Homeदेश-विदेशपुढील उपाध्यक्ष निवडण्यासाठी राधाकृष्णन विरुद्ध सुदेरशान रेड्डी इंडिया आज लाइव्ह न्यूज

पुढील उपाध्यक्ष निवडण्यासाठी राधाकृष्णन विरुद्ध सुदेरशान रेड्डी इंडिया आज लाइव्ह न्यूज


उपाध्यक्ष निवडणूक: देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात आहे. संसदेत सकाळी 10 ते संध्याकाळी 5वाजेदरम्यान मतदान होईल. तर संध्याकाळी 6 वाजता नवा उपराष्ट्रपती कोण याचा फैसला होईल.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत एनडीएचं संख्याबळ अधिक असलं तरी त्यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी दोन दिवस आधीच एनडीएकडून खासदारांना मतदानाचं प्रशिक्षण देण्यात आलंय. तसेच बीजू जनता दल आणि बीआरएसने मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने एनडीए उमेदवाराचं पारडं जड मानलं जातंय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपली मतं कशी वाढतील यासाठी रणनीती आखल्याचं दिसतंय.

NDAकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग केलं जाणार आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याने प्रत्येक खासदाराची गणना करूनच खासदार मतदानाला जाणार आहेत. यासाठी भाजपने ब्रेक फास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं नियोजन केलं आहे. यासाठी प्रत्येक मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत एकूण 782 खासदार मतदान करणार असून लोकसभेतील 543, राज्यसभेतील 233 आणि 12 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रामाणिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे केली जाते. खासदार गुप्त मतदानाद्वारे उमेदवारांच्या पसंतीच्या क्रमाने मत देतात आणि बहुमत गाठेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत सकाळी 10 वाजता मतदान करतील.

दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आज एकत्र मतदानासाठी जाणार आहेत. सकाळी 9 वाजता संविधान सभागृहातील आपच्या कार्यालयात खासदार उपस्थित राहतील. तिथून संसदीय दलाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली खासदार मतदानासाठी रवाना होतील. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज खासदार एकत्रितपणे मतदान करणार आहेत.

FAQ

1.उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कधी होत आहे?

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होत आहे. मतदान सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान संसदेत होईल.

2. उपराष्ट्रपतीपदासाठी कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत?

एनडीए: सी.पी. राधाकृष्णन (महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल)
इंडिया आघाडी: सुदर्शन रेड्डी

3. निवडणुकीचा निकाल कधी जाहीर होईल?

निवडणुकीचा निकाल संध्याकाळी 6 वाजता जाहीर होईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!