Homeदेश-विदेशमराठी नासा रोव्हर मधील स्पेस न्यूजने व्हायरल होणार्‍या मंगळ फोटोला कॅप्चर केले...

मराठी नासा रोव्हर मधील स्पेस न्यूजने व्हायरल होणार्‍या मंगळ फोटोला कॅप्चर केले नवीनतम अद्यतन माहित आहे


मंगळावरील नासा: अवकाशाशी संबंधित अनेक अशी रहस्य आहेत, ज्यांचा आजवर उलगडा झालेला नाही. अशा कैक रहस्यांवर जगभरातील विविध देशांच्या अवकाश संशोधन संस्था काम करत असून, यामध्ये भरीव योगदान दिलं आहे ते म्हणजे अमेरिकेच्या NASA या संस्थेनं.

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासानं नुकतेच त्यांच्या पर्सिवरेंस रोव्हरच्या माध्यमातून मंगळाची काही अशी दृश्य टीपली आहेत, ज्यांमध्ये मंगळ ग्रह कधीही पाहिला नव्हता इतक्या जवळून पाहण्याची संधीच मिळत आहे. पर्सिवरेंस रोव्हरनं टीपलेला हा 360 अंशांचा पॅनोरॅमिक व्ह्यू असणारा फोटो पाहताना प्रथमदर्शनी हे पृथ्वीवरीलच एखाद्या वाळवंटीय भागातील दृश्य असल्याचं स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात मात्र तो मंगळ ग्रह आहे हे मात्र विसरून चालणार नाही.

कुठे आणि कधी टीपण्यात आला हा फोटो?

नासाच्या पर्सिवरेंस रोव्हरनं 5 ऑगस्ट रोजी मंगळावरील एका साधारण ज्वालामुखीसारख्या आकाराच्या पर्वताचाही फोटो शेअर केला. जिथं व्यवस्थित पाहिलं असता एक हेल्मेटसारखी आकृतीसुद्धा दिसत आहे. मंगळावरील जीवसृष्टीच्या शोधात असणाऱ्या या रोव्हरनं टीपलेल्या कमाल फोटोमुळं संशोधकांना पृथ्वीपासून कैक मैल दूर असणाऱ्या या ग्रहाचं एक वेगळंच रुप या फोटोमुळं पाहायला मिलत आहे.

अंतराळविषयक माहिती पुरवणाऱ्या एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार मंगळावर सापडलेलं आणि काहीशी हेल्मेटच्या आकारंच भासणारं हे डोंगर या ग्रहावरील पर्यावरणीय इतिहासात डोकावण्याची संधी देईल. नासाच्या माहितीनुसार रोव्हरनं हा फोटो ‘लेफ्ट मास्टकॅम जेड कॅमेरा’चा वापर करत टीपला. संशोधकांच्या मते या डोंगराचा अनपेक्षित आकार तेथील रासायनिक बदल, खनिक अवक्षेपण किंवा ज्वालामुखीय स्फोटांमुळं झालेला असू शकतो.

दरम्यान या डोंगरावर पूर्ण वर्तुळाकार स्वरुपात आढळणाऱ्या कणांची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत मात्र शास्त्रज्ञांमध्ये दुमत पाहायला मिळत आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लेबोरेटरीमध्ये पर्सिवेरेंस टीमचे प्रवक्ता डेविड एगल यांनी माध्यमांशी संवाद साधताना साधारण हेल्मेटच्या आकारासम तयार झालेली ही वस्तू स्फेर्यूल्सपासून आकारास आली असून, त्याचं नाव हॉर्नफ्लाया असल्याचं सांगण्यात येत आहे.

नासाच्या या रोव्हरनं मंगळावर ‘सेंट पॉल्स बे’ नावाचा एक ‘फ्लोट रॉक’सुद्धा पाठवला होता. 2030 पर्यंत नासा ‘मार्स सँपल रिटर्न मिशन’अंतर्गत मंगळावरील हे नमुने पृथ्वीवर आणण्याच्या विचारात असून तोपर्यंत या ग्रहावरील आणखी कोणती माहिती जगासमोर येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

FAQ

नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील कोणत्या खास गोष्टींचा फोटो काढला?
नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने 5 ऑगस्ट 2025 रोजी मंगळावरील 360 अंशांचा पॅनोरॅमिक फोटो आणि हेल्मेटच्या आकाराचा डोंगर (हॉर्नफ्लाया) यांचे फोटो काढले.

स्फेर्यूल्स म्हणजे काय?
स्फेर्यूल्स हे छोटे, गोलाकार खनिज कण असतात, जे मंगळाच्या पृष्ठभागावर रासायनिक प्रक्रिया, ज्वालामुखीय क्रिया किंवा पाण्याच्या उपस्थितीमुळे तयार होतात. या कणांचा अभ्यास मंगळावरील भूतकालीन पाणी आणि जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत माहिती देऊ शकतो.

पर्सिव्हरन्स रोव्हरचे मंगळावरील उद्दिष्ट काय आहे?
पर्सिव्हरन्स रोव्हरचे मुख्य उद्दिष्ट मंगळावरील जीवसृष्टीच्या खुणा शोधणे आणि भूवैज्ञानिक माहिती गोळा करणे आहे. याशिवाय, तो मंगळावरील खडक आणि मातीचे नमुने गोळा करत आहे, जे मार्स सँपल रिटर्न मिशन अंतर्गत 2030 पर्यंत पृथ्वीवर आणले जाणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!