Homeदेश-विदेशराज ठाकरेंना धमकावणारे पप्पू यादव VIDEO मुळे वादात, पैसे वाटताना दिसले; काय...

राज ठाकरेंना धमकावणारे पप्पू यादव VIDEO मुळे वादात, पैसे वाटताना दिसले; काय आहे नेमकं प्रकरण?


पप्पू यादव वादग्रस्त व्हिडिओ: हिंदी सक्तीचा वाद टोकाला पोहोचलेला असताना राज ठाकरेंना हेकडी काढेन म्हणून डिवचणारे खासदार पप्पू यादव महाराष्ट्रात चर्चेत आले होते. त्यांच्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली होती. दरम्यान बिहारचे खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव हे आता वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. असं काय आहे या व्हिडीओत? लोकं का टीका करतायत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे नमकं प्रकरण?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पप्पू यादव पूरग्रस्तांना भागात भेट देताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान 100 आणि 500 रुपयांच्या नोटा वाटताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्यांच्या नोटा वाटपाच्या शैलीवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पप्पू यादव यांना इतके पैसे कुठून मिळतात?

काही यूजर्सनी त्यांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. मात्र, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. लोक विचारत आहेत, “पप्पू यादव यांना इतके पैसे कुठून मिळतात?”पप्पू यादव यांनी यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ते श्रीमंत कुटुंबातून येतात आणि त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे. ते दिल्ली, पटना आणि पूर्णिया येथील त्यांच्या निवासस्थानांवर गरजूंना मोफत जेवण आणि निवासाची सुविधा पुरवतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी बिहारमधील अनेकांना मदत केली, अशी प्रतिक्रिया इंटरनेटवर व्यक्त केली जातेय.

संमिश्र प्रतिक्रिया

मी दीर्घकाळ सामाजिक कार्य केले, तरी राजकारणात अपेक्षित स्थान मिळाले नाही, असे विधान पप्पू यादव करत असतात. सोशल मीडियावर एका एक्स वापरकर्त्या, रोझी यांनी व्हिडिओ शेअर करत टीका केली. “पप्पू यादव 100 रुपयांच्या नोटा भिकाऱ्यांना देतात तशा वाटत आहेत, तरीही स्वतःला महान समजतात.” असे रोझी यांनी ट्विट करत म्हटले. या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले.

‘गरजूंच्या मनाला शांती मिळते’

दुसऱ्या एका एक्स यूजर श्याम अवध यादव यांनी लिहिले, “पप्पू यादव यांना पैसे कुठून येतात, यापेक्षा ते गरिबांच्या हातात पोहोचत आहेत, हे महत्त्वाचे आहे. 500 रुपयांची नोट मिळाल्यावर गरजूंच्या मनाला शांती मिळते.” अस असले, हे ट्विट जुने असल्याचेदेखील म्हटले जात आहे.

नोटा वाटपाची पद्धत संशयास्पद

पप्पू यादव यांनी यापूर्वीही अनेकदा गरजूंना आर्थिक मदत केल्याची उदाहरणे आहेत. पण या वादामुळे पप्पू यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कृतीमुळे काहींना त्यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी वाटत आहे, तर काहींना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि नोटा वाटपाची पद्धत संशयास्पद वाटत आहे. हा वाद बिहारच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुढील काही दिवस चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

FAQ

1. पप्पू यादव यांच्याबाबत सध्या कोणता वाद सुरू आहे?

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते पूरग्रस्तांना 100 आणि 500 रुपयांच्या नोटा वाटताना दिसत आहेत. या नोटा वाटपाच्या शैलीवरून त्यांच्यावर टीका आणि कौतुक दोन्ही होत आहे.

2. सोशल मीडियावर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे?

वापरकर्त्यांनी पप्पू यादव यांच्या नोटा वाटपाच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी त्यांना “भिकाऱ्यांना पैसे देण्यासारखे” वाटप केल्याची टीका केली, तर काहींनी गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. याशिवाय, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबाबतही शंका उपस्थित झाली आहे.

3. पप्पू यादव यांच्या उत्पन्नाबाबत काय माहिती आहे?

पप्पू यादव यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ते श्रीमंत कुटुंबातून येतात आणि त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे. ते दिल्ली, पटना आणि पूर्णिया येथील निवासस्थानांवर गरजूंना मोफत जेवण आणि निवासाची सुविधा पुरवतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!