Homeदेश-विदेशउत्तराखंड क्लाउडबर्स्ट इस्रोने धाराली फ्लॅश फ्लडचा उपग्रह फोटो शेअर्सच्या घटनेच्या काही दिवस...

उत्तराखंड क्लाउडबर्स्ट इस्रोने धाराली फ्लॅश फ्लडचा उपग्रह फोटो शेअर्सच्या घटनेच्या काही दिवस आधी इशारा दिला आहे


उत्तराखंड क्लाउडबर्स्ट इस्रो: मंगळवार (5 ऑगस्ट 2025) रोजी उत्तराखंडच्या (Uttarakhand News) उत्तरकाशी क्षेत्रात येणाऱ्या धराली भागात झालेल्या ढगफुटीनंतर महापूर आला. खीरगंगा नदीच्या पात्रानं सर्व मर्यादा ओलांडत डोंगरावरून मैदानी क्षेत्र गाठलं, मात्र वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट या भूस्खलन आणि पाण्याच्या लोंढ्यात नष्ट झाली. एकिकडे या संकटाची व्याप्ती दर दिवशी वाढत असतानाच दुसरीकडे एक अतिशय धास्तावणारी माहिती समोर आली आणि काही बाबतीत हलगर्जीपणा नेमका किती मगागात पडू शकतो हेसुद्धा लक्षात येत आहे.

इस्रोच्या संशोधकांचं निरीक्षण आणि उत्तराखंड…

उत्तराखंडच्यचा धरालीमधील सध्याची आपत्ती पाहता, वर्षभरापूर्वीच इस्रोच्या संशोधकांनी अशा संभाव्य संकटाचे संकेत एका अध्ययनाच्या माध्यमातून दिले होते. ‘अमर उजाला’नं इस्रोतील सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सदर निरीक्षणाचा अहवाल उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सोपवण्यातही आला होता. मात्र, तो अहवाल नेमका कुठं गेला, त्यावर काही अंमलबजावणी झाली की नाही, याबबातची माहिती मात्र समोर आलीच नाही.

इस्रोच्या निरीक्षणातून काय निष्पन्न झालं?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं या भागात केलेल्या निरीक्षणानुसार 6133 मीटर उंचीच्या श्रीकंठ पर्वतारील ग्लेशियर सातत्यानं वितळत असून, वर्षभरापूर्वीच आयआयआरएस-इस्रोच्या संशोधकांनी या संपूर्ण खोऱ्याचा अभ्यास आणि निरीक्ण केलं होतं. उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या माहिती आणि छायाचित्रांच्या आधारे करण्यात आलेल्या या निरीक्षणानुसार या खोऱ्यातील उंचवट्यावर असणाऱ्या बहुतांश भागांमध्ये लहानमोठे जलस्त्रोत निर्माण झाल्याचं स्पष्ट होत होतं.

पर्वतावर तयार होणाऱ्या या जलस्त्रोत आणि जलसाठ्यांना अधोरेखित करत 4000 मीटर किंवा त्यापेक्षा उंचीवरील भागात पाऊस झाल्यास प्रचंड मोठं संकट ओढावू शकतं असा स्पष्ट इशारा इस्रोच्या या संशोधकांनी दिला होता.  या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करणारा अहवाल यूएसडीएमकडे सोपवूनही त्यासंदर्भात विचारलं असता मात्र काहीही कल्पना नसल्याचच उत्तर मिळाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं.

आपत्ती व्यवस्थापन विभागाला अहवालाची कल्पनाच नाही?

सूत्रांच्या माहितीनुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग या अहवालापासून पूर्णपणे अनभिज्ञ असून, संशोधकांच्या इतक्या मोठ्या इशाऱ्याकडे गांभीर्यानं न पाहिल्यानंच इतकी मोठी हानी झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याच्या घडीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही इस्रोच्या अशा अहवालाची माहिती नसल्याचं म्हणत तो अहवाल नेमका कधी आणि कोणाकडे देण्यात आला होता, त्यात खरंच या आपत्तीच्या संकेतांना अधोरेखित करण्यात आलं होतं? असे प्रश्न उपस्थित करत आताच्या घडीला या परिस्थितीवर भाष्य करणं योग्य नसल्याची भूमिका मांडली.

दरम्यान, इस्रोनं नुकतंच सोशल मीडियावर उत्तराखंडच्या धराली भागातील उपग्रहाच्या माध्यमातून टीपलेली छायाचित्र समोर आणली. जिथं पहिलं छायाचित्र 13 जून 2024 रोजीचं तर, दुसरं 7 ऑगस्ट 2025 चं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. नदीच्या पात्रानं व्यापलेलं क्षेत्र आणि झालेला विध्वंस या दोन्ही छायाचित्रांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळं आता या प्रकरणावर उत्तराखंड प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FAQ

उत्तराखंडच्या धराली भागात नक्की काय घडलं?
मंगळवारी, 5 ऑगस्ट 2025 रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली भागात ढगफुटी झाली, ज्यामुळे खीरगंगा नदीला महापूर आला.

इस्रोच्या संशोधकांनी यासंदर्भात काय सांगितलं होतं?
इस्रोच्या संशोधकांनी वर्षभरापूर्वीच धराली भागातील श्रीकंठ पर्वतावरील ग्लेशियर सातत्याने वितळत असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.

इस्रोचा अहवाल काय होता आणि तो कोणाला देण्यात आला?
इस्रोने केलेल्या अभ्यासाचा अहवाल उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाला (USDMA) सोपवण्यात आला होता. या अहवालात संभाव्य संकटाचे संकेत आणि जलस्त्रोतांच्या निर्मितीची माहिती अधोरेखित करण्यात आली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!