Homeदेश-विदेशOnline Gaming : ऑनलाइन गेमिंग बिलानंतर कोणते गेम्स बंद होणार? वापरकर्त्यांच्या रक्कमबद्दल...

Online Gaming : ऑनलाइन गेमिंग बिलानंतर कोणते गेम्स बंद होणार? वापरकर्त्यांच्या रक्कमबद्दल मोठी अपडेट


उर्वशी पराभूत, दिल्ली: Online Gaming Bill 2025 संसदेत मंजूर होताच देशभरातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे. लोकसभेत चर्चेविना हा विधेयक पारित झाला आणि आज राज्यसभेतही संमती मिळाली. या कायद्यानुसार पैशांशी संबंधित सर्व ऑनलाइन गेम्सना बंदी घालण्यात आली आहे. देशातील आघाडीच्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सनी आपल्या सेवा थांबवण्याच्या घोषणा केल्या आहेत. Zupee, Dream11, MPL आणि इतर कंपन्यांनी एकामागून एक निवेदनं जारी करून सांगितलं की पैशांशी संबंधित सर्व गेम्स आता उपलब्ध राहणार नाहीत.  मात्र सर्व कंपन्यांनी एकच आश्वासन दिलं आहे — वापरकर्त्यांचे खाते व शिल्लक रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे, आणि ती कोणत्याही वेळी काढता येईल.

Zupee ने आपला निर्णय स्पष्ट केला. कंपनीने सांगितले की, नवीन कायद्याच्या अनुषंगाने सर्व पेड गेम्स बंद केले जात आहेत. मात्र लोकप्रिय फ्री गेम्स — Ludo Supreme, Ludo Turbo, Snakes & Ladders, Trump Card Mania — हे वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध राहतील. कंपनीने १५० दशलक्षांहून अधिक वापरकर्त्यांना जबाबदार आणि मोफत मनोरंजन देण्याचे आश्वासन दिले.

Dream11 ने आपल्या प्लॅटफॉर्मवरच्या सर्व Pay to Play Fantasy Sports contests स्थगित करण्याची घोषणा केली. कंपनीने स्पष्ट केले की वापरकर्त्यांचे account balance पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ते Dream11 अॅपमधून काढता येईल. तसंच मोठी कंपनी MPL (Mobile Premier League) नेही आपले मनी गेम्स थांबवले आहेत. MPL ने जाहीर केले की, “भारतात पैशांशी संबंधित सर्व गेम्स त्वरित स्थगित करणार. तसंच नवे डिपॉझिट स्वीकारले जाणार नाहीत आणि वापरकर्त्यांना आपली शिल्लक रक्कम काढता येईल.“  कंपनीने असेही स्पष्ट केले की, “बिझनेस मॉडेल काहीही असो, आमचे ध्येय जगातील सर्वात मोठे स्पर्धात्मक गेमिंग प्लॅटफॉर्म होण्याचे आहे.” या घडामोडींनंतर वापरकर्त्यांमध्ये संभ्रम असला तरी सर्व कंपन्यांनी आपली रक्कम सुरक्षित असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

फ्री टू प्लेचा नवा फोकस – नव्या कायद्यामुळे मनी गेम्स संपुष्टात आले असले तरी कंपन्यांनी आपला फोकस Free-to-Play मॉडेलकडे वळवला आहे. Zupee ने Ludo Supreme, Ludo Turbo, Snakes & Ladders, Trump Card Mania सारखे लोकप्रिय टायटल्स मोफत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Dream11 ने स्पष्ट केले की त्यांचा प्लॅटफॉर्म आता फक्त मोफत फँटसी गेमिंगपुरता मर्यादित असेल. MPL ने जाहीर केलं की नवे डिपॉझिट स्वीकारले जाणार नाहीत, पण ग्राहकांना आपली शिल्लक सहज काढता येईल. पुढे फक्त स्पर्धात्मक, नॉन-मनी गेम्स दिले जातील.

सध्या सर्व कंपन्या फ्री टू प्ले गेम्स, स्पर्धात्मक गेमिंग आणि नॉन-मनी आधारित मनोरंजनावर भर देत आहेत. मात्र उद्योगात मोठा आर्थिक फटका बसणार हे नक्की. लाखो वापरकर्त्यांना फ्री गेमिंग उपलब्ध राहील, पण भारतातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राची दिशा पुढे कोणती राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बिलामुळे कंपन्यांना प्रचंड फटका बसणार आहे. भारतातील ऑनलाइन गेमिंग मार्केटमधून दरवर्षी हजारो कोटींचं उत्पन्न मिळत होतं. आता हे उत्पन्न आटणार आहे. पण दुसऱ्या बाजूला अनेक जीव वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी गेमिंगमध्ये पैसे गमावल्यामुळे आत्महत्यांचे प्रकार घडले. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेशसारख्या राज्यांत याचे गंभीर परिणाम दिसून आले. या दृष्टीने सरकारचा दावा आहे की, “आर्थिक फटका झाला तरी समाज वाचेल, तर तोच खरा नफा.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!