Homeसांस्कृतिकआषाढ, श्रावणात नववधू माहेरी का जातात? विचित्र कारण ऐकून अवाक् व्हाल

आषाढ, श्रावणात नववधू माहेरी का जातात? विचित्र कारण ऐकून अवाक् व्हाल


अशाधी एकदाशी 2025: हिंदू धर्मात आषाढ आणि श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आषाढी एकादशीपासून सण उत्साहाला सुरुवात होतात. आषाढ महिना लागला की महाराष्ट्रात वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाचा दर्शनासाठी वारीला निघतात. पालखी, वारकरी अन् संपूर्ण महाराष्ट्र भक्तीमय होऊन जातो. आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्रात नवविवाहित माहेरी जातात. आषाढ आणि श्रावण महिन्यात नववधू आपल्या माहेरी आईच्या घरी जाणे शुभ मानले जाते. असं म्हणतात श्रावणात मुलगी घरी येणं म्हणजे पलक्ष्मी घरी येते. शिवाय वडीलधाऱ्यांचा आशीवार्द त्यांना मिळतो. आजही ही परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाळली जाते. पण या प्रथेमागील खरं कारण तुम्हाला माहितीये का?

ही कारणे सांगितली जाऊ शकतात!

आषाढ आणि श्रावणात माहेरी गेल्यामुळे नववधू वडील, आई आणि भावडांसोबत वेळ घालवायला मिळतो. लहानची मोठं ज्या घरात ज्या माणसांसोबत होते त्यांच्यासोबत लग्नानंतर हक्काने काही दिवस राहता येतं. वैवाहिक जबाबदाऱ्यांपासून त्यांना थोडा आराम मिळतो. या दोन महिन्यात विठ्ठल आणि महादेवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते, असा मान्यता आहे.

हे आहे खरं कारण जे अनेकांना माहिती नाही!

सोशल मीडियावर ओंकार विलास सावंत यांनी एक व्हिडीओ शेअर करत यामागील कारण सांगितलं आहे. आषाढ आणि श्रावण महिन्यात नववधू माहेरी येण्यामागे अनेक कारणं आहेत पण एक कारण जे अतिशय विचित्र होतं. आता हे कारणा तसं मजेशीर वाटेल. पण त्या काळात आषाढ आणि श्रावणात नववधूला माहेरी आणण्यामागे हे कारण महत्त्वाचं होतं. पूर्वीच्या परिस्थितीनुसार ही प्रथा प्रचलित झाली. आषाढ महिना मुख्यत्वे करून जून – जुलैच्या दरम्यान येत असतो. यावेळी पावसाचे आगमन झालेले असतं. एप्रिल मे महिन्यात लग्न झालेल्या नवीन जोडप्यांचा संसार नव्याने सुरू झालेला असतो. त्या काळात लहान वयात आणि अॅरेज मॅरेज व्हायचे. त्यामुळे वधू वर एकमेकांना ओळखत नसे. मुलीचं वय लग्नाच्या वेळी खूप कमी असायचं. लग्न झाल्यावर सासरेचे नियम आणि तिथली राहणीमान हे समजण्यात वेळ जायचा. त्यात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने अनेक लोकांचा घरात वावर राहायचा. त्यात नववधू आणि वरांना एकमेकांना ओळखण्यासाठी बरेच दिवस निघून जायचे.

नंतर मात्र जोडप्यामध्ये जवळीक वाढायची. या महिन्यात महिला गर्भवती राहिल्यास तर उन्हाळ्याच्या दिवसांत बाळंतपण येणार. म्हणून अशी परिस्थिती येऊ नये म्हणून नववधू आषाढ आणि श्रावणात माहेरी जायचा. कारण आतासारख्या वातानुकूलित सुखसोयी त्या काळात नव्हत्या. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस बाळंतीण बाईला कष्टाचे जायचे. म्हणून ही प्रथा समोर आली. त्यासोबत नवीन लग्न झालेल्या मुलीचे लाड करता यावे म्हणूनही त्या काळात त्यांना माहेरी पाठवलं जायचं.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!