Homeदेश-विदेशवर्ल्ड न्यूज डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया कडून भाड्याने घेतलेल्या टेकनिंग ऑन इंडियाला...

वर्ल्ड न्यूज डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया कडून भाड्याने घेतलेल्या टेकनिंग ऑन इंडियाला गूगल मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांनी अमेरिकन लोकांवर लक्ष केंद्रित केले.


अमेरिकेतील भारतीय कर्मचार्‍यांवर डोनाल्ड ट्रम्प: परदेशातील नोकरीचा अनेकांनाच हेवा वाटतो. परदेशी चलनामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना तेथील कार्यालयांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या आणि तेथील जीवनशैली या अनेक कारणांमुळ बहुतांश भारतीय परदेशात आणि त्यातही (America) अमेरिकेत जाऊन बड्या Tech कंपन्यांमध्ये काम करण्याची स्वप्न पाहतात. आता मात्र या स्वप्नांना विसरण्याची वेळ आली आहे आणि यास कारण ठरत आहे ती म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांची कठोर भूमिका.

भारतीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नो एन्ट्री?

ट्रम्प यांनी अमेरिकेत असणाऱ्या जगातील काही मोठ्या टेक कंपन्यांना स्पष्ट सूचना करत भारतासह इतर कोणत्याही देशांतून कर्मचारी नियुक्त करण्यात सक्त मनाई केली आहे. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटासारख्या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. बुधवारी वॉशिंग्टन इथं आयोजित AI Summit दरम्यान ट्रम्प यांनी ही कठोर भूमिका मांडत अमेरिकी नागरिकांच्या कौशल्याला वाव देण्याचा आग्रही सूर या कंपन्यांना उद्देशून आळवला.

जगातील मोठ्या टेक कंपन्यांनवर भारतीय, मग आता त्यांचं काय?

आतापर्यंत जगभरात नावाजल्या केलेल्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये उच्च पदांवर भारतीय वंशांच्या नागरिकांची वर्णी लागली आहे. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, यात भर म्हणजे हल्लीच मेटाच्या AI टीममध्ये नव्या सदस्यांचा समावेश असून, यामध्ये कैक भारतीयांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

जागतिक विचारसरणीवर ट्रम्प यांनी का केली टीका?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या संम्मेलनामध्ये डोनाल्ड ट्रम्प काही मुद्द्यांवर अधिकच कठोर भूमिका घेताना दिसले. जिथं त्यांनी जागतिक स्तरावरील विचारसरणीला टीका केली. याच कारणास्तव कैक अमेरिकी नागरीक आणि अमेरिकी नागरिकांच्या कौशल्याला वाव मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरत असा दावाही केला, जिथं बड्या कंपन्या नफ्याच्या उद्देशानं अमेरिकेत मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा फायदा घेत बाहेरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

चीन आणि भारताचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प असं नेमकं म्हणाले तरी काय?

अमेरिकेकडून मिळणारी मुभा पाहता बऱ्याच अमेरिकी कंपन्या चीनमध्ये त्यांच्या फॅक्ट्री आणि तत्सम प्लांट सुरू करत तिथं भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरी देतात आणि आपल्याच देशातील नागरिकांना नाकारतात, त्यांच्यावर टीका करतात अशी बाब ट्रम्प यांनी प्रकाशात आणली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

अमेरिका फर्स्ट… ट्रम्प पुन्हा जरा स्पष्टच बोलले!

जागतिक महासत्ता राष्ट्र असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या क्षणापासूनच ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ ही भूमिका प्रकर्षानं उचलून धरली आणि त्याचाच पुनरुच्चार त्यांनी या संम्मेलनादरम्यानही केला. देशाप्रती एकनिष्ठा दाखवा, आपल्याला अमेरिकी कंपन्यांची गरज असून त्या अमेरिकेतच राहिल्या पाहिजेत असं ते स्पष्टच म्हणत त्यांनी अमेरिकी नागरिकांनासुद्धा America First या तत्वानंच चालण्याचं आवाहन केलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!