Homeदेश-विदेशनोव्हेंबरमध्ये एलियन्सचा पृथ्वीवर हल्ला? भूमीच्या दिशेने येतंय तबकडीसारखं अंतराळयान!

नोव्हेंबरमध्ये एलियन्सचा पृथ्वीवर हल्ला? भूमीच्या दिशेने येतंय तबकडीसारखं अंतराळयान!


एलियनने हल्ला केला: एलियन्स म्हणजेच परग्रहवासी. हे मानवजातीसाठी आजही एक रहस्यमय आणि अनाकलनीय कोडे आहे. त्यांच्या अस्तित्वाबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे, आणि यामध्ये काही आश्चर्यजनक बाबी समोर आल्या आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात, असा दावा अलीकडेच शास्त्रज्ञांनी केलाय.  हा दावा का आणि कसा करण्यात आला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

रहस्यमय अंतराळ पिंडाचा धोका?

शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, मॅनहॅटन शहराएवढ्या आकाराचा एक गूढ अंतराळ पिंड प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येतंय. या पिंडाला 3I/ATLAS असे नाव देण्यात आले आहे, ज्याला यापूर्वी A11pl3Z म्हणून संबोधले जात होते. हे पिंड एलियन्सच्या तंत्रज्ञानाचा भाग असण्याची शक्यता आहे. हे अंतराळ पिंड नोव्हेंबर 2025 मध्ये पृथ्वीच्या जवळ येईल, आणि यावेळी त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याचा धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हा दावा कोणी केला?

हा सनसनाटी दावा हार्वर्ड विद्यापीठाचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर एवी लोएब आणि त्यांच्या संशोधन टीमने केला आहे. प्रो. लोएब हे तेच शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी 2017 मध्ये आंतरतारकीय अंतराळात दिसलेल्या ‘ओमुआमुआ’ या विचित्र वस्तूला एलियन अंतराळयान असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांच्या नवीन अभ्यासानुसार, 3I/ATLAS हे पिंड नोव्हेंबर 2025 च्या अखेरीस सूर्याच्या सर्वात जवळ येईल. यावेळी ते पृथ्वीच्या रडारपासून लपून राहण्याची शक्यता आहे, आणि याच संधीचा फायदा घेऊन ते पृथ्वीवर गुप्त हल्ला करू शकते, असा इशारा लोएब यांनी दिला आहे.

3I/ATLAS ची पहिली झलक कशी आहे?

3I/ATLAS, ज्याला काही तज्ज्ञांनी ‘एलियन अंतराळयान’ असेही संबोधले आहे. सर्वप्रथम चिलीमधील रियो हुर्ताडो येथील ATLAS (Asteroid Terrestrial-impact Last Alert System) दुर्बिणीतून दिसले. या पिंडाची रुंदी अंदाजे 10 ते 20 किलोमीटर आहे, आणि तो ताशी 60 किलोमीटरच्या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येत आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की ही माहिती केवळ एक गृहीतक आहे, आणि यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. तरीही, हा विषय इतका गंभीर आहे की त्यावर सखोल चर्चा आणि संशोधन आवश्यक आहे. जर हा सिद्धांत खरा ठरला, तर हे पृथ्वीसाठी एक प्रचंड संकट ठरू शकते.

शास्त्रज्ञांचा सावध पवित्रा का?

‘आम्ही या पिंडाला एलियन तंत्रज्ञान मानत नाही, पण त्याची शक्यता नाकारता येत नाही. या पिंडाच्या गती आणि आकारामुळे त्याचा धोका गंभीर आहे. जर त्याने पृथ्वीशी टक्कर केली, तर त्याचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात’, असे प्रो. लोएब आणि त्यांच्या टीमने सावधगिरीचा इशारा देताना म्हटले. या पिंडाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, आणि येत्या काही महिन्यांत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

पृथ्वीवरील संभाव्य धोका काय?

जर 3I/ATLAS खरोखरच एलियन अंतराळयान असेल आणि त्याने पृथ्वीवर हल्ला केला, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? शास्त्रज्ञांनी याबाबत ठोस उत्तर दिलेले नाही. पण अशा घटनेची शक्यता मानवजातीसाठी अभूतपूर्व आव्हान निर्माण करू शकते. दुसरीकडे, काही तज्ज्ञांचे मत आहे की हे पिंड एलियन यान नसून केवळ एक नैसर्गिक खगोलीय पिंड, जसे की लघुग्रह, असू शकते. तरीही, त्याचा आकार आणि वेग पाहता, त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

अधिक ठोस पुरावे आणि संशोधनाची गरज

3I/ATLAS या रहस्यमय पिंडाबाबत शास्त्रज्ञांचा दावा खळबळजनक असला, तरी याबाबत अधिक ठोस पुरावे आणि संशोधनाची गरज आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला होईल, हा दावा सध्या केवळ एक सिद्धांत आहे. तरीही मानवाने यासारख्या संभाव्य धोक्यांबाबत सजग आणि तयार राहणे गरज व्यक्त करण्यात येतेय. शास्त्रज्ञ या पिंडावर सतत नजर ठेवून असून लवकरच याबाबत अधिक स्पष्टता मिळण्याकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!