Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प ब्रिक्स 10 टक्के दर भारत चीन ब्राझील डॉलर मॅराथी मधील...

डोनाल्ड ट्रम्प ब्रिक्स 10 टक्के दर भारत चीन ब्राझील डॉलर मॅराथी मधील ताज्या जागतिक बातम्या

डोनाल्ड ट्रम्प ब्रिक्स टॅरिफ इंडिया: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांनी आशियाई देशांसह इतरही काही राष्ट्रांवर आयातशुल्काचा बडगा उगारला असतानाच आता BRICS देशांनासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट इशारा देत 1 ऑगस्टपासून 10% Tariff लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या आरोपानुसार ब्रिक्स संघचनेडून सातत्यानं अमेरिकेचा डॉलर कमकुवत करण्यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत.

‘BRICS आमच्या नुकसानासाही आणि डॉलरला कमकुवत करण्यासाठीच तयार करण्यात आली होती. मात्र जी राष्ट्र BRICS चा भाग आहेत त्यांना आता 10टक्के आयातशुल्क भरावं लागणार आहे. अमेरिकी डॉलरची ताकद कायम होती आणि त्याला आव्हान देणाऱ्याना मोठी किंमत मोजावी लागेल’, असं ट्रम्प म्हणाले.

डॉलर राजा आहे आणि तो तसाच राहील असं म्हणत, ज्यांना इथं आव्हान द्यायचंय ते तसं करु शकतात. मात्र त्यांना मोठी किंमत फेडावी लागेल अशा शब्दांत ट्रम्प यांनी धमकीचा सूर आळवत ही किंमत मोजण्यासाठी कोणीही तयार नसावं असा उपरोधिक टोलासुद्धा लगावला. भारताविषयी विचारलं असता ब्रिक्स सदस्य असल्यामुळं भारतालाही 10 टक्के आयात शुल्क भरावं लागणार आहे, इथं कोणालाही कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. दरम्यान ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा ब्रिक्सकडून विरोध केला जात असून, हा निर्णय WTO नियमांविरोधात असल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅरिफ म्हणजे काय, थोडक्यात समजा…

टॅरिफ एक सीमाशुल्क, आयातशुल्कपर कर आहे.
– परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या सामानावर हा कर लागू होतो.
– टॅरिफ लागू झाल्यामुळं घरगुती बाजारपेठांमध्ये परदेशी सामानाचे दर वाढतात.
– टॅरिफ नियमामुळं सरकारच्या तिजोरीत भर पडत जाते.
– घरगुती उत्पादनक्षमतेला वाव देणं आणि देशांतर्गत उद्योग संरक्षित ठेवणं हा या करप्रणालीमागचा मुख्य हेतू समजला जातो.

भारतासोबत व्यापारात तडजोड?

भारताविषयी बोलताना ट्रम्प यांनी तडजोडीची भाषा वापरली. किंबहुना ही तडजोड आताच किंवा ट्रम्प यांच्या भारत यात्रेदरम्यान होऊ शकते. ज्याअंतर्गत दोन्ही देशांना 2030 पर्यंत परस्पर व्यवहाराची आकडेवारी 500 अब्ज डॉलरपर्यंत नेणं अपेक्षित आहे. यामध्ये शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांचा समावेश नसेल. अमेरिका कृषी उत्पादनं, वैद्यकिय उपकरणं, कारखान्यातील उत्पादनं यांच्यावर कमी आयातशुल्काची अपेक्षा ठेवत आहे. तर, भारताला कापड निर्यातीमध्ये चांगल्या संधीचा शोध असल्याचं म्हटलं जात आहे.

ट्रम्प यांच्या आयातशुल्कासंदर्भातील इशाऱ्याचा भारतावर कसा आणि काय परिणाम होणार?

जागतिक स्तरावर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं प्रत्येक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत असतानाच सध्या त्यांच्या आयात शुल्कासंदर्भातील धोरणानंच अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यातच उपस्थित होणारा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांच्या या धोरणाचा भारतावर नेमका काय आणि कसा परिणाम होणार? ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांच्या यादीत भारताचाही समावेश असून ट्रम्प यांच्या या धोरणाच्या निषेधार्थ ब्रिक्सकडून जारी करण्यात आलेल्या घोषणापत्रावर भारताचीही स्वाक्षरी आहे. त्यातच अमेरिका आणि भारतातील अंतिम टप्प्यात असणाऱ्या व्यापार करारावर अखेरचं शिक्कामोर्तबाची प्रक्रिया पूर्ण झाी नसल्यामुळं आता त्यावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...

ब्रिटिश प्रभावशाली ब्रूक जॉर्ज आरोपी; फेसबुक कनेक्शन

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादुबईत 23 वर्षीय ब्रिटिश सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ब्रूक जॉर्जवर एका ब्रिटिश नागरिकाच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. मृतकाशी तिची ओळख...

ग्रीन होम 4% पर्यंत महाग, वीज-पाण्यावर 30% पर्यंत बचत:घर खरेदी करताना टिकाऊपणा नवीन निकष...

0
घर खरेदी करण्याचे निकष आता फक्त स्थान, किंमत आणि सुविधा नाहीत, तर टिकाऊपणा (सस्टेनेबिलिटी) देखील आहे. प्रॉपटेक फर्म स्क्वेअर यार्ड्सच्या एका अहवालानुसार, ग्रीन...
spot_img

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...

ग्रीन होम 4% पर्यंत महाग, वीज-पाण्यावर 30% पर्यंत बचत:घर खरेदी करताना टिकाऊपणा नवीन निकष...

0
घर खरेदी करण्याचे निकष आता फक्त स्थान, किंमत आणि सुविधा नाहीत, तर टिकाऊपणा (सस्टेनेबिलिटी) देखील आहे. प्रॉपटेक फर्म स्क्वेअर यार्ड्सच्या एका अहवालानुसार, ग्रीन...

मेस्सीच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठा 85 फुटांचा पुतळा:70 टन स्टील, 18 महिन्यांत तयार झाला; विश्वचषकात...

0
अर्जेंटिनाच्या कर्णधार लिओनेल मेस्सीच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला. बुधवार, २४ जून रोजी अर्जेंटिनाच्या पाटागोनियामधील कटराल शहरात मेस्सीच्या ८५ फूट...
error: Content is protected !!