Homeदेश-विदेशरशिया युक्रेन वॉर युक्रेनने रशियन ट्रेनला नवीनतम अद्यतने लक्ष्य केले

रशिया युक्रेन वॉर युक्रेनने रशियन ट्रेनला नवीनतम अद्यतने लक्ष्य केले


रशिया युक्रेन युद्ध: जवळपास तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असून संयुक्त राष्ट्र संघटना असो किंवा जागतिक स्तरावरील आणखी कोणता बडा नेता असो, कोणाच्याही मध्यस्तीनं या युद्धाला विराम मिळालेला नाही. आता मात्र अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलास्कामध्ये रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्यामागोमागच युक्रेने राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर युद्धविराम होऊ शकतो, अशा आशयाच्या चर्चांनी जागतिक माध्यमांमध्ये जोर धरला. मात्र ही भेटसुद्धा निष्फळच ठरली असं म्हणावं लागेल आणि यास कारण ठरत आहे युक्रेननं रशियावर केलेला आणखी एक हल्ला.

परिस्थिती अन् तणाव जैसे थे!

युक्रेनच्या लष्करानं जापोरिज्जियामध्ये ईंधनवाहू रशियम रेल्वेवर भेदक मारा करत ही रेल्वेगाडीच उध्वस्त करत रेल्वेमार्गाच्याही चिंधड्या केल्या. स्थानिक वृत्तसंस्थांच्या दाव्यानुसार रेल्वेमार्गावरील या भीषण हल्ल्यानंतर फक्त तिथं रुळ आणि रेल्वेचे काहीच अवशेष शिल्लक राहिले इतका भीषण हल्ला युक्रेननं केला. हा हल्ला दक्षिण युक्रेनच्या जापोरिज्जिया क्षेत्रातील उरोजायनी आणि टोकमकदरम्यान झाला.

हल्यानंतर रेल्वे रुळावरून उतरली आणि एकड आगडोंब माजला. युक्रेननं रशियाच्या रेल्वेवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेशळ नसून यापूर्वी मे महिन्यातही युक्रेनच्या ड्कोननं याच क्षेत्रात ईंधनवाहू रेल्वेवर निशाणा साधला होता. दरम्यान या हल्ल्यानंतर अद्यापही युक्रेनकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळं हल्ला नेमका कसा आणि कधी झाला याचं सविस्तर वृत्त अद्यापही प्रतीक्षेत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ही रेल्वे रशियाच्या सैन्यासाठी आवश्यक इंधनसाठा घेऊन जात होती. मात्र या भीषण हल्ल्यानंतर रेल्वेची एक बाजू पूर्णपणे उध्वस्त झाली असून या मार्गावरील रेल्वेसेवाही नष्ट झाली आहे.

झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंही साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. यादरम्यान युद्धविरामाशी संबंधित अनेक मुद्द्यावरचर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. युक्रेननं डोनबास आणि क्रिमियावरील ताबा सोडावा अशी रशियाची अपेक्षा असून त्यांनी नाटोमध्ये सहभागी होण्याचा अट्टहासही सोडावा अशी रशियाची मागणी असल्याची बाब इथं समोर आली. खुद्द ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिताना झेलेन्स्की यांनी काही मागण्या मान्य केल्या तर युद्ध तातडीनं संपवलं जाऊ शकतं असं म्हटलं. मात्र झेलेन्स्की यांनी याचा विरोध करत आपण रशियाला त्यांच्या आक्रमकतेचं बक्षीस देणार नाही अशीच ठाम भूमिका मांडली. त्यामुळं आता या संघर्षाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FAQ

रशिया-युक्रेन युद्ध किती काळापासून सुरू आहे?
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध जवळपास तीन वर्षांपासून (फेब्रुवारी 2022 पासून) सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघ किंवा जागतिक नेत्यांच्या मध्यस्थीनेही युद्धाला विराम मिळालेला नाही.

युक्रेनने रशियावर कोणता हल्ला केला?
युक्रेनच्या लष्कराने दक्षिण युक्रेनमधील जापोरिज्जिया क्षेत्रातील उरोजायनी आणि टोकमक दरम्यान रशियन ईंधनवाहू रेल्वेवर भेदक हल्ला केला. या हल्ल्याने रेल्वेगाडी आणि रेल्वेमार्ग उद्ध्वस्त झाला, ज्यामुळे रशियन सैन्यासाठी आवश्यक इंधनसाठ्याची वाहतूक खंडित झाली. स्थानिक वृत्तसंस्थांनुसार, हल्ल्यामुळे रुळ आणि रेल्वेचे फक्त अवशेष शिल्लक राहिले.

या हल्ल्याची पार्श्वभूमी काय आहे?
हा हल्ला युक्रेनने रशियन सैन्याच्या पुरवठा साखळीला लक्ष्य करण्यासाठी केला. यापूर्वी मे महिन्यातही युक्रेनच्या ड्रोनने जापोरिज्जिया क्षेत्रात ईंधनवाहू रेल्वेवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे रशियन सैन्याला इंधनपुरवठा खंडित झाला, ज्याचा परिणाम त्यांच्या लष्करी कारवायांवर होऊ शकतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!