Homeदेश-विदेशउधव ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत पंतप्रधान मोदी यांनी शैक्षणिक पदवी

उधव ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत पंतप्रधान मोदी यांनी शैक्षणिक पदवी


मोदी शैक्षणिक पार्श्वभूमी: “दिल्ली हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीएची पदवी सार्वजनिक करायला बंदी घातली हा चमत्कार आहे. गुजरात विद्यापीठाने मोदींची एमएची पदवी दाखवायला याआधीच नकार दिला. विश्वगुरूंची ‘पदवी’ लपवून ठेवा, असे सांगण्यासाठी दिल्लीच्या उच्च न्यायालयावर दबाव आला काय? हा प्रश्न आता महत्त्वाचा,” असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

खोटे, नाटकी आणि असत्य बोलण्यात मोदी आघाडीवर

“भारतीय जनहो, आपल्या देशाचे ‘बाहुबली’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सत्य’, ‘न्याय’ आणि ‘नीती’ या शब्दांचे अर्थ पूर्णपणे बदलून टाकले आहेत. प्रभू श्रीरामाचे नाव ते घेतात, पण सत्यवचनी रामाचे ‘सत्य’ वचन लांब ठेवून ते राज्य करीत आहेत. महात्मा गांधींच्या समाधीसमोर ते नाइलाजाने झुकतात, पण त्यांच्या सभोवती नथुराम गोडसेंच्या विचार वाहकांचे कोंडाळे जमले आहे. महात्मा गांधींनी देशाला ‘सत्य’ म्हणजे काय, याचे महत्त्व समजावून सांगितले. मोदी काळात सत्याचे संपूर्ण अधःपतन झाले. पंतप्रधान दिल्लीत स्वतःसाठी नवे भव्य निवासस्थान उभे करीत आहेत, पण दिल्ली हे थडग्यांचे शहर आहे व खोटे राजकारण करणाऱ्यांचे थडगे शेवटी येथेच उभारले जाते. देशाचे राजकारण पूर्वीही व्यक्तीवादी होते, ते आता अधिक झाले. त्यामुळे खोटे, नाटकी आणि असत्य बोलणे वाढले. पंतप्रधान मोदी हे त्याबाबतीत आघाडीवर आहेत,” असा टोला ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरामधून लगावण्यात आला आहे.

हायकोर्टाने असा निर्णय का द्यावा?

“नरेंद्र मोदी हे 2014 साली खोटं बोलून, लोकांना फसवून सत्तेवर आले व सत्ता टिकविण्यासाठी ते रोज खोटं बोलत आहेत. भारतीय जनता मूर्ख आहे हा विश्वास बाळगून ते सत्तेवर आले. जनतेनेही मोदींचा विश्वास सार्थ ठरवला. मोदी हे अशिक्षित आहेत, अशी टीका त्यांचे विरोधक करतात. कमी शिकणे हा गुन्हा नाही, पण आपण उच्चशिक्षित आहोत हे दाखविण्यासाठी पदवीची खोटी प्रमाणपत्रं समोर आणणे हा गुन्हा आहे. पंतप्रधान मोदी यांनी तो केला. पंतप्रधानांच्या शिक्षणाचा विषय घेऊन काही लोक दिल्ली उच्च न्यायालयात गेले. भारताचे पंतप्रधान किती शिकले आहेत, हे माहिती करून घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला असल्याचे या लोकांनी घटनेचा हवाला देत सांगितले. यावर दिल्लीच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला, “पंतप्रधानांची डिग्री सार्वजनिक करता येणार नाही. पंतप्रधानांची डिग्री सार्वजनिक करणे यात कोणतेच जनहित (Public Interest) दिसत नाही.” हायकोर्टाने असा निर्णय का द्यावा?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.

जेटली, अमित शहा यांनी मोदींची ‘डिग्री’ मिळवली कोठून?

“देशातील सार्वजनिक उपक्रमांत अनुसूचित जाती-जमातीचे संशयास्पद दाखले जोडले म्हणून लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. महाराष्ट्रातील पूजा खेडेकर या आयएएस झालेल्या तरुणीने तिच्या अपंगत्वाबाबत चुकीचे प्रमाणपत्र दिले म्हणून दिल्लीच्या न्यायालयाने तिला आयएएसमधून बाहेर काढले. जात प्रमाणपत्रांच्या चुकांमुळे अनेकांना आमदारकी-खासदारकी गमवावी लागली. निवडणुका लढण्यास अपात्र ठरवले गेले. इथे पंतप्रधानांनी बनावट डिग्री धारण केल्याचे पुरावे समोर येऊनही दिल्लीचे उच्च न्यायालय पंतप्रधानांच्या खोटेपणाची पाठराखण करीत आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर मोदी यांनी एक दिवसही पंतप्रधानपदी राहू नये असे हे त्यांच्या बोगस डिग्रीचे प्रकरण आहे. आपले पंतप्रधान अडाणी व अशिक्षित आहेत, अशी टीका सुरू झाली तेव्हा गृहमंत्री अमित शहा आणि अरुण जेटली यांनी 2016 साली दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतली व गुजरात विद्यापीठातून मोदी यांनी एमएची पदवी घेतल्याचे त्यांनी सांगितले व पदवी लोकांसमोर आणली. मोदी यांनी 1993 साली एमए केले व त्याआधी दिल्ली विद्यापीठातून 1978 साली बीए केले. 1979 साली दीक्षांत समारोहात मोदी यांना डिग्री प्रदान झाली. मोदी यांच्या डिग्रीचा भ्रष्टाचार चर्चेत का आला? त्याचे पहिले कारण म्हणजे अनेक मुलाखती व सार्वजनिक कार्यक्रमांतून मोदी यांनी सांगितले आहे की, मी शिकलेलो नाही. मी शाळा, कॉलेजमध्ये गेलो नाही. मी गरीब होतो व रेल्वेच्या फलाटावर चहा विकून गुजराण करीत असल्याने शिकता आले नाही. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले. निवडणूक प्रतिज्ञापत्रातही मोदी यांनी त्यांच्या या महान पदव्यांचा संदर्भ दिला नाही. मग जेटली, अमित शहा यांनी मोदींची ‘डिग्री’ मिळवली कोठून?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

पदवी लपविण्यासाठी न्यायालयावर दबाव आणण्याची गरज नव्हती

“1992 साली मोदी यांनी कन्नड साप्ताहिक ‘तरंग’ला मुलाखत दिली होती व आपण मेकॅनिकल इंजिनीअर असल्याचा दावा केला होता. आपल्या शिक्षणाबाबत वेगवेगळे दावे करणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांबाबत माहिती जाणून घेणे हा जनतेचा अधिकार आहे. केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा तपशील जाहीर करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यावर सरकार उच्च न्यायालयात गेले. सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले, “डिग्री सार्वजनिक करता येणार नाही. गोपनीयतेचा अधिकार माहितीच्या अधिकारापेक्षा महत्त्वाचा आहे.” इथे एक लक्षात घेतले पाहिजे. नरेंद्र मोदी हे आता सामान्य व्यक्ती नाहीत. ते जर दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी होते, मग त्यांची पदवी लपविण्यासाठी न्यायालयावर दबाव आणण्याची गरज नव्हती. मोदी यांचे लौकिक अर्थाने कोणतेच शिक्षण झाले नाही. तरीही त्यांच्याकडे दोन पदव्या आहेत. या पदव्या म्हणजे अनेक अर्थाने फर्जीवाडा आहे,” असं राऊत म्हणालेत.

140 कोटी जनतेची ही थट्टा

“मोदी यांच्यावर संशय घेण्यास जागा आहे. कारण ‘सत्य’ बोलण्याबाबत त्यांचा जुना रेकॉर्ड संशयास्पद आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले लग्न झाल्याची माहिती लपवली होती. मोदी यांनी 2014 पासून अनेक खोटी आश्वासने जनतेला दिली. आपण चहा विकत होतो, असे कथानक ते सांगत राहिले. मोदी ज्या काळात चहा विकत होते त्या काळात त्या गावात रेल्वे स्टेशन नव्हते हे उघड झाले. मोदी लहान असताना गावातील एका नदीवर मगरीशी कुस्ती झाली व त्यात बाल नरेंद्र याने मगरीचा पराभव केला. अशा कथांप्रमाणे मोदींची ‘पदवी कथा’ समोर आली. भारतीय जनता पक्षाने, अमित शहा व जेटलींसारख्या दिग्गज नेत्यांनी मोदींची डिग्री जाहीरपणे दाखवली. त्यावर आता बंदी आणायचे कारण काय? भारताच्या न्यायिक इतिहासात हा आणखी एक काळा दिवस आहे. केंद्रीय माहिती आयोग ‘डिग्री’ दाखविण्याचा आदेश देते व दिल्ली हायकोर्ट हा आदेश रद्द करते. सरकार लटपटत्या पायाने न्यायालयात उभे राहते व मोदींची ‘डिग्री’ दाखवू नका अशी विनवणी करते. 140 कोटी जनतेची ही थट्टा आहे. लोकशाही, संविधान, कायद्याची थट्टा आहे. भारताच्या संविधानात स्पष्ट लिहिले आहे एखादी व्यक्ती बनावट पदवीचा वापर करत असेल, त्याआधारे निवडणूक लढवत असेल तर कलम 125 A नुसार त्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल. त्यानुसार मोदींची खासदारकी, पंतप्रधानपद बेकायदेशीर ठरेल. मोदींनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवले जातील,” असं राऊतांनी म्हटलं आहे.

मोदी यांची ‘डिग्री’ बनावट असेल तर…

“मोदी यांची ‘डिग्री’ बनावट असेल तर 2014 पासून भारतात एक ‘फर्जी’, बनावट सरकार चालवले जात आहे. ज्या हिंदुत्ववादी देशात ‘सत्य’, ‘नीतिमत्ता’ यासाठी रामायण, महाभारत घडले, त्याच भारतात एका पंतप्रधानाचे बनावट पदवी कथानक घडले आहे,” असं राऊतांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

FAQ

दिल्ली उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीए पदवीबाबत काय निर्णय दिला आहे?
दिल्ली उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीए पदवी सार्वजनिक करण्यास बंदी घातली आहे. यात कोणतेही जनहित नसल्याचे कारण न्यायालयाने दिले.

गुजरात विद्यापीठाने मोदी यांच्या शिक्षणाबाबत काय भूमिका घेतली?
गुजरात विद्यापीठाने नरेंद्र मोदी यांची एमए पदवी सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.

संजय राऊत यांनी या प्रकरणावर काय टीका केली आहे?
संजय राऊत यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत मोदी यांच्या पदवीबाबत खोटेपणा आणि दबावाचा आरोप केला आहे. त्यांनी मोदी यांना खोटे, नाटकी आणि असत्य बोलण्यात आघाडीवर असल्याची टीका केली.

राऊत यांनी मोदी यांच्या शिक्षणाबाबत कोणते प्रश्न उपस्थित केले?
राऊत यांनी मोदी यांच्या बीए आणि एमए पदव्यांच्या सत्यतेवर संशय व्यक्त केला. त्यांनी मोदी यांनी स्वतः शिकले नसल्याचे आणि चहा विकल्याचे दावे केल्याचा उल्लेख केला, परंतु निवडणूक प्रत домеपत्रात पदव्यांचा उल्लेख नसल्याचा आणि बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप केला.

अमित शहा आणि अरुण जेटली यांनी 2016 मध्ये काय दावा केला होता?
2016 मध्ये अमित शहा आणि अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून 1978 मध्ये बीए आणि गुजरात विद्यापीठातून 1993 मध्ये एमए पदवी मिळवली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

भारतीय खलाश राकेश चौहानचे अवयव बेपत्ता |

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराव्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
spot_img

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...
error: Content is protected !!