Homeदेश-विदेशअफगाणिस्तान भूकंप तालिबानच्या लिंग निर्बंधामुळे महिलांसाठी बचाव उशीर झाला

अफगाणिस्तान भूकंप तालिबानच्या लिंग निर्बंधामुळे महिलांसाठी बचाव उशीर झाला


अफगाणिस्तान भूकंप: काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानाच एका अतिप्रचंड भूकंपानं मोठी हानी झाली. क्षणोक्षणी समोर आलेल्या माहितीतून इथं मृतांचा आकडा 2200 च्याही पलिकडे गेल्याचं निश्चित केलं आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. याच अफगाणिस्तानामध्ये बचावकार्याला वेग आला, मात्र तिथंही पुरुषांनाच प्राधान्यानं वाचवण्यात आलं आणि महिलांना मात्र ढिगाऱ्याखाली तसंच सोडून देण्यात आलं. यामागचं कारण काय?

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

अफगाणिस्तानाच या अटीतटीच्या प्रसंगावेळीसुद्धा तालिबानच्या अतिशय कठोर कायज्याचं पालन करण्यात आलं, जिथं ‘No Skin contact with unrelated males’ हा कायदा बचावकार्यात अडथळा ठरला.

घटनास्थळी विदारक चित्र…

भूकंपानंतर जेव्हा बचावकार्य सुरू झालं तेव्हा अफगाणिस्तानातील या प्रभावित क्षेत्रातून पुरुष आणि मुलांना वाचवण्यात आलं. मात्र लहान मुली आणि महिला मात्र तिथंच ढिगाऱ्याखाली अडकून राहिल्या, मदतीच्या प्रतीक्षेत… ‘कोणीही अनोळखी पुरूष कोणा महिलेला स्पर्श करु शकत नाही’ या कायद्याचं अशा आव्हानात्मक परिस्थितीतही पालन केलं जात होतं. थोडक्यात जिथं महिला बचावकर्मी हजर नाही, तिथं महिलांपर्यंत मदतच पोहोचत नव्हती. तालिबान कायद्यानुसार कोणा अनोळखी पुरुषानं कोणत्याही महिलेला स्पर्श केल्यास तो शिक्षेस पात्र होता.

तालिबानसाठी कायदाच सर्वकाही…

तालिबान कायदा आणि प्रशासनात महिलांबाबत कठोर नियम असून, जागतिक स्तरावर त्यांना लैंगिक कायदे म्हणून संबोधलं जातं. यापैकीच एक कायदा यावेळी बचावकार्यात मोठा अडथळा ठरला. अफगाणिस्तानात कोणीही महिला कुटुंबातील पुरुषाव्यतिरिक्त (वडील, भाऊ, पती किंवा मुलगा) इतर कोणालाही स्पर्श करु शकत नाही. ज्यामुळं तिथं कोणत्याही पुरुषानं महिलेला मदत करण्याचं धाडस केलं नाही.

तालिबान सरकारनं अफगाणिस्तानाच वैद्यकिय आणि इतर क्षेत्रांमध्ये महिलांच्या शिक्षणावरही बंदी आणल्यानं या देशात महिला डॉक्टर आणि महिला परिचारिकांसोबतच महिला बचावकर्मीसुद्धा नसल्यातच जमा आहेत. कोणाही जवळच्या पुरुषाशिवाय इथं महिला घराबाहेरही पडू शकत नाहीत, ज्यामुळं अफगाणिस्तानातील एकंदर परिस्थिती महिलांच्या हक्कांबाबत सातत्यानं विचार करायला भाग पाडत आहे.

हादरवणारा प्रसंग अंगावर काटाच आणतोय…

भूकंपानंतर अफगाणिस्तानात काही प्रसंग असेही आले, जिथं पुरुषांसोबतच मृतदेहसुद्धा बाहेर काढण्यात आले. मात्र ढिगाऱ्याखालील महिलांना मदत मिळाली नाही. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार बीबी आएशाच्या (नाव बदलले आहे) सांगण्यानुसार भूकंपानंतर त्यांच्यासह इतर महिलांना एका कोपऱ्यात बसवण्यात आलं आणि कैक तास तिथं कोणी फिरकलंही नाही. त्या सर्व महिला रक्तबंबाळ होत्या, मात्र त्यांच्या मदतीसाठी तिथं कोणीच गेलं नाही, कारण ठरला तो म्हणजे तालिबानचा अमानवी कायदा.

अफगाणिस्तानातील या परिस्थितीला आणखी दयनीय करत आहे तेथील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा जवळपास शून्य आकडा. 2023 मध्ये तालिबानकडून वैद्यकिय क्षेत्रात महिलांच्या काम करण्यावर निर्बंध लादल्यानंतर तेथील ग्राणीण आणि आपत्तीग्रस्त भागांमध्ये महिला डॉक्टर आणि परिचारिकांच्या अभावे कैक महिलांपर्यंत योग्य उपचार पोहोचू शकले नाहीत. किंबहुना तिथं आताही अशी कैक रुग्णालयं आहेत जिथं महिला आरोग्य सेविका नसल्यानं अनेक महिलांना उपटार मिळत नाहीये. जागतिक स्तरावर महिलांच्या हक्कावरून लढणाऱ्या अनेकांच्याच डोळ्यात अफगाणिस्तानातील ही स्थिती अंजन घालून जात आहे हेच खरं.

FAQ

अफगाणिस्तानात भूकंपानंतर काय स्थिती?
मृत्यू आणि जखमींची संख्या: 2,200 हून अधिक मृत्यू आणि 3,600 जखमी झाले, परंतु महिलांचा मृत्यू आणि जखमींची अचूक आकडेवारी तालिबानने जाहीर केलेली नाही.

अफगाणिस्तान भूकंप: महिलांना बचावकार्यात का दुर्लक्षित केलं गेलं?
तालिबानचा ‘No Skin Contact with Unrelated Males’ कायदा. तालिबानच्या कायद्यानुसार, कोणताही अनोळखी पुरुष कोणत्याही महिलेला स्पर्श करू शकत नाही, अगदी आपत्कालीन परिस्थितीतही. यामुळे पुरुष बचावकर्मींनी महिलांना ढिगाऱ्याखालील मदतीपासून वंचित ठेवलं, कारण त्यांना कायद्याची भीती होती.

अफगाणिस्तानात परिस्थिती गंभीर का आहे?
महिलांवरील निर्बंध: तालिबानच्या नियमांमुळे महिला सहावीनंतर शिक्षण घेऊ शकत नाहीत, पुरुष नातेवाईकांशिवाय प्रवास करू शकत नाहीत आणि बहुतेक नोकऱ्यांवर बंदी आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!