Homeदेश-विदेशऑनलाईन गेमिंग बंदी बिल मंजूर ड्री ड्री ड्री 11 वर बंदी घातली...

ऑनलाईन गेमिंग बंदी बिल मंजूर ड्री ड्री ड्री 11 वर बंदी घातली आहे व्हीपी स्लॅम ऑनलाईन गेमिंग बिलावर बंदी घातली आहे


ऑनलाइन गेमिंग बिल 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे. 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक मंजूर करण्यात आले. तर आज 21 ऑगस्ट रोजी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले. या विधेयकामुळं देशातील अनेक ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यात ड्रिम 11 (Dream 11) चे नाव प्रामुख्याने घेण्यात येतेय. पण जर ड्रिम 11 बंद झाल्यास त्याचा परिणाम बीसीसीआयवर होणार आहे. कारण कंपनीसोबत BCCIने तीन वर्षांचा करार केला आहे. ड्रीम 11 बंद होणार का? अशा चर्चा असतानाच ड्रीम11 च्या पॉलिसी कम्युनिकेशन्सच्या माजी उपाध्यक्षा समृती सिंग चंद्रा यांची एक पोस्ट चर्चेत आहे.

ड्रिम 11ला घराघरात पोहोचवण्यासाठी 9 वर्ष काम करणाऱ्या स्मृती चंद्रा यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे, ते सरकारने रिअल-मनी ऑनलाइन गेमिंग (आरएमजी) वर बंदी घातल्यानंतर ड्रीम11 सारख्या प्लॅटफॉर्मना एका रात्रीत बेकायदेशीर ठरवले जाते. हा निर्णय अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नियमांवर नियम, कोर्टच्या आदेशांवर आदेश वाढत चालले आहेत. ड्रिम 11कडून नेहमीच नियम आणि नैतिक आचरणाचे पालन करण्यात आले. “वर्षानुवर्षे प्रमाणीकरण, कर आकारणी आणि न्यायालयीन मान्यता दिल्यानंतर प्लॅटफॉर्म बेकायदेशीर घोषित करणे केवळ चुकीचे नाही. ते अत्यंत अनैतिक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अनेक निकालांमध्ये काल्पनिक खेळांमध्ये संधी नसून कौशल्याचा समावेश असल्याचे पुष्टी देऊनही, सरकार काल्पनिक खेळ आणि जुगार यांच्यातील फरक ओळखण्यात अपयशी ठरले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, 2025 मध्ये भारतातील फॅन्टसी स्पोर्ट्स मार्केटचे मूल्य 1.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे आणि 2030 पर्यंत ते 5.05 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे (सीएजीआर 22.6%).  ही वाढ केवळ व्यवसाय महसूलच नाही तर नोकऱ्या, उपजीविका, क्रीडा नवोपक्रम आणि डिजिटल चाहत्यांच्या सहभागाचे देखील प्रतिनिधित्व करते, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे हे विधेयक?

बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस संसदेतील दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणणारे विधेयक मंजुर करण्यात आले. या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन मनी गेम आणि ऑनलाइन मनी गेमिंग सर्व्हिस उपलब्ध करता येणार नाही. असं केल्यास मोठा दंड आकारण्यात येईल.

2023मध्ये ड्रीम 11ने बीसीसीआयसोबत 358 कोटींचा करार केला होता. या करारात कंपनी भारतीय क्रिकेट टीमची टायटल स्पॉन्सर बनली होती. त्यानंतर टीम इंडियाच्या जर्सीवरही ड्रिम 11वर नाव लिहिण्यात आले होते. हा कारार 3 वर्षांपर्यंतच झाला असून 2026मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच हे विधेयक पास झाल्याने बीसीसीआयला किती नुकसान होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!