Homeदेश-विदेशस्वातंत्र्य दिन 2025 पंतप्रधान मोदी काय आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगर योजना...

स्वातंत्र्य दिन 2025 पंतप्रधान मोदी काय आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगर योजना नवीनतम अद्यतन माहित आहेत


पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना म्हणजे काय: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशाला संबोधित करत एक उत्स्फूर्त भाषण केलं. देशानं आतापर्यंत गाठलेला प्रगतीचा टप्पा अधोरेखित करताना त्यांनी एका अतिशय महत्त्वाच्या योजनेकडेसुद्धा सर्वांचं लक्ष वेधलं. पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या या योजनेचा थेट लाभ देशातील युवा वर्गाला होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील कोट्यवधी तरुणांसाठी केंद्राची कोणती योजना?

‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ असं पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेचं नाव असून, याचा लाभ देशातील कोट्यवधी युवांना घेता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाची बाब म्हणजे हा फायदा सरकारी नोकरी करणाऱ्यांना मिळणार नसून खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना मिळणार आहे. खासगी क्षेत्रात नोकरीच्या अधिकाधिक संधी निर्माण करत या क्षेत्रात नोकरदार युवांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून केंद्राकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

समजून घ्या या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत तरुणांना पहिल्यांनाच नोकरी मिळाल्यानंतर 15000 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. यापूर्वी केंद्रानं सदर योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इंसेंटील नावानं लाँच केली होती, ज्यानंतर तिचं नामकरण करत विकसित भारत योजना अशी नवी ओळख या योजनेला देण्यात आली. ईपीएफओकडून ही योजना चालवली जाते.

कोणाला मिळणार 15000 रुपये?

पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या या योजनेचा लाभ त्या युवा वर्गाला मिळणार आहे ज्यांना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान नोकरी मिळेल. खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून PF ची रक्कम वजा होते त्यांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणखी एक अट म्हणजे इथं नोकरदार व्यक्तीचा पगार 1 लाख रुपयांहून कमी असावा. केंद्र शासनाकडून या योजनेअंतर्गत दोन भागांमध्ये रक्कम खातेधारकांच्या खात्यावर जमा केली जाईल, जिथं पहिला हफ्ता नोकरीच्या पहिल्या 6 महिन्यांच्या आतच जमा केला जाईल.

देशातील युवा वर्ग, MSMEs आणि विविध विभागातील प्रामुख्यानं मॅन्युफॅक्चरिंग, सर्विस आणि टेक्नोलॉजी यांसारख्या क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या वर्गाला केंद्र शासनाच्या वतीनं या योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे.

FAQ

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) म्हणजे काय?
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही भारत सरकारची रोजगार संलग्न प्रोत्साहन (Employment Linked Incentive – ELI) योजना आहे, जी 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झाली आहे.

या योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
पहिल्यांदा नोकरी करणारे कर्मचारी: ज्या युवकांना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान खासगी क्षेत्रात नोकरी मिळेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

योजनेचा लाभ कसा मिळवावा?
कर्मचारी: स्वतःहून अर्ज करण्याची गरज नाही. नियोक्ता कर्मचाऱ्याची माहिती (UAN, आधार, बँक तपशील, वेतन) EPFO च्या ECR (Electronic Challan-cum-Return) फॉर्मद्वारे सरकारकडे पाठवेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!