Homeदेश-विदेशइंडियास शुभंशू शुक्लासह ईएसए अ‍ॅक्सिओम 4 क्रू 14 जुलैच्या मागे परत येण्यापूर्वी...

इंडियास शुभंशू शुक्लासह ईएसए अ‍ॅक्सिओम 4 क्रू 14 जुलैच्या मागे परत येण्यापूर्वी परत येण्याची शक्यता नाही.


शुभंशु शुक्ला अ‍ॅक्सिओम 4: अवकाश क्षेत्रात भारताचं नाव आणखी उंचावणाऱ्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या एक्सिओम 4 (Shubhanshu Shukla axiom 4) या आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. सध्याच्या घडीला शुक्ला मागील 12 दिवसांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथं मुक्कामी असून त्यांच्या मोहिमेतील महत्त्वाचे टप्पे गाठत आहेत.

25 जून 2025 रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटनं शुक्ला आणि त्यांचे साथीदार अमेरिकेचे अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उजनान्स्की विन्सिव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कपू हेसुद्धा त्यांच्यासोबत असून हा चमू 10 जुलैनंतर केव्हाही पृथ्वीवर परतू शकतो असं सांगण्यात आलं होतं.

परतण्यास विलंबाचे संकेत….

10 जुलै हा दिवस उजाडला आणि शुक्ला यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम पृथ्वीवर परतणार याचे वेध अनेकांना लागलेले असतानाच युरोपीय अंतराळ संशोधन संस्था इएसएनं मात्र त्यांच्या या परतीच्या प्रवासात विलंब होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. हा चमू 14 जुलैपूर्वी परतणं शक्यच नाही म्हणजेच किमान 3 ते 4 दिवसांच्या दिरंगाईनं हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं म्हटलं जात आहे.

पृथ्वीवर अंतराळवीर नेमके कसे परतणार? काय आहे प्रक्रिया?

शुभांशू शुक्ला आणि एक्सिओम मोहिमेसाठी गेलेला त्यांचा संपूर्ण चमू काहीशा विलंबानं पृथ्वीवर परतणार म्हणताच अनेकांनाच भारतीय वंशाच्या आणि नासाच्या वतीनं अंतराळात गेलेल्या सुनीता विलियम्स यांच्या मोहिमेची आठवण झाली, जिथं त्यांचा  दिवसांचा मुक्काम कैक महिने लांबला होता.

इथं शुक्ला आणि त्यांच्या टीमच्या परतीच्या प्रवासात हवामान बदल आणि काही तांत्रिक कारणं अडचणी निर्माण करु शकतात असं म्हटलं जात आहे. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे फ्लोरिडाच्या किनारपट्टी भागात बिघडलेलं हवामान.

एक्झिओम 4 ची संपूर्ण टीम ड्रॅगन कॅप्सूल ‘ग्रेस’च्या माध्यमातून पृथ्वीवर परतणार आहे. हे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर अटलांटिक महासागरात किंवा मेक्सिकोया खाडीमध्ये सॉफ्ट स्प्लॅशडाऊन होईल अर्था पाण्यात हळुवार उतरेल. मात्र जर या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असला, पाऊस किंवा वादळी परिस्थिती असेल तर मात्र हे यान सुरक्षितरित्या इथं उतरवता येऊ शकत नाही.

युरोपीय अंतराळ संस्था आणि नासानं हवामानाचा आढावा घेत या परिस्तितीमुळं हा परतीचा प्रवास 14 जुलैपर्यंत लांबणीवर पडू शकतो अशी प्राथमिक शक्यता वर्तवली आहे. ज्यामुळं या मोहिमेत सहभागी असणाऱ्या अंतराळवीरांना आणखी काही दिवस आयएसएसवरच मुक्काम करावा लागू शकतो.

अंतराळवीरांच्या परतण्याची संपूर्ण प्रक्रिया अतिशय क्लिष्ट…

एक्झिओम 4 मोहिमेत सहभागी असणाऱ्या अंतराळवीराच्या परतीच्या प्रवासात काही टप्प्यांचा समावेश आहे.

तयारी- टीममधील सदस्यांनी या टप्प्यावर सर्व वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण करून प्रयोगाचे नमुने, बीज, माहिती कॅप्सुलमध्ये संग्रहित करणं अपेक्षित असतं.

आरोग्य तपासणी- परतीच्या प्रवासापूर्वी या अंतरावीरांची वैद्यकीय तपासणी होऊन ते पृथ्वीच्या वातावरणात परतण्यासाठी योग्य स्थितीत आहेत याची तपासणी केली जाईल.

Undocking- या टप्प्यावर ड्रॅगन कॅप्सूल आयएसएसपासून वेगळं होईल. ही प्रक्रिया स्वयंचलित असेल. मात्र नासा आणि ग्राऊंड कंट्रोल क्रूचंही त्यावर नियंत्रण असेल.

सेवानिवृत्ती- अनडॉकिंगनंतर हे कॅप्सूल आयएसएसपासबव दूर जाऊन पृथ्वीवर परतण्यासाठी कक्षा निर्धारित करेल. या प्रक्रियेसाठी 28 तासांचा कालावधी लागेल. हे कॅप्सूल पृथ्वीच्या कक्षेत 28000 किमी प्रतितास इतक्या वेगानं प्रवेश करेल.

वातावरणात प्रवेश- ताशी 28000 किमी इतक्या प्रचंड वेगाने हे कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल यावेळी त्यावरील आवरणाचं तापमान साधाराण 2000 अंश सेल्सिअस इतकं असेल. यानंतर पॅराशूटच्या मदतीनं कॅप्सूलची गती कमी करून ते सुरक्षितरित्या समुद्रात उतरवलं जाईल आणि त्यातून अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जाईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!