Homeदेश-विदेश50 टक्के दर लागू केल्यावर ट्रम्पचे दर भारतात महाग असलेल्या गोष्टींवर परिणाम...

50 टक्के दर लागू केल्यावर ट्रम्पचे दर भारतात महाग असलेल्या गोष्टींवर परिणाम करतात


ट्रम्पचे दर भारतावर परिणाम करतात : अमेरिकेच्या (America India) राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या (Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी या महासत्ता राष्ट्राची सूत्र हाती घेतल्या क्षणापासून आयात शुल्कासंदर्भातील मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला आणि आता भारतावरही त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. भारतावर लागू करण्यात आलेल्या 25 टक्के वाढीव आयात शुल्कामुळं आता देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर एकूण 50 टक्के आयातशुल्क आकारलं जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्यामुळं भारतातील स्थानिक व्यापारातील अनेक क्षेत्रांवर आणि परिणामी सामान्यांवरही याचा परिणाम होताना दिसणार आहे. अर्थात या परिणामांचं स्वरुप वेगळं असलं तरीही बहुतांशी परिणाम हे आर्थिक बदलांमधीलच असतील असं जाणकारांनी स्पष्ट केलं आहे.

भारतातील कोणत्या क्षेत्राला बसणार ‘ट्रम्प’कार्डचा फटका?

स्पष्टच शब्दांत सांगावं तर, भारतातील चर्मउद्योग क्षेत्र, रसायन निर्मिती क्षेत्र, पादत्राणांचा व्यवसाय, खेळ, दागदारिने, कापडउद्योग, कोळंबीची शेती (मत्स्यशेती) या क्षेत्रांवर आयात शुल्क निर्बंधांचे थेट परिणाम होताना दिसतील.

भारतावर वाढीव 25 टक्के आयात शुल्काचा मारा हा रशियाकडून सुरू असणाऱ्या तेल खरेदीच्या मुद्दमुळं करण्यात येत असल्याचं खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच स्पष्ट केलं. 27 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून सध्याच्या घडीला फक्त भारत, चीन आणि तुर्की याच देशांसाठी अमेरिकेची ही कठोर भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान यापूर्वी अमेरिकेकडून घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक 25 टक्के आयात शुल्काच्या अंमलबजावणीची सुरुवात 7 ऑगस्टपासूनच करण्यात आली असून, त्यामागोमागच वाढीव आयात शुल्काचा मारासुद्धा यात भर घालणार आहे. तज्ज्ञांच्या मते अगदी सोप्या शब्दांत या आर्थिक युद्धाचं विश्लेषण करायचं झाल्यास, अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू (भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू) 40 ते 50 टक्क्यांनी महागणार आहेत.

किती टक्केवारीनं लागू होतंय आयात शुल्क?

नैसर्गिक रसायनं- 54 टक्के

कपडे – विणकाम केलेले (63.9 टक्के) विणकाम आणि इतर पद्धतींनी तयार केलेले (60.3 टक्के)

कापड – रेडीमेड (59 टक्के)

हिरे, सोनं आणि तत्सम उत्पादनं- 52.1 टक्के

यंत्र आणि तत्सम उपकरणं – 51.3 टक्के

फर्निचर, बेडिंग, मॅट्रेस- 52.3 टक्के

FAQ

अमेरिकेने भारतावर कोणता नवीन आयात शुल्काचा निर्णय घेतला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के वाढीव आयात शुल्क लागू केले आहे, ज्यामुळे एकूण आयात शुल्क 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

हा आयात शुल्काचा निर्णय का घेण्यात आला आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणांची खरेदी सुरू ठेवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या भारतीय क्षेत्रांवर या शुल्कवाढीचा परिणाम होईल?
भारतातील खालील क्षेत्रांवर या शुल्कवाढीचा थेट परिणाम होईल:

  • लेदर इंडस्ट्री (लेदर)
  • रसायन निर्मिती (केमिकल्स)
  • पादत्राणे (फूटवेअर)
  • खेळ (स्पोर्ट्स)
  • दागदागिने (ज्वेलरी)
  • कॅप्ड उद्योग (कापड)
  • कोळंबीची शेती (मत्स्यशेती/अॅक्वाकल्चर)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!