Homeदेश-विदेशVIDEO : संयुक्त राष्ट्र संघटनेत मराठीची गर्जना; वर्षा देशंपाडेंचं भाषण एकदा पाहाच,...

VIDEO : संयुक्त राष्ट्र संघटनेत मराठीची गर्जना; वर्षा देशंपाडेंचं भाषण एकदा पाहाच, मराठीप्रेम होईल द्विगुणित


महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरुन रणकंदान सुरु असतानाच संयुक्त राष्ट्र संघटनेत मराठीची गर्जना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मराठमोळ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विदर्भाची कन्या आणि साताऱ्याची सून असलेल्या डॉ. वर्षा देशपांडे यांचा हा व्हिडीओ मराठी लोकांची छाती अभिमानाने द्विगुणीत करत आहे. जागतिक स्तरावर त्यांचं मोठा सत्कार करण्यात आला. त्यांच्या 35 वर्षांच्या संघर्षाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आलं. इंदिरा गांदी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार पटकवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.

संयुक्त राष्ट्र संघटनेत मराठीची गर्जना!

लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असून तब्बल 33 वर्षांनंतर हा बहुमान भारताला देण्यात आला आहे. हा सन्मान स्विकारल्यानंतर या सोहळ्यात भाषणाची वेळ आल्यानंतर वर्षा देशपांडे यांनी चक्क मराठीतून संवाद साधला. हा व्हिडीओ सर्वांचं मनं जिंकून घेत आहे. त्यांनी भाषणाला सुरुवात करताना त्या म्हणाल्यात की, मी इंग्रजीतून बोलू शकतं, परंतु महिला म्हणून मी या क्षेत्रात वावरताना माझी मातृभाषा मराठी आहे. या भाषेचा आदर या व्यासपाठीवर व्हावा त्यामुळे मी माझ्या मातृभाषेत बोलत आहे. हा सन्मान संपूर्ण जगभरातील, भारतातील, महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी, लोकांच्या सोबत राहून लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संस्था, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हा सन्मान होतोय अशी माझी धारणा आहे. संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मुल्याचे आणि तत्वाचे, मानवी प्रतिष्ठा, उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्कांसाठी मी त्यांच्यासोबत राहण्याची ग्वाही देते आहे.

पुढे त्या म्हणाल्यात की, इतकंच नाही तर आपण सर्व जण मिळून आजचा वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असताना भविष्य काळातील जग हे मानवाधिकाराचे रक्षण करणारे, स्त्री-पुरुष समतेचा अंगिकार करणारे, अहिंसेने आणि शांततेने सगळ्यांना जीवनाचा अनुभव घेता येईल असं जग घडवण्याचा निर्धार आपण सगळेजण करतो. आपल्या भावी पिढीची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आज त्या दिशेने पडलेले माझे महत्त्वाचे पाऊल आहे. हा पुरस्कार भविष्य काळात मला ऊर्जा देईल. समस्त भारतीयांच्या वतीने, जगभरात लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी नम्रतापूर्वक हा पुरस्कार स्वीकारते असं त्या म्हणाल्यात.

विदर्भाची कन्या आणि साताऱ्याची सून!

वर्षा देशपांडे या मूळच्या वर्धा जिल्ह्यातील  हिंगणघाट तालुक्यातील ‘साती’ गावातील आहेत. तर लग्नानंतर त्या साताऱ्यात वास्तव्याला आहेत. ॲड. वर्षा देशपांडे यांचे पती संजीव बोंडे हे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि आता ते निवृत्त आहेत. वर्षा देशपांडे यांनी 1988 मध्ये झोपडीतून सामाजिक कार्याला स्वत:ला झोकून दिलं. त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी दलित महिला विकास मंडळाची स्थापना केली. त्यांनी एचआयव्हीग्रस्त ट्रक चालक, क्लीनर, फिरता वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी प्रकल्प चालविले. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्टिंग ऑपरेशन करून जवळपास 180 डॉक्टरांवर कारवाई केली आहे. त्यांना आतापर्यंत 20 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या 35 वर्षांत भारतात लैंगिक समानतेसाठी काम केले. त्यांनी जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या स्तरांवर काम केले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!