कार्बन डाय ऑक्साईड गॅस उत्सर्जन: मानवी अस्तित्वाच्या खुणा, मानवी उत्क्रांती आणि सजीवसृष्टीचं अस्तित्वं असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह असून, या ग्रहानं कैक जीवांची उत्पत्ती आणि ऱ्हास पाहिला आहे. अगदी मानवी उत्क्रांती असो किंवा मग विकासाची वेगवेगळी रुपं आणि टप्पे असो, या पृथ्वीशी प्रत्येक युगातील जीवांनी ताळमेळ साधला. आता मात्र वर्षानुवर्षांपासून साधण्यात आलेला हाच ताळमेळ काहीसा डगमगत असून, त्याचा धोका पृथ्वीच्याच अस्तित्वाला पोहोचत असल्याची वेळ उद्भवली आहे.
जवळपास 252 मिलियन वर्षांपूर्वी जे घडलं, त्याची पुनरावृत्ती होणार?
252 मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवर अचानक CO2 वायूचं प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता या वायूमुळं जीवसृष्टी उध्वस्त झाली. शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील संशोधकांनी त्याच घटनेचा संदर्भ देत मानवाकडून पुन्हा याच चुका केल्या जात असून, कार्बन डायऑक्साईडचं मोठ्या प्रमाणावर होणारं उत्सर्जन पाहता त्यामुळं पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होऊ शकते.
MIT चे शास्त्रज्ञ डॅनिअल ऱॉथमॅन यांच्या माहितीनुसार ही क्रिया अशीच सुरू राहिली तर विध्वंसाचा दिवस दूर नाही अशा शब्दांत संशोधकांनी सावधगिरीचा स्पष्ट इशारा दिला आहे. प्रत्यक्षात पृथ्वीवरील कार्बनचक्र अतिशय क्लिष्ट असून, इथं वातावरण, मगासागर, जमीन आणि जीवजंतूंमध्ये कमालीचं संतुलन पाहा.ला मिळतं.
ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या घटनांमुळं कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनाच्या प्रक्रिया घडतात आणि महासागर, वृक्ष ते अवशोषित करतात. मात्र सध्या ज्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होत आहे, ते पाहता पृथ्वीवरील संपूर्ण संतुलन बिघडू शकतं असा स्पष्ट इशारा दिला जात आहे. हे चक्र आणि क्रिया याच वेगानं सुरू राहिल्यास जागतिक तापमानवाढीची समस्या आणखी गंभीररित्या भेडसावू शकते, महासागरांच्या पाण्यातचंही तापमानवाढ होऊ शकतं ज्यामुळं संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होण्याचा धोका संभवतो.
25 कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
साधारण 25.2 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्रचंड मोठं संकट उद्भवलं होतं. ज्याचा उल्लेख ‘पर्मियन ट्रायसिनिक’ म्हणून केला जातो. पृथ्वीवरील हा अतिप्रचंड सर्वनाश असून, यामध्ये 69 टक्के सागरी जीव आणि 70 टक्के जमीनीवर वावरणारे जीव लुप्त झाले होते. जाणकारांच्या माहितीनुसार सायबेरियन ट्रॅप्समध्ये एका मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं हे संकट ओढावलं होतं. लाखो वर्षांपासून या ज्वालामुखीनं कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जित केला आणि त्याच कारणानं समुद्राच्या पाण्याचं रुपांतर अॅसिडसारख्या द्रव्यांमध्ये होत जीवसृष्टीचा ऱ्हास झाला होता.
FAQ
कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन पृथ्वीच्या हवामानावर कसा परिणाम करते?
कार्बन डायऑक्साइड (CO2) हा हरितगृह वायू (Greenhouse Gas) आहे, जो सूर्यापासून येणारी उष्णता शोषून घेतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती अडकवतो. यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं, ज्याला हरितगृह प्रभाव (Greenhouse Effect) म्हणतात. मानवी क्रियांमुळे (उदा. जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड) CO2 चं उत्सर्जन वाढलं आहे, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि हवामान बदल (Climate Change) होत आहे.
252 मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवर काय घडलं होतं?
252 मिलियन वर्षांपूर्वी पर्मियन-ट्रायॅसिक विलुप्ती (Permian-Triassic Extinction) घडली, जी पृथ्वीवरील सर्वात मोठी जैविक संहारक घटना मानली जाते. यात 69% सागरी जीव आणि 70% स्थलचर प्रजाती नष्ट झाल्या. सायबेरियन ट्रॅप्समधील प्रचंड ज्वालामुखी उद्रेकामुळे लाखो वर्षे CO2 आणि इतर हरितगृह वायूंचं उत्सर्जन झालं, ज्यामुळे समुद्राचं पाणी आम्लयुक्त (Acidic) झालं आणि जीवसृष्टीचा ऱ्हास झाला.
मानवी क्रियांमुळे CO2 उत्सर्जन कशामुळे वाढत आहे?
जीवाश्म इंधनांचा वापर, जंगलतोड, शेती आणि पशुपालन























