. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली.

FAQ

1 भारतातील १२ सरकारी बँकांचे विलिनीकरण कशासाठी होणार आहे?
भारत सरकार जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रात स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या विलिनीकरणामुळे मोठ्या आणि मजबूत बँका तयार होणार असून, बँकिंग क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि प्रतिस्पर्धी होईल. सध्या देशात १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत, ज्या पूर्वी २७ होत्या. या विलिनीकरणानंतर देशात फक्त ३ ते ४ महाबलाढ्य बँका शिल्लक राहतील.

2. कोणत्या १२ सरकारी बँकांचे विलिनीकरण होणार आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक (UCO Bank), बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक या १२ बँकांचा या विलिनीकरणात समावेश आहे.

3 विलिनीकरणाची घोषणा कधी होईल?
लवकरच विलिनीकरणाच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बँकांच्या विलिनीकरणाबाबत लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे, ज्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. हा निर्णय बँकिंग कर्मचाऱ्यांसह लाखो खातेधारकांवर परिणाम करेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!