Homeदेश-विदेशबँक घोटाळा ऑडिटने धक्कादायक तपशील प्रकट केला

बँक घोटाळा ऑडिटने धक्कादायक तपशील प्रकट केला


ऑडिटने धक्कादायक तपशील प्रकट केला: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँक चर्चेत आली आहे. पीएनसी चर्चेत येण्यामागे एक धक्कादायक कर्ज प्रकरण कारण ठरत आहे. या प्रकरणामुळे बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या असून बँकेच्या विश्वासार्हतेसंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत.

87.5 कोटींचे 150 कोटी कसे झाले?

एका ताज्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार, बँकेने पृथ्वी रिअल्टर्स अ‍ॅण्ड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 87.5 कोटींचं कर्ज मंजूर केलं होतं. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण रक्कम फक्त कागदांपुरतीच मर्यादित राहिली आहे. कोणतीही रक्कम प्रत्यक्षात वितरितच (डिस्बर्स) करण्यात आली नाही. तरीही, या मंजूर रकमेवर व्याज आकारलं जात होतं. आता या कर्जाची रक्कम 150 कोटींच्या पुढे गेली आहे.

कोणी केलं ऑडिट?

दीपक सिंघानिया अ‍ॅण्ड असोसिएट्स या चार्टर्ड अकाउंटंट्सने ही ऑडिट तपासणी केली आहे.  बँक व कंपनी यांच्यात सुरू असलेल्या आर्बिट्रेशन प्रकरणात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे हा निष्कर्ष समोर आला आहे.

नक्की काय समोर आलं ऑडिटमध्ये?

ऑडिटनुसार, 87.5 कोटींच्या मॉर्गेज ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात आली होती. त्याच्या मोबदल्यात वसई येथील 54 हजार चौरस मीटर नॉन-अ‍ॅग्रीकल्चरल जमिन गहाण ठेवण्यात आली होती. पण 31 ऑक्टोबर 2012 नंतर खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही. या खात्यात ना निधी जमा झाला, ना खर्चाची नोंद दिसत आहे. प्रकरण जेव्हा आर्बिट्रेशन ट्रिब्यूनलपुढे गेलं, तेव्हा पॅनेलने याला केवळ प्रशासकीय चूक न मानता, एक पूर्वनियोजित आर्थिक फसवणूक असल्याचे स्पष्ट केले आहे.

आता पुढे काय?

आता हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) मध्ये विचाराधीन आहे. या प्रकरणावर एनसीएलटीमध्ये लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. कर्ज वितरितच न झाल्यास, ते वसूल करता येईल का? यावर कायदेशीर निर्णय होणार आहे.

ग्राहकांवर परिणाम होणार का?

ही तांत्रिक बाब असून सध्या तरी पीएनसीच्या ग्राहकांवर याचा कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.  ग्राहकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे.

बँकेचा पसारा किती मोठा?

पीएनसी ही मल्टी स्टेट बँक आहे. या बँकेची स्थापना 1983 मध्ये झाली आहे. या बँकेच्या एकूण 137 शाखा असून भारतातील सात ते आठ राज्यांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. या बँकेच्या एकट्या महाराष्ट्रात 100 शाखा आहेत. सहकारी सोसायटी कायद्याअंतर्गत या बँकेवर आरबीआय़चं नियंत्रण आहे. या बँकेच्या महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये शाखा आहेत. या बँकेची एकूण उलाढाल 1297 कोटींची असून बँकेने 2019 मध्ये 99.69 कोटींचा नफा गमवला होता. बँकेतील ग्राहकांची संख्या लाखोंमध्ये आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!