Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी पदवी पंक्ती दिल्ली एचसीने 1978 बीए रेकॉर्ड सामायिक करण्यास बांधील...

पंतप्रधान मोदी पदवी पंक्ती दिल्ली एचसीने 1978 बीए रेकॉर्ड सामायिक करण्यास बांधील नाही सीआयसी ऑर्डर डीयू


पंतप्रधान मोदी पदवी पंक्ती: दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बी.ए. पदवीचा तपशील सार्वजनिक करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश न्यायालयाने सोमवारी रद्द केला आहे. ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असून त्यात कोणताही सार्वजनिक हिताचा प्रश्न नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

गुणपत्रिका, उत्तरपत्रिका यासारखी माहिती ही माहिती अधिकार कायदाच्या म्हणजेच आरटीआय कायद्याच्या कलम 8(1) अंतर्गत संरक्षित आहे. ‘सार्वजनिक व्यक्तीशी संबंधित माहिती असली तरी ती वैयक्तिक स्वरूपाची असल्यास गोपनीयतेचे हक्क टाळता येत नाहीत,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायपूर्ती सचिन दत्ता यांनी निकाल देताना, शैक्षणिक पात्रता ही कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यासाठी बंधनकारक असल्याची कायदेशीर अट नाही, असं अधोरेखित केलं.

प्रकरण काय?

2016 मध्ये दाखल झालेल्या आरटीआयवर सीआयसीने दिल्ली विद्यापीठाला 1978 मधील बी.ए. पदवी परीक्षेची नोंद तपासण्याची परवानगी दिली होती. हीच परीक्षा पंतप्रधान मोदींनी दिली होती. मात्र 2017 मध्ये उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महिला खासदाराचं थेट आव्हान

न्यायलायच्या या निर्णयानंतर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी दिल्ली विद्यापीठातून मिळालेल्या त्यांची बॅचलर ऑफ आर्ट्स (इतिहास) पदवीच्या प्रमाणपत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी त्यांची शैक्षणिक पात्रता सार्वजनिक करण्याचे थेट आव्हान घोष यांनी पंतप्रधानांना दिले. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) २०१६ चा आदेश रद्द केल्यानंतर ही पोस्ट शेअर करण्यात आली. या आदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीपूर्व नोंदी तपासण्याची परवानगी देण्याचे दिल्ली विद्यापीठाला निर्देश देण्यात आले होते.

पंतप्रधानांना आव्हान देताना घोष यांनी, “प्रिय नरेंद्र मोदीजी, तुम्हाला मी एक आव्हान देते. ही माझी बीएची पदवी आहे. तुमची महाविद्यालयीन पदवीही तुम्ही सर्वांना दाखवा. लोकशाहीचे पंतप्रधान म्हणून, तुम्हाला काय लपवायचे आहे? तुमचे शिक्षण गुप्त का आहे, मोदीजी?” असा सवाल उपस्थित केला आहे.

संमिश्र प्रतिक्रिया

घोष यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर इंटरनेट वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत. अनेकांनी कॉलेज रेकॉर्ड उघडपणे दाखवल्याबद्दल आणि देशाच्या नेत्याकडून जबाबदारीची मागणी केल्याबद्दल घोष यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी ही अनावश्यक राजकीय चिथावणी असल्याचं म्हणत तिच्यावर टीका केली आहे.

FAQ

न्यायालयाने या प्रकरणात कोणते निरीक्षण नोंदवले?
न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी सांगितले की, शैक्षणिक माहिती (गुणपत्रिका, उत्तरपत्रिका) ही माहिती अधिकार कायद्याच्या (RTI) कलम 8(1)(j) अंतर्गत वैयक्तिक स्वरूपाची आहे आणि गोपनीयतेच्या हक्काने संरक्षित आहे. शैक्षणिक पात्रता ही सार्वजनिक पदासाठी बंधनकारक नाही, आणि त्यात सार्वजनिक हित नसल्यास ती उघड करण्याची गरज नाही.

या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?
2016 मध्ये आरटीआय कार्यकर्ते नीरज शर्मा यांनी दिल्ली विद्यापीठाकडे 1978 मधील बी.ए. पदवीधरांच्या सर्व नोंदी मागितल्या, ज्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदवी प्राप्त केली होती. CIC ने या नोंदी तपासण्याची परवानगी दिली होती, परंतु दिल्ली विद्यापीठाने याला आव्हान दिले, आणि 2017 मध्ये उच्च न्यायालयाने CIC च्या आदेशाला स्थगिती दिली.

दिल्ली विद्यापीठाने कोणता युक्तीवाद केला?
दिल्ली विद्यापीठाने सांगितले की, विद्यार्थ्यांची माहिती ही विश्वासार्ह (fiduciary) स्वरूपात असते आणि ती RTI अंतर्गत उघड करता येत नाही. ही माहिती खाजगी आहे आणि तिचा सार्वजनिक हिताशी संबंध नाही. विद्यापीठाने न्यायालयाला सांगितले की ते पंतप्रधान मोदी यांची डिग्री न्यायालयात दाखवण्यास तयार आहे, परंतु ती सर्वांसाठी उघड करता येणार नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...

शबरीमाला सोने प्रकरण- माजी टीडीबी प्रमुखांविरुद्ध पुरावे मिळाले:केरळम हायकोर्टाने SIT ला नवीन गुन्हा दाखल...

0
केरळममधील शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात एसआयटीने दावा केला आहे की, तपासात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष पीएस प्रशांत यांच्या विरोधात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!