Homeदेश-विदेशयूएसए रोड अपघात 4 भारतीय लोक वेस्ट व्हर्जिनियामध्ये आढळतात

यूएसए रोड अपघात 4 भारतीय लोक वेस्ट व्हर्जिनियामध्ये आढळतात


वेस्ट व्हर्जिनिया अपघात: अमेरिकेमधून भारतीयांना हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथील वेस्ट व्हर्जनिया येथील धार्मिक स्थळाकडे जाणारं एक भारतीय वंशांचं कुटुंब अचानक गायब झालं. पाच दिवसांनंतर रविवारी या कुटुंबातील चौघांचे मृतदेह अत्यंत गूढ परिस्थितीमध्ये पोलिसांना आढळून आले. या चौघांबरोबर नेमकं घडलं काय? त्यांचा मृत्यू कसा झाला यासंदर्भातील तपास सध्या पोलीस करत आहेत.

मयत व्यक्ती कोण?

मूळचे न्यूयॉर्कमध्ये राहणारं दिवाण कुटुंब अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया येथील एका आध्यात्मिक स्थळी जात होतं. त्यावेळी अचानक हे कुटुंब बेपत्ता झालं. 2 तारखेला या कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले. मार्शल काउंटी शेरिफ कार्यालयाने चार सदस्यांचे मृतदेह आढळल्याचे रविवारी जाहीर केले. मृतांमध्ये आशा दिवाण (वय 85), किशोर दिवाण (89), शैलेश दिवाण (86) – आणि गीता दिवाण (84) अशी मृतांची नावे आहेत.

शेवटचे बर्गर किंगमध्ये दिसले अन्…

न्यूयॉर्कमधील दिवाण कुटंब न्यूयॉ बफेलो येथून वेस्ट व्हर्जिनियामधील प्रभुपाद्स पॅलेस ऑफ गोल्ड या आध्यात्मिक स्थळाकडे जात होते. या कुटुंबाने शेवटचा संपर्क 29 जुलै रोजी केला होता. पेनसिल्व्हेनियातील एरी येथील पीच स्ट्रीटवरील बर्गर किंगमध्ये हे चौघेजण शेवटचे दिसून आल्याची माहिती आहे. तेव्हापासून ते सर्वजण बेपत्ता होते.

मंदिरात गेले अन् पुढे निघाले पण…

अमेरिकी अधिकाऱ्यांनी हे मृतदेह सापडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या कुटुंबाच्या वापरात असलेली कार 29 जुलै रोजी दुपारी पेनसिल्व्हेनियामधील स्टेट टूपरच्या नंबरप्लेट रिडरमध्ये दिसून आली होती. तेव्हा ते आय-79 या महामार्गावरून दक्षिणेकडे जात होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी पिट्सबर्ग येथील एका मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर ते वेस्ट व्हर्जिनियामधील माउंड्सव्हिल येथे जाणार होते. तेथे पॅलेस लॉज हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने आधीच बुकिंग केले होते.

गूढ कायम

मात्र ते बुकिंग केलेल्या पॅलेस लॉज हॉटेलमध्ये पोहोचलेच नाहीत. अचानक हे चौघे गाडीसहीत गायब झाले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा त्यांना शोधण्याचा बराच प्रयत्न सुरु होता. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर या चौघांचे मृतदेह वेस्ट व्हर्जनिया येथे आढळून आले. या चौघांबरोबर नेमकं काय झालं? त्यांचा मृत्यू कसा झाला? यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणात सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आहेत. एका दाव्यानुसार या चौघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

फेसबूकवरून वन्यजीव तस्करी?:अहवालात दावा- फेसबूक बनले अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ऑनलाइन बाजार

0
जगभरात वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक गैर-सरकारी संस्थांच्या (NGO) एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, फेसबूक अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ज्ञात...
spot_img

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...
error: Content is protected !!