Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नेतृत्व पाकिस्तान आधारित बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला परदेशी दहशतवादी संघटना...

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नेतृत्व पाकिस्तान आधारित बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त करते


डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानबद्दल मोठा निर्णयः पाकिस्तानला तेल उत्खननासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी सरकारने पाकिस्तानधार्जिण निर्णय घेणं सुरुच ठेवलं आहे.  आता अमेरिकेने पाकिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात सक्रिय असलेल्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ला (बीएलए) ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. बीएलएला ‘माजिद ब्रिगेड’ म्हणूनही ओळखले जाते. हा सशस्र गट गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी संघर्ष करत आहे. काही आठवड्यापूर्वीच पाकिस्तानमधील ट्रेन अपहरण कांडामुळे ही संघटना जगभरात चर्चेचा विषय ठरलेली.

अमेरिकेने नेमकं काय म्हटलंय?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत एक पत्र जारी केले आहे. ‘परराष्ट्र विभाग बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या ‘मजीद ब्रिगेड’ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करत आहे,’ असं या पत्रामध्ये म्हटले आहे. यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेने ‘बीएलए’चा ‘स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट ऑर्गनायझेशन’मध्ये समावेश केला होता.

ट्रेन अपहरण आणि आत्मघातकी हल्ल्यांवरील कारवाई

‘बीएलए’ अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. 2019 पासून, त्यांनी अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. 2024 मध्ये, बीएलएने कराची विमानतळ आणि ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलाजवळ आत्मघाती हल्ले केल्याचा दावा केला. त्यानंतर, 2025 मध्ये, बीएलएने दावा केला की त्यांनी मार्चमध्ये क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या ‘जाफर एक्सप्रेस’ ट्रेनचे अपहरण केले. या हल्ल्यामध्ये 31 नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले. ट्रेनमध्ये 300 हून अधिक प्रवासी होते ज्यांना ओलीस ठेवण्यात आले होते, असंही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.

अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी वचनबद्ध

‘बीएलए’ला दहशतवादी यादीत टाकण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावरुन अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. हशतवादी संघटनांची यादी तयार करण्याचा उद्देश दहशतवादापासून होणारे धोके कमी करण्याचा असल्याचं अमेरिकेने जारी केलेल्या पत्रात म्हटलंय. या निर्णयांच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे लाड अमेरिकेकडून सुरु असल्याचं दिसून येत आहे.

‘बीएलए’ने भारताकडे मागितलेली मदत

‘बीएलए’ने अनेकदा स्वतंत्र बलुचिस्तानच्या संघर्षामध्ये भारताकडे मदत मागितली. मात्र भारताने कधीही याला प्रतिसाद दिलेला नाही. मध्यंतरी भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले होते त्यावेळेस नायला क्वादरी नावाच्या महिला बुलिची नेत्याने भारताने आम्हाला स्वतंत्र होण्यासाठी मदत केली तर आम्ही जागोजागी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे उभारु असं विधान केलं होतं.

FAQ

1. अमेरिकेने कोणता निर्णय घेतला आहे?
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तिच्याशी संलग्न माजिद ब्रिगेडला ‘परदेशी दहशतवादी संघटना’ (Foreign Terrorist Organization – FTO) म्हणून घोषित केले आहे.

2. बीएलए म्हणजे काय आणि ती काय करते?
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ही पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेली सशस्त्र संघटना आहे, जी गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी संघर्ष करत आहे. ती पाकिस्तानी सुरक्षा दल आणि परदेशी प्रकल्पांवर, विशेषतः चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) शी संबंधित प्रकल्पांवर हल्ले करते.

3. या निर्णयाचा पाकिस्तानशी काय संबंध आहे?
हा निर्णय पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी घेण्यात आला. यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध मजबूत होत असल्याचे दिसते. तसेच, हा निर्णय पाकिस्तानला दहशतवादाचा बळी म्हणून दाखवण्यास आणि बीएलएच्या निधीवर निर्बंध आणण्यास मदत करेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!