उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन विमानाने प्रवास करत नाही हे आता सर्वश्रुत आहे. चीनच्या विजयी परेडमध्ये सहभागी होण्यासाठी किम जोंग उन विशेष विमानाने पोहोचले होते. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर किम जोंग उन यांच्याकडे कोणत्या टोकाची गुप्तता पाळली जाते हे दिसत आहे. या व्हिडीओत किम जोंग उन यांचा स्टाफ चीनमधील त्या प्रत्येक गोष्टीची स्वच्छता करत आहेत ज्याला पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान त्यांनी हात लावला होता.
बुधवारी, बीजिंगमध्ये झालेल्या भव्य लष्करी परेडनंतर उत्तर कोरिया आणि रशियाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार उघडकीस आला. टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या फुटेजमध्ये बैठक संपल्यानंतर किम जोंग उनचे दोन सहाय्यक वेगाने कामाला लागताना दिसत आहेत. एका कर्मचाऱ्याने किम बसले होते त्या खुर्चीच्या सर्व बाजू पुसून घेतल्या. तर दुसऱ्याने त्यांचा पिण्याचा ग्लास एका ट्रेवर ठेवून नेला. कदाचित त्या ग्लासची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.
किम जोंग उन यांनी ज्या गोष्टींना हात लावला होता, त्याची अत्यंत बारकाईपणे स्वच्छता करण्यात आली. खुर्चीचे लाकडी हात आणि अगदी बाजूचे टेबल देखील पुसण्यात आले, जेणेकरून उत्तर कोरियाच्या नेत्याच्या उपस्थितीचा कोणताही मागमूस सापडला नाही.
उत्तर कोरियाच्या नेत्याच्या सोबत असलेल्या कर्मचार्यांनी किमच्या उपस्थितीचे सर्व ट्रेस सावधपणे मिटवले.
त्यांनी प्यायलेला ग्लास घेतला, खुर्चीच्या अपहोल्स्ट्रीने पुसून टाकले आणि कोरियन नेत्याने ज्या फर्निचरला स्पर्श केला त्या फर्निचरचे भाग साफ केले. pic.twitter.com/joxvxg04ym
– रशियन मार्केट (@र्यून्यूज) 3 सप्टेंबर, 2025
“चर्चेनंतर डीपीआरकेच्या प्रमुखांसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी किम यांच्या उपस्थितीच्या सर्व खुणा काळजीपूर्वक नष्ट केल्या,” असं रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशेव्ह यांनी त्यांच्या युनाशेव्ह लाईव्ह चॅनेलवर वृत्त दिले.
“त्यांनी ज्या ग्लासमधून पाणी प्यायलं तो नेण्यात आला, खुर्चीचा हात आणि कोरियन नेत्याने स्पर्श केलेले फर्निचरचे भाग पुसले,” असंही त्यांनी सांगितलं. युनाशेव्हच्या मते, अधिकृत बैठक सकारात्मक पद्धतीने संपली. किम आणि पुतिन दोघेही बैठकीनंतर समाधानी दिसत होते आणि एकत्र चहाचा आस्वाद घेण्यासाठी निघाले.
उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी इतकी बारकाईने स्वच्छता का केली याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण अंदाजानुसार, रशियाच्या शक्तिशाली संरक्षण दलापासून काळजी घेण्यासाठी हे पाऊल उचललं असावं. तर काहींनी चीन बारीक लक्ष ठेवून असल्याने केलं असावं असा अंदाज मांडला आहे. पण किम जोंग उन असे एकमेव राष्ट्राध्यक्ष नाहीत जे आपल्यामागे बायोलॉजिकल फूटप्रिंट्स सोडत नाहीत.
पुतिन सोबत नेतात मूत्र आणि विष्ठा
डीएनए चोरीपासून बचाव करण्याच्या हेतूने पुतिन स्वतः फार काळजी घेतात असं म्हटलं जातं. रिपोर्टनुसार, त्यांचे अंगरक्षक परदेशात प्रवास करताना त्यांचे मूत्र आणि विष्ठा सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा करतात, जे नंतर विशेष सुटकेसमध्ये मॉस्कोला परत पाठवले जातात. 2017 पासून सुरू असलेली ही पद्धत रशियन राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्याबद्दल गुप्त माहिती गोळा करण्यापासून शत्रू शक्तींना रोखण्यासाठी आखल्याचं बोललं जातं.
अलास्कामध्ये पुतिन यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या उच्च-स्तरीय भेटीदरम्यानही ही काळजी घेण्यात आली होती. रशियन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांची विष्ठा सूटकेसमध्ये मॉस्कोला परत नेल्याचे म्हटले जाते. यामुळे रशियाची सुरक्षा यंत्रणा राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल किती काळजी घेतं हे दिसतं.
FAQ
1) किम जोंग उन यांनी चीनला भेट का दिली?
उत्तर: किम जोंग उन यांनी २ सप्टेंबर २०२५ रोजी चीनची राजधानी बीजिंग येथे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य लष्करी परेडमध्ये सहभागी होण्यासाठी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह इतर २६ जागतिक नेत्यांसोबत हजेरी लावली. हा दौरा उत्तर कोरिया, चीन आणि रशिया यांच्यातील त्रिपक्षीय संबंधांना औपचारिक रूप देण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किम यांचे स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न मानला जातो.
2) किम जोंग उन यांनी कोणत्या मार्गाने चीनला प्रवास केला?
उत्तर: किम जोंग उन यांनी त्यांच्या खास बुलेटप्रूफ, हिरव्या रंगाच्या ट्रेनने प्योन्गयांगहून बीजिंगला प्रवास केला. ही ट्रेन उत्तर कोरियाच्या नेत्यांसाठी पारंपरिक प्रवासाचे साधन आहे, जी त्यांच्या आजोबा किम इल-सुंग आणि वडील किम जोंग-इल यांनीही वापरली होती. या ट्रेनमध्ये सभागृह, शयनकक्ष, रेस्टॉरंट आणि सॅटेलाइट फोन यांसारख्या सुविधा आहेत, आणि ती अत्यंत सुरक्षित आणि हळू गतीने प्रवास करते (सुमारे ६० किमी/तास).
3) किम जोंग उन यांच्यासोबत कोण-कोण होते?
उत्तर: किम जोंग उन यांच्यासोबत त्यांची मुलगी किम जू-ए, परराष्ट्रमंत्री चोए सन-हुई, वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाचे आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे संचालक किम सॉन्ग-नाम, आणि किम ताक हुन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी होते. किम जू-ए यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती, कारण दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेने तिला किम यांची संभाव्य उत्तराधिकारी म्हणून संबोधले आहे.
































