Homeदेश-विदेशचीन धरणाच्या प्रकल्पामुळे पृथ्वी रोटेशनची गती मंदी होऊ शकते अरुणाचल सीएम पेमा...

चीन धरणाच्या प्रकल्पामुळे पृथ्वी रोटेशनची गती मंदी होऊ शकते अरुणाचल सीएम पेमा खंदू म्हणाले की, वॉटर बॉम्बने सांगितले की यामुळे विध्वंस होऊ शकते


चीन धरण प्रकल्प: भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरू असणारा सीमावाद थांबण्याचं नाव घेत नसतानाच चीन आणि अमेरिकेचा आयात शुल्कावरून सुरू असणारा वादही सर्वज्ञात आहे. अशातच चीन मात्र आपल्या खुरापती सुरूच ठेवताना दिसत असून आता तर या देशानं थेट निसर्गालाच आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगाला हादरवणारं काम सध्या चीन करत असून त्याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या चीन असं काय करतंय ज्यामुळं जगाला धोका?

उपलब्ध माहितीनुसार चीन जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत असून त्यासाठी एक मोधा बंधारा उभारत आहे. तिबेटच्या यारलुंग इथं असणाऱ्या त्सांगपो नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस डॅमहूनही हा बंधारा तिप्पट मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. हाच बंधारा भारतासाठी धोक्याची घंटा असून तो ‘वॉटर बॉम्ब’ही ठरु शकतो. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी यासंदर्भातील सावधगिरीचा इशारा देत लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री?

चीनच्या या बंधाऱ्याविषयी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले, चीनची ही परियोजना आपल्या स्थानिकांसाठी आणि उपजीविकेसाठी अस्तित्वाचाच धोका निर्माण करु शकते आणि ही अतिशय घातक बाब आहे. चीनकडून या बंधाऱ्याचा वापर वॉटर बॉम्ब म्हणू केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

तिबेटच्या यारलुंग नदीवर बांधण्यात येणारा हा बंधारा फक्त तिबेटपुरताच सिमीत नसून, भारताच्या अरुणाचल प्रदेशापर्यंत त्याचे परिणाम दिसून सियांग नदीत त्याचं रुपांतर होतं. पुढे दिबांग आणि लोहितसारख्या सहायक नद्यांच्यासाधीनं ब्रह्मपुत्रेत त्याचं रुपांतर होतं, ज्यावर भारत आणि बांगलादेशचे नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.

चीनचा मेगाप्लान, भारतासाठी धोका….

चीनचा बंधारा पूर्ण झाल्यास त्यातून 60,000 मेगावॅट उर्जा उत्पन्न केली जाऊ शकते. याच बंधाऱ्याच्या माध्यमातून चीन पाणी थांबवू आणि सोडूही शकतं. चीननं पाणी रोखलं तर, अनेक नद्यांची पात्र कोरडीठाक पडतील, तर अचानक पाणी सोडलं तर भारतात पूराचा धोका उदभवू शकतो.

मुख्यत्वे या बंधाऱ्यांमुळं हिमालयाचा संवेदनशील भाग प्रभावित होणार असून, त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या भुयारामुळं धोका आणखी वाढेल. सोबतच भूकंप, भूस्खलनापासून बचावही अशक्य असल्याचं म्हटलं जात आहे. चीनच्या या बंधाऱ्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या गतीवर होणार असून ती मंदावण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं चीन निसर्गालाच आव्हान देत आहे असं म्हणणं गैर नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!