Homeदेश-विदेशहेल्थ न्यूज आयआयटीयन सीईओने मायक्रोसॉफ्टने बेंगळुरू श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर 3 आणि दीड लाख...

हेल्थ न्यूज आयआयटीयन सीईओने मायक्रोसॉफ्टने बेंगळुरू श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर 3 आणि दीड लाख रुपये खर्च केले


मुख्य कार्यकारी अधिकारी श्वासोच्छवासाच्या वर्गांवर 3.5 लाख खर्च करतात: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या सीईओने अलिकडेच खुलासा केला आहे की, तो बेंगळुरूमध्ये श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर दरवर्षी साडेतीन लाख रुपये खर्च करतो. आयआयट मद्रासचा माजी विद्यार्थी असलेल्या या व्यक्तीने एक विशेष मुलाखत दिली आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण? आरोग्याचं कारण देत कोट्यवधींचा जॉब सोडून वयाच्या 39 व्या वर्षी निवृत्तीमागे या व्यक्तीचं लॉजिक काय आहे? पाहूयात…

स्वत: केला खुलासा

तुम्ही आतापर्यंत गायनाच्या क्लासबद्दल ऐकलं असेल, स्वयंपाकाच्या क्लासबद्दल ऐकलं असेल, वेगवेगळ्या खेळांच्या क्लासबद्दल ऐकलं असेल, पण कधी श्वास घेण्यासाठी एखादी व्यक्ती प्रशिक्षण घेतेय असं ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल की हा काय विचित्र प्रश्न आहे. मात्र एक व्यक्ती दरवर्षी 3.5 लाख रुपये श्वास कसा घ्यायचा यासंदर्भातील कार्यशाळेवर खर्च करते. हा खुलासा स्वत: या व्यक्तीने केलाय.

कोण आहे हा भारतीय?

अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानेच हा खुलासा करताना, श्वासोच्छवास कसा करावा यासंदर्भातील बंगळुरुमधील कार्यशाळांवर वर्षाला 3.5 लाख रुपये मी खर्च करतो असं म्हटलंय. ‘बिझनेस इनसाइडर’ला आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असलेल्या सुधीर कोनेरू यांनी हा खुलासा केला आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये 15 वर्ष यशस्वी वाटचाल केल्यानंतर, ‘स्व‍त्वाचा शोध घेण्यासाठी’ आणि आरोग्यासंदर्भातील नव्या प्रवासासाठी निवृत्ती घेतल्याचं सुधीर सांगतात. आता सुधीर स्वत:च्या आरोग्यासंदर्भात गुंतवणूक करण्यासाठी वेळ देत आहेत.

सध्या काय करतेय ही व्यक्ती?

वर्षाला साडेतीन लाख रुपये केवळ श्वासोश्वासांच्या कार्यशाळेवर खर्च करणाऱ्या सुधीर यांचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा असल्याचं दिसून येतं. सध्या सुधीर हे अमेरिकेतली सिएटल फिटनेस सेंटर, स्पा आणि सलूनसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘झेनोटी’ नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीचं नेतृत्व करत आहेत.

एका सेशनची फी 1 लाख 60 हजार रुपये

56 वर्षीय कोनेरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा ते बेंगळुरू येथील एका केंद्रात चार दिवसांच्या श्वसन कार्यशाळांना उपस्थित राहतात. या कार्यशाळांमध्ये दोन तासांचे ध्यान आणि श्वासोच्छवासासंदर्भातील सत्रांमध्ये विशिष्ट आध्यात्मिक श्वासोच्छवासाच्या पद्धती शिकवल्या जातात. या प्रत्येक कार्यशाळेची फी 1 लाख ते 1 लाख 60 हजार रुपयांदरम्यान आहे. मात्र दर अधिक वाटत असेल तरी हे फारच परिणामकारक असल्याचं सुधीर सांगतात. “हे उपचारात्मक पद्धत म्हणून आश्चर्यकारक फायदे देणारं आणि तितकेच शक्तिशाली आहे,” असं सुधीर म्हणाले.

वयाच्या 39 व्या वर्षी घेतलेली निवृत्ती

कॉर्परेट क्षेत्रामध्ये सुधीर यांनी 1992 मध्ये पाऊल टाकलं. वयाच्या 39 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती घेणाऱ्या सुधीर यांनी 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून कॉर्परेट क्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यानंतर 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सुधीर यांनी स्वतःची कंपनी, इंटेलिप्रेप सुरू केली. 2008 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी वैयक्तिक आरोग्य, योग, पॉवर ट्रेनिंग, धावणे या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी उमेदीच्या काळात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. “मी आर्थिकदृष्ट्या ज्या ठिकाणी पोहोचलो होतो तिथे मी आनंदी होतो. माझे ध्येय माझ्या वैयक्तिक कल्याणाभोवती आणि माझ्या कुटुंबासोबत राहण्याभोवती होते,” असं सुधीर यांनी मुलाखतीत सांगितलं. फक्त पैसे कमविण्यापलीकडे “माझ्या अस्तित्वाचा सखोल… अर्थ” शोधण्याचा माझा मानस आहे, असंही ते म्हणाले. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर, सुधीर त्यांच्या वयाच्या 41 व्या वर्षी म्हणजेच सन 2010 मध्ये निवृत्तीतून बाहेर आले आणि त्यांनी ‘झेनोती’ नावाची कंपनी सुरु केली.

कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यदायी धोरण

कामाच्या ठिकाणी निरोगी राहण्याला प्राधान्य देण्याचं सुधीर यांच्या कंपनीच्या धोरणांचा भाग आहे. म्हणूनच या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना धावण्याच्या, चालण्याच्या किंवा पोहण्याच्या प्रत्येक नव्या यशसाठी आर्थिक बक्षिसे दिली जातात. कर्मचाऱ्यांना स्पा आणि सलून, नाश्ता आणि समुपदेशन सत्रांची सुविधा पुरवली जाते. “आरोग्य म्हणजे सिक्स-पॅक असणं असं होतं नाही. आरोग्य म्हणजे पूर्ण संतुलन राखणे आणि तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार जगण्यास तुम्हाला सक्षम बनवणे याबद्दल आहे,” असं सुधीर सांगतात.

दरवर्षी ट्रीपला जातात

दररोज 10 ते 12 तास तणावपूर्ण भूमिकेत काम करूनही सुधीर त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी आरोग्याला प्राधान्य देतात. सुधीर सामान्यतः दररोज सकाळी सात वाजता उठतात. अगदी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील योग करतात आणि त्याचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक आरोग्य खर्च करण्यासाठी ते वर्षातून एक महिनाभर बालीमध्ये भटकंती करतात. याचा खर्च सुमारे 13 लाख रुपये आहे. या ठिकाणी ते योगासहीत मालिश आणि साउंड बाथसारख्या उपचारांवर लक्ष केंद्रित करतात.

FAQ

1) सुधीर कोनेरू कोण आहेत?

सुधीर कोनेरू हे भारतीय वंशाचे, अमेरिकेत राहणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. ते आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असून, मायक्रोसॉफ्टमध्ये 15 वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. सध्या ते ‘झेनोटी’ नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीचे नेतृत्व करतात, जी सिएटलमधील फिटनेस सेंटर, स्पा आणि सलूनसाठी वापरली जाते.

2) सुधीर कोनेरू यांनी श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर किती खर्च केला?

सुधीर कोनेरू बेंगळुरूमध्ये श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर दरवर्षी साडेतीन लाख रुपये खर्च करतात. या कार्यशाळांमध्ये चार दिवसांचे सत्र असते, ज्यामध्ये दोन तासांचे ध्यान आणि आध्यात्मिक श्वासोच्छवासाच्या पद्धती शिकवल्या जातात. प्रत्येक सत्राची फी 1 लाख ते 1 लाख 60 हजार रुपये आहे.

3) सुधीर कोनेरू यांनी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती का घेतली?

सुधीर यांनी वयाच्या 39 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती घेतली, कारण त्यांना स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याला, योगाला, पॉवर ट्रेनिंगला आणि धावण्याला प्राधान्य द्यायचे होते. त्यांनी सांगितले की, ते आर्थिकदृष्ट्या समाधानी होते आणि त्यांचे ध्येय वैयक्तिक कल्याण आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर केंद्रित होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!