Homeदेश-विदेशशंकराचार्य यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असा अंदाज वर्तविला आहे

शंकराचार्य यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असा अंदाज वर्तविला आहे


नरेंद्र मोदी सेवानिवृत्ती: सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली याचा अर्थ थांबायला हवं असं सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवृत्तीचा सल्ला दिल्याचा दावा केला जात आहे. मोहन भागवत यांच्या विधानानंतर आता नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा रंगलेली असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असं भाकीत ‘झी 24 तास’शी बोलताना वर्तवलं आहे.

मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “हीच तर समस्या आहे. बोलतातही आणि नंतर अंदाज लावण्यासाठी सोडून देतात. जर आहे तर स्पष्ट सांगितलं पाहिजे”.

पुढे त्यांना सांगितलं की, “सरकारी कार्यालयांमध्ये निवृत्तीसाठी 65 तर काही ठिकाणी 60 वयाची अट आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्यासाठी 75 वय असावं अशी अटक स्वत: त्यांनी तयार केली. या नियमाचा प्रभाव अनेक ज्येष्ठ नेत्यांवर पडला आणि त्यांना निवृत्त केलं गेलं. त्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं. नियम तयार करताना आपणही 75 वर्षांचे होऊ याची कल्पना होती. तरीही त्यांनी तो नियम बनवला. अर्थात त्यांची 75 वर्षं पूर्ण झाल्यानंतर ते आपला नियम तोडणार नाहीत. आम्हाला वाटतं की, सप्टेंबरमध्ये किंवा एक दोन महिने पुढे मागे नियमाचा आदर करत राजीनामा देतील”. नियमांचं पालन करुन त्यांनी आदर्श पाळला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=VBVA9ISF94K

मोहन भागवत काय म्हणाले?

75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं विधान मोरोपंत पिंगळे यांनी केल्याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली. साप्ताहिक विवेक निर्मित आणि मंदार मोरोणे व प्रांजली काणे लिखित ‘मोरोपंत पिंगळे – द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक . मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

‘ठाकरे बंधू एकत्र राहणार नाहीत’

ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर शंकराचार्यांनी शंका व्यक्त केली आहे. दोघांचे स्वभाव; शैली भिन्न आहेत. एकत्र आले तरी सोबत राहतील असं वाटत नाही असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले आहेत. राज ठाकरे स्ट्रेट फॉरवर्ड, हिंदुत्ववादी हार्ड लाईन घेणारे आणि उद्धव ठाकरे सर्वसावेशकतेचं राजकारण करणारे त्यामुळे हे दोघे एकत्र राहतील की नाही याबाबत शंका आहे. मात्र दोघांनी राजकीय मुद्द्यांचा एक फॉर्म्युला नक्की करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दोन्ही ठाकरे आता एकत्र आले असतील तर एकत्रच राहीले पाहिजे; विभक्त झाले तर लोकांना वाईट वाटेल. महाराष्ट्राला यांच्या एकत्र येण्यानं आनंद झाला आहे असं त्यांनी सांगितलं

ठाकरे मूळचे मगधचे आहेत. महाराष्ट्रातील नाही, त्यांना मागधी भाषा येतेय का? त्यांनी मागधीत बोलुन दाखवावं असंही आव्हान त्यांनी दिलं. भाषीक अस्मितेवर चालणारं राजकारण फारसं यशस्वी होणीर नाही; फारसं चालणार नाही. हिंदी असो किंवा मराठी कोणतीही भाषा थोपता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

तामिळनाडूत हिंदीला सर्वाधिक विरोध झाला मात्र आता विरोध झाल्यामुळेच तामिळनाडूत सर्वांना हिंदी येते. जर राज ठाकरेंना वाटत असेल प्रत्येकाला मराठी यावं तर त्यात चूक नाही मात्र त्यासाठी मारहाण चुकीची असंही त्यांनी सांगितलं. मी दोन महिने मुंबईत आहे. मलाही मराठी शिकायचं आहे. मला ज्ञानेश्वरी मूळ भाषेत वाचायची आहे अशी इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!