Homeदेश-विदेशWho is Balen Shah Nepal Gen-Z Protest Raper to Mayor Marathi News...

Who is Balen Shah Nepal Gen-Z Protest Raper to Mayor Marathi News | कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्यासाठी Gen-Z मृत्यूलाही कवटाळायला तयार!


बालेन शाह कोण आहे: नेपाळ सध्या तीव्र राजकीय आणि सामाजिक अशांततेच्या काळातून जात आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर जनरल झेड चळवळीने जोर धरलाय. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी या चळवळीला पाठिंबा देऊन तरुणांचा विश्वास संपादन केलाय. त्यांना तरुण पिढीचे प्रेरणास्थान आणि नव्या नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते. बालेन शाह नेमके आहेत तरी कोण? त्यांची कारकिर्द कशी राहिलीय? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

रॅपर ते महापौर बालेन यांचा प्रवास

बालेन शाह यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधून करिअरची सुरुवात केली, नंतर रॅपर म्हणून प्रसिद्धी मिळवली आणि 2022 मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्या अनोख्या शैलीने आणि पारंपारिक राजकारणाविरुद्धच्या बंडखोर वृत्तीने तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवली.

जनरल झेड चळवळीचे मूळ

भ्रष्टाचार आणि सरकारच्या सोशल मीडिया बंदीविरुद्ध नेपाळमधील तरुणांनी जनरल झेड चळवळ सुरू केली. #NepoKid सारख्या हॅशटॅगद्वारे राजकारण्यांच्या मुलांच्या ऐषोआरामी लाईफस्टाइलवर टीका झाली. शांततापूर्ण निदर्शनांना पोलिसांनी हिंसक प्रतिसाद दिल्याने 19 जणांचा मृत्यू झाला, यात काठमांडूत 18 जणांचा समावेश आहे.

बालेन यांचा चळवळीला पाठिंबा

वयामुळे निदर्शनांमध्ये सहभागी न होता, बालेन शाह यांनी फेसबुकवरून तरुणांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी निदर्शकांना संयम राखण्याचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्याचे आवाहन केले, तसेच तरुणांनी देशाचे भविष्य घडवावे, असे सांगितले.

भारतीय सिनेमा केला होता बॅन

2023 मध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेऊन बालेन यांनी सामाजिक मुद्द्यांवरील आपली ठाम भूमिका दाखवली. त्यांच्या या कृती आणि सोशल मीडियावरील प्रभावामुळे ते तरुणांचे आवडते नेते बनले आहेत.

FAQ

प्रश्न: बालेन शाह कोण आहेत आणि त्यांना जनरल झेड चळवळीचा चेहरा का मानले जाते?

उत्तर: बालेन शाह हे काठमांडूचे महापौर, सिव्हिल इंजिनीअर आणि नेपाळमधील प्रसिद्ध रॅपर आहेत. २०२२ मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून महापौरपद जिंकून त्यांनी तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवली. जनरल झेड चळवळीत त्यांनी सोशल मीडियाद्वारे तरुणांना पाठिंबा दिला, ज्यामुळे भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरुद्धच्या निदर्शनांना गती मिळाली. त्यांची शैली आणि बंडखोर वृत्तीमुळे ते तरुणांचे नायक बनले.

प्रश्न: नेपाळमधील जनरल झेड चळवळ कशामुळे सुरू झाली?

उत्तर: नेपाळमधील जनरल झेड चळवळ राजकारण्यांच्या मुलांच्या ऐषोआरामी जीवनशैलीविरुद्ध आणि सरकारने लादलेल्या फेसबुक, इंस्टाग्रामसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीविरुद्ध सुरू झाली. तरुणांनी शांततापूर्ण निदर्शने केली, परंतु पोलिसांच्या कठोर कारवाईत १९ जणांचा मृत्यू आणि शेकडो जखमी झाले, ज्यामुळे ही चळवळ तीव्र झाली.

प्रश्न: बालेन शाह यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या संदर्भात कोणता वाद निर्माण केला?

उत्तर: २०२३ मध्ये बालेन शाह यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला, विशेषतः सीतेचे चित्रण भारताची मुलगी म्हणून केल्याबद्दल. त्यांनी हे संवाद हटवण्याची मागणी केली आणि तसे न झाल्यास काठमांडूत भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याची धमकी दिली. यामुळे त्यांच्यावर स्वस्त लोकप्रियतेचा आरोप झाला, परंतु त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!