जम्मू काश्मीर क्लाउडबर्स्ट: काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या धराली इथं झालेल्या ढगफुटीनं देश हादरलेला असतानाच या नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून नागरिक सावरत नाहीत, तोच देशाच्या आणखी एका राज्याला ढगफुटीचा तडाखा बसला आहे.
प्राथमिक माहितीनुसार जम्मू काश्मीरच्या किश्तवाड इथं ढगफुटी झाली असून, यामध्ये एक लंगर वाहून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. ढगफुटीनंतर या भागातील नदी- नाले अतिप्रचंड प्रवाहासह वाहू लाहले आणि या भागातून कैक नागरिक बेपत्ता असल्याचंही म्हटलं गेलं. मात्र त्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ढगफुटीची ही घटना किश्तवाड जिल्ह्यातील मचैल मट्टा यात्रा मार्गावर घडली असून, येथील चिशोती नामक भागाचं सर्वाधिक नुकसान झालं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी घटनेबाबतची माहिती मिळताच स्थानिक DC शी संवाद साधत घटनास्थळासंदर्भातील माहिती मिळवली. जिथं बचावकार्याला वेग आल्याचं सांगण्यात येत आहे.
#वॉच | जम्मू -के | किशतवारमधील चशोटी भागात फ्लॅश पूर आला आहे, जो माचेल माता यात्राचा प्रारंभिक बिंदू आहे. बचाव ऑपरेशन सुरू केले गेले आहे. pic.twitter.com/dqbubx46a9
– वर्षे (@अनी) 14 ऑगस्ट, 2025
चिसोती, पद्दर माचेल, किशतवार क्लाऊड स्फोट, एकाधिक लोक गहाळ झालेल्या भयानक व्हिज्युअल रिपोर्ट्स #क्लाउडबर्स्ट #शॉप #Paddar #मायलेक @drmonika_langeh @Khajuramanu @Aajtak @रिपब्लिक @Aditionarajkaul pic.twitter.com/v2yiehohar
– राघव शर्मा (@राघव 7 आरएम) 14 ऑगस्ट, 2025
हानी मोठी, संभाव्य आकडा हादरवणारा…
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार ढगफुटीनंतर या प्रभावित क्षेत्रामध्ये साधारण 200 ते 300 नागरिक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर घटनेनंतर नागरिकांनी मचैल माता मंदिरातील भाविकांनी या भागात येऊ नये असा इशारा प्रशासनानं जारी केला आहे.
दरम्यान अद्यापही या आपत्तीमध्ये नेमकं किती नुकसान झालं याचा अधिकृत आकडा मात्र समोर येऊ शकलेला नाही. मात्र घटनेची व्याप्ती पाहता नुकसानाचा आकडासुद्धा मोठा असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या भागामध्ये सध्या बचावकार्यालाच प्राथमिकता दिली जात असून, नागरिकांना सुखरुप स्थळी नेणं हेच लक्ष्य केंद्रस्थानी ठेवण्यात येत आहे.
FAQ
जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीची घटना कुठे घडली?
जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पड्डर उपविभागात, मचैल मट्टा यात्रा मार्गावरील चिशोती गावात 14 ऑगस्ट 2025 रोजी ढगफुटी झाली.
या ढगफुटीमुळे काय नुकसान झालं?
ढगफुटीमुळे लंगर शेड (सामुदायिक स्वयंपाकघर) वाहून गेलं, परिसरातील नदी-नाल्यांमध्ये प्रचंड प्रवाह निर्माण झाला, ज्यामुळे फ्लॅश फ्लड (अचानक पूर) आला. काही नागरिक बेपत्ता असल्याची भीती आहे, परंतु याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेत जीवितहानी झाली आहे का?
प्राथमिक माहितीनुसार, जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे, परंतु मृत्यू किंवा बेपत्ता नागरिकांची नेमकी संख्या अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी तपास करत आहेत.























